सकाळी लवकर उठा आणि यशस्वी व्हा..! (5 am club marathi)

         सकाळी पाच वाजता

आज रॉबिन शर्मा हे नाव वाचकवर्गाला नवीन नाहीच..! १९९६ साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या मोंक हू सोल्ड हिस फेरारी या त्यांच्या पुस्तकाने अक्षरश जगाला वेड लावले त्यानन्तरची लीडर हू हॅड नो टायटल आणि लीडरशिप विस्डम अशी बरीच पुस्तके त्यांनी लिहिली. त्याच पठडीतले त्यांचे हे नवीन पुस्तक. द ५ एएम क्लब.

सकाळी किती वाजता उठावे






रॉबिन शर्मा हे एक लीडरशिप एक्स्पर्ट आहेत त्यांच्या पुस्तकातील सिद्धांत वापरून मोठमोठ्या उद्योजक आणि व्यवसायिकांनी अमाप यश मिळविले उदाहरण द्यायचे झाले तर एलोन मास्क , रतन टाटा , हेन्री फोर्ड , रिचर्ड ब्रॅन्सन आणि स्टिव्ह जॉब्स अश्या कितीतरी उद्योजकांची उदाहरणे आपल्याला देता येतील.
आपल्या ५ एएम क्लब या पुस्तकात रॉबिन शर्मानी ३ महत्वाच्या सिद्धांताबदल सांगितले आहे,
१) सकाळी ५ वाजताच का उठावे आणि त्याचे फायदे काय?
२)सकाळी ५ वाजता उठल्यावर नक्की काय करावे ?
३) या गोष्टींना आपण आपल्या सवयीत कसे आणावे ज्याने आपण यशस्वी होऊ शकू.?

काय सकाळी ५ वाजता उठणे खरंच एवढे गरजेचे आहे? तर त्याचे उत्तर होय असेच असेल. या गोष्टीला वैज्ञानिक आधार आहे तो असा कि, सकाळच्या वेळेला आपल्या मेंदूतील prefrontal cortex हा भाग अतिशय कमी प्रमाणात कार्यशील असतो.( हा भाग आपल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेशी निगडित असतो म्हणजेच एखादा निर्णय घेताना prefrontal cortex हा भाग active असतो. ) त्यामुळे आपले डोके सकाळी अतिशय शांत आणि मूड छान असतो.
लेखक रॉबिन शर्मा म्हणतात, सकाळी ५ ते ६ चा वेळ हा victory hour असतो. या वेळात आपण योग्य गोष्टी करून आपले जीवन यशस्वी आणि समृद्ध करू शकतो परंतु दुर्दैवाने बहुतांश लोकांना हे माहित नाही त्यामुळेच सकाळी उठून काही जण मोबाइल चेक करतात सोशल मीडिया वापरतात आणि या व्हिक्टरी hour ला failure hour बनवून टाकतात.
पुस्तकातील महत्वाचा सारांश असा कि, आपण सकाळी ५ वाजता उठल्यावर ५ ते ६ या व्हिक्टरी hour मध्ये आपल्याला २०/२०/२० हा नियम वापरायचा आहे. म्हणजेच आपल्याला या एका तासाची प्रत्येकी २० मिनिटे अशी ३ भागात विभागणी करायची आहे.
पहिल्या २० मिनिटात आपल्याला व्यायाम करायचा आहे. ज्या व्यायामात जास्तीत जास्त घाम निघेल असाच व्यायाम आपल्याला करायचा आहे. होत काय कि, घाम आल्याने आपल्या शरीरातील कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन शरीराबाहेर निघून जातो ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होतो. तसेच घाम आल्याने BDNF नावाचे प्रोटीन तयार होतात जे आपल्या मेंदूच्या पेशींना विकसित करण्याचे काम करतात. अश्याप्रकारे व्यायाम केल्याने FEEL GOOD हार्मोन निर्माण करतो जो आपल्याला पूर्ण दिवसभरासाठी ऊर्जा पुरवतो. त्यामुळे सकाळी उठून आपण २० मिनिटे तरी रनिंग किंवा कार्डिओ असे घाम गाळणारे व्यायाम केले पाहिजे.
त्यांनंतरचे २० मिनिटे आपण एका ठिकाणी शांत बसून ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याबाबद्दल नियती किंवा देवाचे आभार मानले पाहिजेत व एक डायरी घेऊन त्यात आपल्या दिवसभरातल्या कामांची किंवा महत्वपूर्ण उद्दिष्ट आणि ध्येय यांची यादी तयार केली पाहिजे व हि कामे पूर्ण करण्यासाठी काय योजना आपण अमलात आणणार आहात तेदेखील लिहा. आपले उद्दिष्ट किंवा ध्येय लिहून काढल्याने ते पूर्ण होण्याची संभावना वाढीस लागते. दिवसभर आपल्या कामाची आणि उद्दिष्टांची आपल्याला आठवण असते. जगातल्या यशस्वी लोकांची ध्येय लिहून काढणे हि एक कॉमन सवय आहे.
आता राहिली शेवटची २० मिनिटे तर लेखक म्हणतात कि हि २० मिनिटे आपण ज्ञानात भर पाडण्यासाठी वापरली पाहिजेत , म्हणजे आपण पुस्तक मासिक किंवा वर्तमानपत्र वाचून आपल्यात माहितीत भर पाडली पाहिजे. कोणत्याही एका विषयावरचे पुस्तक जरी आपण वाचले तरी चालेल याने आपल्या व्यक्तिमत्व वाढीसाठी आव्यश्यक वातावरण तयार होते.
अश्याप्रकारे आपण या एक तासाचा उपयोग केला पाहिजे. लेखक म्हणतात कि तुम्ही फक्त ६ महिने जरी सातत्याने या गोष्टीचे अनुसरण केले तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही एवढ्या प्रमाणात सकारात्मक बदल तुम्हाला जानवेल.
मित्रानो सकाळी उठण्याची सवय हि खूप चांगली सवय आहे याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही अश्या चांगल्या सवयीचे अनुकरण करून आपण आपले जीवन सुखी करण्यासाठी कायम प्रयत्नशील असले पाहिजे. त्यामुळेच हे पुस्तक अतिशय महत्वपूर्ण आणि वाचलेच पाहिजे असे आहे.


आणखी वाचा :-

ती ५ पुस्तके ज्यांनी तुमचं व्यक्तिमत्व उजळून निघेल (क्लीक करा)

सकाळी लवकर उठा आणि यशस्वी व्हा (क्लीक करा)

जीवनाला नवी दिशा देणारी १० प्रेरणादायी पुस्तके (क्लीक करा)

तुमच्या मनात प्रेरणेची ज्योत जागवणारी पुस्तके ...!(क्लीक करा)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या