ती ५ पुस्तके ज्यांनी तुमचं व्यक्तिमत्व उजळून निघेल ...!

 Rich dad poor dad mararhi book 

१) रिच डॅड  पुअर  डॅड  (मराठी):- रॉबर्ट कियासोकी  



         सामान्य लोक त्यांच्या आयुष्यातील भरपूर वर्ष हे शालेय शिक्षणात घालवतात, परंतु पैश्याचे व्यवस्थापन आणि गुंतवणूक या विषयातील त्यांचे ज्ञान हे शून्य असते . परिणामी  त्यांना विविध आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.म्हणजेच ते पैश्यासाठी गुलामी कशी करावी हे शिकतात परंतु पैश्यालाच आपला गुलाम कसे बनवावे याबद्दल पूर्णतः अनभिज्ञ असतात. 

रिच डॅड  पुअर डॅड हि मुख्यतः २ वडिलांची गोष्ट आहे ; एक उचविद्याविभुषित तर दुसरे  शाळा मधेच  सोडलेले परंतु   दोघांपैकी एक वडील  जे खूप शिकलेले आहेत ते आपल्या मुलासाठी काहीही संपत्ती मागे सोडून जात नाही तर कमी शिकलेले वडील आपल्या मुलासाठी खूप सारी संपत्ती सोडून जातात .

या पुस्तकातील श्रीमंत वडील २ लहान मुलांना त्याच्या अनुभवाच्या आधारावर अतिशय अमूल्य असा धडा शिकवतात. त्यात ते म्हणतात आपल्या बुद्धीचा आणि वेळेचा  आपण जास्तीत जास्त चांगल्याप्रकारे वापर कसा करू शकता याचा विचार करा . या उंदराच्या शर्यतीतून बाहेर निघून प्रत्येक संधीचा सदुपयोग कसा करता येईल ते बघा.  आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पैश्यासाठी काम न करता पैश्याला तुमच्यासाठी कामाला  लावा. 

थोडक्यात काय तर माणूस श्रीमंत किंवा गरीब त्याच्या मानसिकतेद्वारे असतो हि श्रीमंत  होण्यासाठीची मानसिकता कशी विकसित करावी हे तार्किक पद्धतीने आणि अतिशय सोप्या  उदाहरणद्वारे  स्पष्ट केले आहे.

आर्थिक साक्षरतेसंबंधीचे  सर्वाधिक विकले गेलेले पुस्तक ...!

 

The power of your subconscious mind book pdf free download in marathi

२) द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माईंड (मराठी) :- जोसेफ मर्फी  



          जोसेफ मर्फी हे एक  प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ तसेच मानस शास्त्रज्ञ होते त्यांनी आपल्या द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माईंड या पुस्तकात आपल्या अर्धवट जागृत असलेल्या मनाच्या( ज्याला अवचेतन मन असेही म्हणतात ) शक्तीबद्दल आपल्या  संशोधनात्मक अनुभवाच्या आधारावर लिहिले आहे. या  पुस्तकात त्यांनी या  शक्तीचा  वापर आपल्या  सफलतेसाठी  कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले आहे. 

प्रसिद्ध शास्त्रज्ञ निकोला टेस्ला याना जेव्हा एखादी कल्पना सुचायची तेव्हा ते आपल्या मनातच  त्या कल्पनेला मूर्त रूप देत असत म्हणजेच ते अशी धारणा करायचे कि हि  गोष्ट आपल्याकडून पूर्ण तयार झालेली आहे कारण त्यांना अवचेतन मनाच्या सामर्थ्याबद्दल माहित होते.  या गोष्टीत त्यांनी एवढी प्रगती केली होती कि, जेव्हा ते डोक्यात  एखाद्या यंत्राचे डिझाईन तयार करायचे तर त्या डिझाईन मधील चुका आणि कमकुवत बाजू सुद्धा त्यांना तिथेच  लक्षात येऊन जायचे व यंत्र बनवताना ते ह्या सगळ्या चुका टाळून वेळ व पैसे वाचवायचे. 

लेखक म्हणतात, आपण जे काही करतो त्यावर आपल्या अवचेतन मनाचा खूप शक्तिशाली  प्रभाव असतो आणि म्हणूनच ज्या ध्येयावर  आपण विश्वास ठेवतो आणि त्याची  कल्पना करतो    त्या  ध्येय प्राप्तीच्या आड  येणारे सर्व अडथळे सुद्धा या शक्तीच्या साहाय्याने पार पाडू शकतो. जर आपण ठाम विश्वास ठेवला तर कोणत्याही  एका विचाराला आपण अवचेतन मनाच्या साहाय्याने सत्यात उतरवू शकतो.

तसेच त्यांच्यामते  यशस्वी होण्याचा मार्ग फक्त ३ टप्प्यांचा आहे.

पहिला टप्पा :- ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात अश्या गोष्टी/कामे  जास्तीत जास्त करावे.

दुसरा टप्पा :- कोणत्याही एका कामात किंवा गोष्टीत प्रभुत्व मिळवा, त्याबद्दल जास्तीत जास्त माहिती ज्ञान आणि अनुभव मिळवा, 

तिसरा टप्पा :- मिळालेले ज्ञान आपल्यापर्यंत सीमित न ठेवता ते दुसर्यांना दिले पाहिजे कारण ज्ञान दिल्याने वाढणारी गोष्ट आहे. त्याचा लाभ इतरांना  झाला पाहिजे. आणि हे सर्व करताना आपण अवचेतन मनाचा पुरेपूर वापर केला पाहिजे. 

मराठीतील लोकप्रिय पुस्तक..!


Who will cry when you die marathi

 

३) तुमच्या मृत्युंनतर कोण रडणार आहे :- रॉबिन शर्मा 




    मोंक हू सोल्ड हिस फेरारी आणि ५ एम क्लब सारखे प्रसिद्ध पुस्तकांचे लेखक असलेल्या रॉबिन शर्मा यांचे हे पुस्तक त्यांच्या  स्वतःच्या जीवनातील अनुभवावरून प्रेरणा घेऊन लिहिले आहे. त्यामुळे यातील सर्व कथा ह्या व्यवहारिक वाटतात.  सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे पुस्तक पहिल्यापासूनच वाचले पाहिजे असं काही नाही तुम्ही कुठलेही पान उघडून वाचू शकता कारण प्रत्येक प्रकरण हे २ ते ३ पानाचे आहे .

यातील एका कथेत लेखक लिहितात कि आपल्या प्रत्येकात एक प्रतिभा दडलेली आहे आणि प्रत्येकाचे एक विशिष्ट असे उद्दिष्ट असते. जर आपल्याला वाटत असेल कि आपण नेहमी आनंदी राहावे आणि त्याच बरोबर आपल्या सोबत च्या लोकांच्या जीवनात सुद्धा आपल्यामुळे सकारात्मकता यावी तर आपण पूर्ण क्षमतेने ते  उद्दिष्ट शोधले पाहिजे. तसेच एखादी गोष्ट  बोलताना नेहमी ३ गोष्टी स्वतःला विचारले पाहिजे १) आपण जे बोलतोय ते सत्य आहे का ? २)  हे बोलणे जरुरीचे आहे? ३) आपण जे शब्द बोलतोय ते चांगले आहेत का ? जर या ३ प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल तरच आपण ते बोलले पाहिजे. 

हे पुस्तक आपण मेल्यानन्तर आपल्यासाठी कोण रडेल यासंदर्भात नाही तर जिवंत असताना आपण कशाप्रकारे जगले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करते. 

Mitra joda ani lokanvar prabhav pada 

४) मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा  :- डेल कार्नेगी 



एका विचारवंताने अगदी बरोबर म्हटले आहे .एखाद्याचे मन जिकने हि  पण एक कला आहे . याच गोष्टीने  मोठी मोठी कामे सहज साध्य होऊ शकतात. मित्र जोडा आणि प्रभावशाली बना या पुस्तकात डेल कार्नेगी यांनी लोकांवर आपला सकारात्मक प्रभाव पडून त्यांना आपला मित्र कसे बनवावे ह्याबाबदल लिहिले आहे. प्रत्येकाला वाटते आपल्याला भरपूर मित्र असावेत व मित्रांमध्ये आपली किंमत असावी आणि  याच  गोष्टींनी  आपला आत्मविश्वास वाढतो.

या पुस्तकात त्या ३ गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही सगळ्यांवर  आपला सकारात्मक प्रभाव पाडू  शकता :-

नियम १) 

 Don’t criticize, condemn or complain

कोणाचीही निंदा , आलोचना किंवा तक्रार करू नका हे  सर्व करण्या अगोदर ती व्यक्ती अशी का वागली याचा विचार करून त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. स्वतः अब्राहम लिंकन हा नियम कटाक्षाने पाळत असत  

नियम २) 

Give honest and sincere appreciation.

एखाद्याने केलेल्या चांगल्या कामाचे मनापासून कौतुक करा. हा एक असा उपाय आहे ज्याद्वारे आपण समोरच्या व्यक्ती कडून कोणतेही काम करवून घेऊ शकतो ; कारण तुम्ही खऱ्या अर्थाने केलेले कौतुक तो नेहमी लक्षात ठेवेल आणि तुमची सकारत्मक छबी त्याच्या मनात तयार होईल. 

नियम ३) 

Inspire them in positive way 

तुमच्या कडे जर एखादी व्यावसायिक कल्पना असेल तर समोरच्याला त्यात अश्याप्रकारे सहभागी करा की त्याला हि कल्पना हि त्याच्या स्वतःची कल्पना वाटली पाहिजे. जर तुम्ही प्रत्येक व्यक्तीला हे दाखवून द्याल कि ती तुमच्यासाठी किती महत्वाची आहे तर ती व्यक्ती नक्कीच तुमची चाहती झालेली असेल.

अश्या भरपूर गोष्टीद्वारे त्यांनी लोकांना आपल्या अनुकूल कसे बनवावे हे सांगितले आहे म्हणून हे पुस्तक एकदातरी नक्की वाचाच...!

Vichar kara ani shrimant wha

५ ) विचार करा आणि श्रीमंत व्हा :- नेपोलियन हिल 



जर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावे साक्षर व्हावे असे वाटत असेल नेपोलियन हिल यांचे  पुस्तक तुम्ही वाचलेच पाहिजे. पैसा खुदा तो नही  पर खुदासे कमी भी नही।  असं म्हणतात ते उगाच नाही . एका कामाच्या निमित्ताने जेव्हा लेखकाला अँड्रू कार्नेगी या श्रीमंतांची मुलाखत घ्यावी लागली त्यावेळी त्यांना माणसे श्रीमंत होतात तरी कसे हा प्रश्न पडला ज्याचे निरसन खुद्द कार्नेगी यांनीच केले. यानंतर २० वर्षेपर्यंत अभ्यास आणि संशोधन करून त्यांनी ते सिद्धांत शोधून काढले जे व्यक्तीला श्रीमंत होण्यासाठी मदत करतात.

त्यांनी ह्या पुस्तकात्त एक पद्धत सांगितली आहे जी खूपच प्रभावी आहे आणि सर्वांची मान्यता देखील याला मिळालेली आहे 

लेखक म्हणतात कि फक्त  या ६ पायऱ्याद्वारे तुम्ही इच्छित संपत्ती मिळवू शकता. 

१) तुम्हाला नेमकी किती संपत्ती  हवी आहे ते अगोदर ठरवा .

२) ती मिळवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात ?

३)हि संपत्ती कोणत्या कालावधी पर्यंत तुम्ही प्राप्त करणार आहात?

४) त्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहे ?

५) वरील ४ हि गोष्टी एका कागदावर लिहा.

६) रोज सकाळी झोपेतून उठल्यावर आणि रात्री झोपेच्या अगोदर हा कागद वाचून काढावा.

आपल्या मेंदूला ह्या गोष्टीबद्दलचे सकारात्मक  कंपने गेल्यावर ती गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही असे लेखकांचे ठाम मत आहे. 

माणसाच्या व्यक्तिमत्व विकासात अनुभवांचे मोठे योगदान असते आणि  हुशार तोच जो दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिकतो ; पुस्तके आपल्याला  याच अनुभवांचा परिचय करून देतात म्हणून वाचा हि   पुस्तके जी आपल्या आयुष्यात सकारात्मक  परिवर्तन आणण्याचे सामर्थ्य ठेवतात. 


आणखी वाचा :-

ती ५ पुस्तके ज्यांनी तुमचं व्यक्तिमत्व उजळून निघेल (क्लीक करा)

सकाळी लवकर उठा आणि यशस्वी व्हा (क्लीक करा)

जीवनाला नवी दिशा देणारी १० प्रेरणादायी पुस्तके (क्लीक करा)

तुमच्या मनात प्रेरणेची ज्योत जागवणारी पुस्तके ...!(क्लीक करा)

शेयर मार्केट म्हणजे काय ? (क्लिक करा)

शेयर बाजाराची ओळख करून देणारी सर्वोत्तम मराठी पुस्तके ? (क्लिक करा)

ऑनलाईन  पैसे कमवण्याचे ७ खरे मार्ग ? (क्लिक करा)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या