(best marathi books to read before you die)
marathi motivational books
marathi inspirational books
जीवनाला नवी दिशा देणारी १० प्रेरणादायी पुस्तके ...!
१) पुस्तकाचे शीर्षक :- प्रकाशवाटा ‖‖ मूळ लेखक :-डॉ. प्रकाश आमटे
बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांना आनंदवनाच्या रूपाने जगण्याचे बळ दिले आणि त्यांच्यात जगण्याची उमेद निर्माण केली ; एक अतिशय उपेक्षित परिसर ते आजचे 'स्मार्ट' खेडे पर्यंतचा आनंदवनचा प्रवास बाबांशिवाय अपुरा आहे ;बाबांच्याच पाऊलवार पाऊल ठेऊन त्यांच्या लाडक्या मुलाने स्वतःला उपेक्षितांसाठी तसेच तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतःला तसेच स्वपरिवाराला वाहून घेतले.!
ही प्रकाशगाथा आहे स्वर्गीय बाबा आमटे याचे चिरंजीव डॉ. प्रकाश आमटे यांची... ! गडचिरोली या नक्सलग्रस्त इलाख्यातील भामरागड तालुक्यात हेमलकसा हे छोटेसे खेडे आहे ; स्वातंत्र्याच्या ४०-५० वर्षांनंतर देखील पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या या आदिवासी बहुल क्षेत्रातील लोकांच्या स्वातंत्र्याची व्याख्या काय असावी..? या एवढ्या दुर्गम भागात प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी सौ. मंदा आपटे अनेक वर्षापासून जंगलात राहून तेथील भूमिपुत्र माडिया गोंड आदिवासींचे जीवन जगणे सुसह्य करत आहेत .
ज्या लोकांना जंगलापलीकडे देखील जग असते हे माहित नव्हते भूकबळी , रोगराई आणि अंधश्रद्धा या गोष्टीमुळे त्रस्त गस्त जणांना डॉक्टरांच्या रूपात प्रकाश दिवाच भेटला . डॉक्टरांच्या लोकबिरादरी प्रकल्पामुळेच आज तिथे सुसज्ज रुग्णालय आहे, शाळा आहे. तिथली मुलं शिकून डॉक्टर, वकील होतात. वैद्यकीय उपचारांअभावी होणार्या मृत्यूंचं प्रमाण अत्यल्प आहे.
याचे सर्व श्रेय बाबाच्या संस्कारांना आणि डॉक्टरांच्या जिद्दीला जाते; या प्रवासात त्यांना आलेले अनुभव या कार्यासाठी केलेली कसरत हे सगळे त्यांनी पुस्तकरूपात लेखणीबद्ध केले आहे. प्रकाशवाटा' या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारी रक्कम लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा, ता. भामरागढ जि . गडचिरोली येथील खर्चासाठी वापरण्यात येणार आहे. हे पुस्तक आपण विकत घेतल्यास प्रकल्पाला मदतच होईल.
२) पुस्तकाचे शीर्षक :- यश तुमच्या मुठीत ‖‖ मूळ लेखक :- ब्रायन ट्रेसी आणि सुरेंद्रन जे
ब्रायन ट्रेसी हे एक व्यावसायिक वक्ता, प्रशिक्षक, सेमिनार नेता आणि सल्लागार आहेत. आजवर त्यांनी पन्नासहून अधिक उत्तम खपाची पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी बनवलेले शैक्षणिक प्रोग्रॅम्स जगभर वापरले जातात. सुरेंद्रन जे हे ‘सक्सेस ज्ञान’ या कंपनीचे संस्थापक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी आहेत. सक्सेस ज्ञान’ संस्थेच्या मार्फत जगात जे जे काही उत्तम आहे ते भारतात आणावे आणि भारतातील सर्वाेत्तम ते ते जगापुढे मांडावे अशी त्यांची दूरगामी दृष्टी आहे.
बरीच सामान्य माणसे आपले आयुष्य सश्याच्या मागे धावणाऱ्या कृत्र्यासारखे निर्हेतुक पद्धतीने व्यतीत करत असतात. अशी माणसे आपल्या ध्येयावर कायम नसतात ; एक ध्येय सोडून दुसरीकडे जातात ते मिळायच्या आत ते सोडून परत तिसऱ्याच वाटेने जातात आणि म्हणूनच यश नेहमी त्यांच्यापासून दूरच असते.
कमीत कमी वेळात जास्तीत जास्त यश मिळवण्याची महत्वाकांक्षा असलेल्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे. अनुभवाने सिद्ध झालेल्या ,व्यवहारात सहजपणे उतरवता येण्याजोग्या अनेक कल्पना,पद्धती आणि अनुभव आपल्याला या पुस्तकात मिळतील. यशासाठी वाट पाहणे आता पुरे झाले . आता स्वतःच्या भविष्यरूपी गाड्याचा ताबा आपल्या हाती घ्या आणि कल्पनातीत वेगाने स्वविकास साधा.
३) पुस्तकाचे शीर्षक :- नॉट विडाऊट माय डॉटर ‖‖ मूळ लेखक :-बेटी मेहमूदि
‘नॉट विडाऊट माय डॉटर’ हे बेट्टी महमूदी यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे.
बेट्टी महमूदी ही मूळ इरानी असलेल्या डॉ सय्यद बोझोर्ग महमूदी यांच्या प्रेमात पडली आणि १९७७ मध्ये त्याच्याशी लग्न केले. या वैवाहिक जीवनात त्यांना महातोब हि गोंडस मुलगी झाली. त्यानंतर बेट्टी मेहमुदीच्या नवऱ्याने बेट्टी याना आपण२ आठवड्यासाठी एका लहान सहलीवर जाऊ असे म्हणत १९८४ साली आपल्या मायदेशाला (इराणला) आणले. स्वतःच्या कुटुंबीयांशी भेट घडवून आणण्याच्या मिषानं बेट्टी महमूदीचा नवरा आपल्या पत्नीला आणि मुलीला इराणला घेऊन गेला. त्या तिथं सुखात असतील, अधिक सुरक्षित असतील आणि त्यांना पुन्हा हवं तेव्हा अमेरिकेला परतता येईल.असं त्यानं तिला आश्वासन दिलं होतं. पण हे सारं खोटं होत आणि शुद्ध फसवणूक होती.
आणि इथून सुरु झाला तो छळवणुकीचा प्रवास..! इराण आणि अमेरिका हे एकमेकांचे कायम कट्टर शत्रू राहिले आहेत; अमेरिकन लोकांच्या वैरी असलेल्या देशात बेट्टी अडकली होती . तिचा स्वतःचा नवरा शिवीगाळ करीत होता मारहाण करून त्रास देत होता पण मुलींसाठी आपण जगले पाहिजे ह्या एकच ध्यासापोटी तिने हे सगळे सहन केले. तिथे दोन त्रासदायक वर्षे घालवल्यानंतर बेट्टी आपल्या मुलीसह इराणमधून पळून जाण्यात यशस्वी झाली.
इराणी पर्वतरांगांमधून तुर्कीला पळून जाण्यासाठी तिने थोडाथोडका नव्हे तर तब्बल ( कि.मी.) प्रवास केला होता या प्रवासात तिला बर्याच इराणी लोकांकडून मिळालेल्या मदतीबद्दल या पुस्तकात माहिती आहे. 1986 मध्ये अमेरिकेत परत आल्यानंतर तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.एका आईने आपल्या मुलींसाठी केलेला यशस्वी संघर्ष..!
best marathi books to read for students
best marathi books to read 2020
marathi motivational books pdf free download
४) पुस्तकाचे शीर्षक :- द अलकेमिस्ट ‖‖ मूळ लेखक :-पाऊलो कोएलो
गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये सर्वाधिक खपाचा विक्रम नोंदवलेली ही एक रसाळ कादंबरी. लोकांचे जीवन बदलण्याचे सामर्थ्य असणारी हि कथा पाउलो कोएलो यांच्या लेखणीतून उतरली आहे. नितीन कोताप्पले यांनी या कादंबरीचा अतिशय हृद्य अनुवाद केला आहे. आपल्या आंतरिक आवाजाची जाणीव करून देणारी ही कथा आहे.
सँटियागो नावाच्या मेंढपाळाच्या पात्रावर हे कथानक आधारित आहे ; एका भविष्य कथन करणाऱ्या महिलेच्या सांगण्यानुसार तो आपल्या मेंढ्यांचा कळप विकून खजिन्याच्या शोधात पिरॅमिड च्या दिशेने प्रवासाला सुरुवात करतो ; वाटेत त्याला भेटणारे व्यक्ती त्याद्वारे भेटलेले अनुभव त्याला खूप काही शिकवतात , हे पुस्तक त्यातील प्रेमकथेमुळे आणखी लक्षणीय ठरते; खऱ्या प्रेमाची व्याख्या या द्वारे व्यक्त होते, अंततः सँटियागो ला खजिना भेटतो कि नाही हे प्रत्यक्षात पुस्तकात वाचनेच श्रेयस्कर ठरेल ..!
'कोणत्याही खजिन्याचा शोध बाहेर कशाला घ्यायचा, तो आपल्याशीच तर असतो,' असा संदेश देणारे हे कथानक आहे. प्रतीकं आणि शकुनांचं भान ठेवून स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील कसं राहावं, याचं मार्गदर्शन ही कादंबरी करते. वेगळी दृष्टी देणारी आणि अंतर्मुख करणारी ही अद्भूत आणि रंजक कादंबरी..!
marathi inspirational books list
top 10 motivational books in marathi
५) पुस्तकाचे शीर्षक :-पावर ऑफ हॅबिट ‖‖ मूळ लेखक :-चार्ल्स दुहिग
या पुस्तकात चार्ल्स दुहिग यांनी आपण आपल्या सवयी कशा बनवू शकतो व त्यात आवश्यकतेनुसार बदल कसे करू शकतो यांचे गुप्त विज्ञान सांगितले आहे. हे पुस्तक लिहिताना त्यांनी यात ३ भाग स्पष्ट केले आहेत.
१) लोकांच्या व्यक्तिगत सवयी :- या भागा मध्ये त्यांनी आपल्या सवयी कशा विकसित होतात तसेच त्यांना बदलण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याबद्दल मार्गदर्शन केले आहे.
२) यशस्वी संघटनांच्या सवयी :- स्टारबक्स आणि वेगवेगळ्या प्रथितयश संघटना आणि कंपन्यांचे उदाहरणासहित दाखले देऊन त्यांच्या यशामागे कोणत्या सवयी सहायक आणि तारक ठरल्या यासंबंधी अतिशय सोप्या भाषेत विवेचन केले आहे.
३) समाजाच्या सवयी :- एका व्यक्तीचे किंवा एका विचारावर काम करणाऱ्या व्यक्तीचे आपण विश्लेषण करू शकतो पण समाजाचे विश्लेषण त्याच्या विविधतेमुळे अप्रत्याशित असते परंतु चार्ल्स यांनी हे कठीण विज्ञान देखील सोपे करून सांगितले आहे आणि हाच या पुस्तकाची विशेषता आहे .
या पुस्तकांच्या वाचनाने आपल्या वैयक्तिक आर्थिक,व्यावसायिक आणि सामाजिक प्रश्नाचे उत्तर मिळून आपल्या समस्या निकाली लागतील हा माझा स्वतःचा अनुभव आहे आपल्या अंतरंगातील सुप्त शक्तीचा अनुभव घेऊन सकारात्मक बदल घडविण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचाच ..!
६) पुस्तकाचे शीर्षक :-झिरो टू हिरो ‖‖ मूळ लेखक :-रश्मी बन्सल
झिरो टू हिरो हे २० उद्योजकांच्या यशोगाथा सांगणारे एक प्रेरणादायक पुस्तक आहे. हे पुस्तक ‘कनेक्ट द डॉट्स’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचे हिंदी भाषांतर आहे. या पुस्तकाचे भाषांतर रश्मी बन्सल यांनी केले आहे.
बिझिनेस स्कूल ग्रेडचे वर्चस्व असलेल्या या स्पर्धेच्या युगात, एमबीएशिवाय स्वतःवर विश्वास ठेवणे कठीण आहे. तरीही एमबीए डिग्री विना २० उद्योजकांनी स्वतःचे उपक्रम आणि व्यवसाय सुरू केले आणि यशस्वी होऊन पदवीच सर्वकाही नसते हे जगाला दाखवून दिले . या पुस्तकात रश्मी बन्सल यांनी असे स्पष्ट केले आहे की यश मिळविण्यासाठी मोठे स्वप्न पहायला हवे आणि पदवी नसल्याने प्रयत्न न करणे ही एक सबब आहे. जुगाड, जूनून आणि झुबान या तीन विभागांत ती आपल्याला सांगते की यश मिळविण्यासाठी पदवी नाही तर मोठी स्वप्ने, आकांक्षा आणि उद्योजकीय कौशल्ये अधिक महत्त्वाची आहेत. उत्कटतेच्या सामर्थ्यावर एक मुख्य पुस्तक, ज्यांना स्वतःची विशिष्ट ओळख बनवायची आहे अशा सर्वांनी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे.
marathi inspirational books pdf
७) पुस्तकाचे शीर्षक :-विचार करा आणि श्रीमंत व्हा ‖‖ मूळ लेखक :-नेपोलियन हिल
ह्या पुस्तकात लेखकानं श्रीमंत होणारा हा प्रवास फक्त काही पावलांचा असल्याचं सांगितलं आहे.
पाऊल पहीले – तीव्र इच्छाशक्ती
लेखकाने हा गुण क्रमांक एक वर ठेवला आहे, आपल्याला आयुष्यात नुसत्या इच्छा खुप असतात, पण त्याला ‘बर्निंग डिझायर’ बनवलं पाहीजे.
पाऊल दुसरे – श्रद्धा
श्रद्धा एक अशी मानसिक अवस्था आहे, जी सुप्त मनाला ठामपणे सांगुन निर्माण करता येते. प्रत्येक धर्मात श्रद्धेला आणि प्रार्थनेला निर्विवाद महत्व देण्यात आलं आहे.कुठलेही विचार सुप्त मनावर सतत बिंबवले, तर ते त्याप्रमाणे क्रिया करतं, विचारांचं भौतिक जगात रुपांतर होतं.
पाऊल तिसरे – स्वयंसुचना
स्वयंसुचना म्हणजे स्वतः स्वतःला दिलेली सुचना. आपल्या मनाद्वारे आपल्या ज्ञानेंद्रियांना दिलेलं प्रोत्साहन!
पाऊल चौथे – विशेषज्ञीय ज्ञान
लेखकाचं म्हणणं आहे, सामान्य ज्ञान कितीही मोठं असलं, कितीही जास्त असलं, तरी संपत्ती मिळवण्याच्या दृष्टीने ते तुटपुंजं ठरतं. प्रत्येक क्षेत्रात विशेष ज्ञान मिळवुन जलदपणे संपत्ती प्राप्त करण्याची संधी असते!
पाऊल पाचवे – कल्पना
कल्पना म्हणजे एक कार्यशाळा असते, जिथे माणुस आपल्या सगळ्या योजना तयार करत असतो, मनाच्या अफाट कल्पनाशक्तीला वापरुन आपल्या संवेदना, इच्छा यांना मुर्त रुप दिलं जाऊ शकतं.
पाऊल सहावे – योजना
कल्पना ह्या अस्ताव्यस्त पसरलेल्या असतात. त्यांना व्यावहारिक रुपात रचणं, त्यांना साध्य करण्यासाठी करावयाच्या छोट्या छोट्या कृतींचा आराखडा बनवणं, म्हणजे योजना बनवणे!
पाऊल सातवे – निर्णय
अनिर्णय आणि टाळाटाळ हे आपले सर्वात मोठे शत्रु आहेत, आपण त्यांच्यावर विजय मिळवायलाच हवा.
पाऊल आठवे – चिकाटी
उदिष्ट्य साध्य करण्यासाठी चिकाटी आवश्यक असते. यशाची तेरा पावलं चालण्यासाठी सुद्धा चिकाटी हवी.
नेपोलियन हिल हे जगातील सर्वाधिक वाचले जाणाऱ्या लेखकांपैकी एक आहेत. थिंक अँड ग्रो रिच हे त्यांचं अतिशय गाजलेले आणि अत्यन्त वाचनीय असं पुस्तक आहे.
श्रीमंत होण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने एकदा तरी हे पुस्तक वाचलेच पाहिजे.
best marathi inspirational books
८) पुस्तकाचे शीर्षक :-महानायक ‖‖ मूळ लेखक :-विश्वास पाटील
ही कादंबरी अश्या माणसावर आहे ज्याने स्वातंत्र्याचा अर्धा इतिहास एकट्यानेच घडवलाय अस म्हणायला काहीच हरकत नाही. अगदी पारतंत्र्याच्या काळात 8 महिन्याच्या कालावधीत ज्यांनी सनदी म्हणजे आजच्या भाषेत वर्ग १ च पद मिळवलं आणि त्यानंतर ब्रिटिश्यांची गुलामगिरी करायची नाही म्हणून त्या पदाला लाथ मारली आणि आपलं संपूर्ण जीवन देशसेवा करण्यात घालवल.
अडतीस कोटी देशबांधवांची गुलामीतून मुक्तता;याच एका प्राणप्रिय ध्येयासाठी एका कडव्या,लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेलीगरुडभरारी!जीवनभरचा धगधगता संघर्ष, जिवलग स्वकीयांशीआणि ब्रिटिश साम्राज्यासारख्या परकीयांशीही. त्यालाव्यक्ती म्हणून नव्हे, तर एक लढाऊ राष्ट्र मानून,जपानसारख्या हिशेबी देशानेही अभूतपूर्व मदत केली.'चलो दिल्ली'ची त्याची गर्जना साकारण्यासाठी इंफाळ-कोहिमा-ब्रह्मदेशाच्या अरण्यात जुंपला एकघना रणसंग्राम! नियतीच्या आडव्या तिडव्या भेसूर नाचानेही ज्याची कवचकुंडले कधीही निस्तेज झालीनाहीत असा- महानायक!देशोदेशींच्या दफ्तरखान्यांत आजवर अडकूनपडलेल्या दुर्मिळ दस्तऐवजांचा, नव्या संशोधितकागदपत्रांचा वेध घेऊन व त्या 'रणवाटा'वरूनभ्रमण करून चितारलेली नेताजींची अपरिचित जीवन कहाणी.
जर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संपूर्ण आयुष्याबद्दल सगळा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर विश्वास पाटील सरांची महानायक ही कादंबरी नक्की वाचा..........
९) पुस्तकाचे शीर्षक :-टर्निंग पॉईंट ‖‖ मूळ लेखक :-ए पी जे अब्दुल कलाम
भारताचे सर्वात लाडके राष्ट्रपती आणि लाखो तरुणांचे प्रेरणास्थान असलेल्या ए पी जे अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्रातील हा दुसरा भाग ...! त्यांच्या चरित्राचा पहिला भाग हा अग्निपंख या पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झाला आहे एक शास्त्रज्ञ ते भारताची सर्वात महत्वाची व्यक्ती इथपर्यंतचा त्यांचा प्रवास निश्चितच तुम्हा आम्हाला स्फूर्तिदायक असाच आहे.
या पुस्तकात कलामांनी राजकारणात येण्यापूर्वीची त्यांची पार्श्वभूमी स्पष्ट केली आहे ; त्यांनी राष्ट्रपती होण्याचे का ठरवले त्यामागील कारणे आणि घडामोडी यांचा मागोवा घेताना कलामांनी अनेक राजकीय गोप्य स्फोट नाव न घेता केले आहेत. कलाम सरांची मनीषा भारताला २०२० सालापर्यंत महासत्ता बनवण्याची होती या पुस्तकात त्यांनी त्या गोष्टीची ब्लूप्रिंट कशी असेल याबद्दल सविस्तर उहापोह केला आहे.
कलाम सर हे मूलतः कट्टर देशभक्त , उत्तम शिक्षक आणि नम्र व्यक्तिमत्व होते हे या पुस्तकातून प्रकर्षाने अधोरेखित होते आणि तरुणाईसाठी हा आदर्शवाद अतिशय उत्तम आहे .
marathi motivational books list
१०)पुस्तकाचे शीर्षक :-स्टीव्ह जॉब्ज एक झपाटलेला तंत्रज्ञ ‖‖ मूळ लेखक :- अच्युत गोडबोले
जेव्हा जगातील सर्वात प्रभावशाली उद्योजकांची नावे घेतली जातात, तेव्हा त्यामध्ये एक नाव निश्चितच येते आणि ते नाव आहे स्टिव्ह जॉब्स (Steve Jobs).या पुस्तकात अच्युत गोडबोले सरानी अप्पलच्या या संस्थापकांच्या सर्व पैलूंचे अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे.
स्टीव्ह जॉब्स दत्तक घेण्यात आले होते . त्यांचे खरे वडील सिरियाचे मुस्लिम होते . स्टीव्हचे खरे वडील कॅलिफोर्नियामध्ये रेस्टॉरंट चालवत होते. जॉब्सने बर्याच वेळा त्याच्या वडिलांच्या रेस्टॉरंटमध्ये जेवणही जेवले जेवले होते, परंतु जॉब्स ला व त्याच्या वडिलांना एकमेकांच्या नात्याबद्दल माहित नव्हते. स्टीव्ह जॉब्सने वयाच्या १२ व्या वर्षी प्रथम संगणक पाहिले. स्टीव्ह जॉब्स महाविद्यालयातील आपल्या मित्रांच्या खोलीत खाली जमिनीवर झोपायचे . थंड पेयाच्या बाटल्या विक्रीतून येणाऱ्या थोड्या फार पैशातच जेवण जेवत असे . ते दर रविवारी ११ किलोमीटर चालत जाऊन श्री कृष्णाच्या मंदिरात आठवड्यातून एकदा जाऊन पोटभर जेवण जेवायचे . १९८४ मध्ये त्यांना स्वतःच्या Apple कंपनी तुन नोकरी वरून काढून टाकण्यात आलेले.
एवढ्या सर्व कठीण परिस्थिती मधून त्यांनी जगाच्या शिरपेचात स्वतःची वेगळी ओळख बनवली म्हणून हे पुस्तक अतिशय प्रेरणादायी आणि वाचनीय आहे.
पुस्तकांच्या वाचनाने आपल्या दृष्टिकोनामध्ये एक सकारात्मक बदल होतो ; आपला जगाकडे बघण्याचा चष्मा बदलतो ; हा दृष्टिकोनच आपल्या यशस्वी होण्याच्या मार्गात आपला सोबती असतो. तसेच एखाद्या वाईट गोष्टीत देखील आपण चांगले शोधू शकतो आणि नेमका हाच बदल आपल्या व्यक्तिमत्वाच्या वाढीसाठी खूप महत्वाचा असतो म्हणून आपण सर्वानी जास्तीत जास्त चांगली आणि प्रेरणादायी पुस्तके वाचली पाहिजेत यासोबतच त्यांच्यावर चिंतन, मनन सुद्धा केले पाहिजे.
आणखी वाचा :-
ती ५ पुस्तके ज्यांनी तुमचं व्यक्तिमत्व उजळून निघेल (क्लीक करा)
सकाळी लवकर उठा आणि यशस्वी व्हा (क्लीक करा)
जीवनाला नवी दिशा देणारी १० प्रेरणादायी पुस्तके (क्लीक करा)
तुमच्या मनात प्रेरणेची ज्योत जागवणारी पुस्तके ...!(क्लीक करा)
0 टिप्पण्या