एक सायकल दुरुस्ती मेकॅनिक ते प्रशासकीय अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास ..!


भारत सरकार द्वारे घेण्यात येणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला दरवर्षी जवळपास दहा लाख(१००००००)  उमेदवार प्राथमिक परीक्षेसाठी फॉर्म भरतात
त्यापैकी फक्त ५०% उमेदवारांची म्हणजे जवळपास चार-पाच लाख उमेदवारांचे प्राथमिक परीक्षेसाठी निवड होते  आणि त्यापैकी फक्त तीन ते पाच टक्के म्हणजे बारा हजार ते पंधरा हजार (१२०००-१५०००) उमेदवार प्रिलिम म्हणजेच प्राथमिक परीक्षा पास होतात आणि  मुख्य परीक्षेसाठी ग्राह्य  धरले जातात; त्यानंतर  या बारा ते पंधरा हजार उमेदवारामधून  फक्त बावीसशे ते पंचवीसशे  उमेदवार मुलाखत परीक्षेसाठी निवडले जातात त्यापैकी  आठशे ते नऊशे (८००-९००)  उमेदवार फायनल लिस्टमध्ये सिलेक्ट होतात याचा अर्थ फक्त १% उमेदवारच त्यांच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचू शकतात;
 तर असे का होते यामागे खालील कारणे आहेत:-
१) काही विद्यार्थी उमेदवार फक्त नावाला फॉर्म भरतात 
२)काही उमेदवार फॉर्म भरून  गंभीर नसतात 
३)काही विद्यार्थी फक्त परीक्षेचा अनुभव घेण्यासाठी फॉर्म भरतात
४)बाकीचे विद्यार्थी ज्यांना वाटते आपण तयारी पूर्ण झालेली नाहीये पेपर देत नाहीत...!
परंतु आम्ही  एका आयएएस अधिकाऱ्याची संघर्षगाथा तुमच्यासमोर मांडणार आहोत ज्याने सायकल दुरुस्तीचे  दुकान चालवून आयएस परीक्षा कठोर परिश्रम जिद्द आणि संयमाच्या बळावर उत्तीर्ण केली. 



  
वरुण बरांवल हे मूळचे पालघर तालुक्यातील बोईसर येथील रहिवासी आहेत. बोईसरलाच त्यांच्या वडिलांचे सायकल दुरुस्तीचे दुकान होते जी त्यांचे  भाऊबंद आजही चालवतात. आई वडील आणि चार बहिण भावंडांसोबत मिळून त्यांचा परिपूर्ण परिवार होता.  वरूण सरांच्या वडिलांची ची इच्छा होती की आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे त्यामुळे ते नेहमी मी त्यांच्या मुलाला डॉक्टर होण्यासाठी प्रोत्साहित करायचे , त्यांनी वेळीच वरुण सरांची शिक्षणाची आवड आणि हुशारी बघून त्यांना नेहमी पाठबळ दिले.   वरुण सरांनी  देखील डॉक्टर  होऊन वडिलांची इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले होते.
 परंतु काही वेळा आपण जे  करतो आणि ठरवतो नियतीला ते मान्य असेलच असे नसते ; नियतीच्या क्रूर खेळासमोर आपण क्षुद्र ठरतो .  जेव्हा वरुण सर  दहावीत होते त्यावेळी त्यांच्या वडिलांना हार्ट अटॅक ने मृत्यू आला आणि त्यांचे स्वप्न धुळीस मिळाल्याचे त्यांना समजले,वडील गेल्यानंतर परिवाराच्या आर्थिक हलाखीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी वरुण सरांनी आपल्या स्वप्नाला तिलांजली देण्याचे ठरविले  आणि ते  आपल्या वडिलांच्या सायकल दुरुस्ती दुकानावर काम करू लागले.
 अकरावी ला ऍडमिशन घेऊन शिकत असताना सोबतच कॉलेजचा अभ्यास करणे अशी दुहेरी कसरत करत असताना सरानी अभ्यासाकडे बिलकुल दुर्लक्ष केले नाही .  या मेहनतीचे फळ म्हणून  बारावी मध्ये वरुण सरांनी त्यांच्या बोर्डाच्या परीक्षेत पूर्ण जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवला ; आपल्या मुलाने एवढ्या खडतर काळात केलेल्या यशोपूर्ण कामगिरीमुळे त्यांच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि त्यांनी वरुणला अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगितले त्यांच्या आईने ठरवले कि दुकानावर मी लक्ष देईल आणि वरूण अभ्यास करेल त्यामुळे वरुण सरांनी  पुढील शिक्षणासाठी जवळच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचे ठरवले परंतु त्यांच्याकडे कॉलेज फी भरण्यासाठी दहा हजार रुपये देखील नव्हते या कारणास्तव त्यांनी हा निर्णय सुद्धा मागे घेतला व परत ते सायकलच्या दुकानावर काम करू लागले... 
परंतु एका दिवशी ज्या डॉक्टरांनी त्यांच्या वडलांवर उपचार केले होते ते डॉक्टर रस्त्याने जात असताना त्यांची गाठ भेट वरूण सरांसोबत पडली ; हा  क्षण वरुण सर यांच्या आयुष्यातील जीवन बदलणारा क्षण होता त्या डॉक्टरांनी  वरूण सरांची अडचणी ऐकून  त्यांची  कॉलेज फी भरण्यास तयार झाले व त्यांनी वरुण ला कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन दिले शिक्षण परत सुरु झाल्याने वरुण सर खूप आनंदात होते परंतु त्यांचा पैशांचा प्रॉब्लेम अजून सुद्धा संपलेला नव्हता.  त्यांना महिन्याची फी भरण्यासाठी ट्युशन्स घ्यावे लागायचे कधी त्यांच्याकडे पैसे नसले तर त्यांच्या कॉलेजातील शिक्षक त्यांना पैसे गोळा करून भरण्यास मदत करायचे अशाप्रकारे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. 

  शालेय जीवनापासून एक गोष्ट वरुण सर यांच्या डोक्यात पक्की होती ती म्हणजे शिक्षण आणि कठोर मेहनत हाच गरीबीतून सुटका करण्याचा एकमेव मार्ग आहे;  त्यामुळे शिक्षण घेत असताना देखील त्यांनी आईला मदत करण्यासाठी सायकल रिपेरिंग चे काम रात्रीच्या वेळेस सुरू ठेवले एके दिवशी त्यांना वाटले की आपल्याला समाजाकडून मदत मिळत आहे  तर आपणदेखील त्यांचा उतराई का म्हणून होऊ नये .  त्यामुळे त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग या परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला आणि पहिलाच प्रयत्न त्यांनी ऑल इंडिया रँक ३२ मिळवले तसेच  महाराष्ट्रातून ते पहिले आले.बेटर इंडिया ने  घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीत वरुण सर म्हणतात की," माझ्या आईने माझ्या शिक्षणासाठी आणि परिवाराच्या सुखासाठी खूप कष्ट घेतले  आणि अनेक गोष्टींचा त्याग केला मी हे माझे यश तिला अर्पण करतो..."  निश्चितच  त्यांची आई आणि सहकारी ज्यांनी मदत केली ते कृतकृत्यतेच्या भावनेने गद्गद झाले नसतील तरच नवल.... !
केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही जगातल्या सगळ्यात कठीण परीक्षांपैकी  एक आहे ज्यात अभ्यासक्रम हा  खूप विस्तारित असतो आणि त्याची  निवड प्रक्रिया खूप किचकट  असते त्यामुळे उमेदवार नेहमी संभ्रमावस्थेत असतो परंतु एकदा ही परीक्षा पास झाल्यावर आपल्याला जो ध्येयप्राप्तीचा  आनंद मिळतो  तो निश्चितच अवर्णनीय असतो. 
आजकाल सगळीकडे हव्या त्या सुविधा उपलब्ध आहेत साधनांची रेलचेल आहे परंतु आपल्याकडे कष्ट करण्याची तयारीची कमी आहे.  
आपली इच्छाशक्ती दृढ असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते आपली हाच संदेश आपल्याला या गाथेतून मिळतो. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या