ऑनलाईन पैसे कमावण्याचे ७ खरे मार्ग.!

                    मी खात्रीपूर्वक सांगतो की आपल्या प्रत्येकाच्या माहितीतला एक तरी व्यक्ती असेल जो ऑनलाईन काम करून चांगले पैसे कमवत असतो. तुम्ही विचार कराल की, काय अवघड आहे ऑनलाईन मोबाईल /लॅपटॉप चा वापर करून मी पण पैसे कमवू शकतो. परंतु या वाटेला जाणारे बहुतांश जण एकतर अपयशी ठरतात किंवा मग ऑनलाईन पैसे कमावण्याच्या नादात एखाद्या फ्रॉड किंवा फसवेगिरिचा बळी ठरतात आणि या वाटेला परत न जाण्याचे ठरवतात . पण मित्रांनो विश्वास ठेवा इंटरनेटवर ६० ते ७० टक्के पर्याय असे आहेत की, तुम्ही तुमचा एक नया पैसा ही खर्च न करता पैसे कमावू शकता.! भरपूर लोक जे अपयशी होतात त्यामागील मुख्य कारण आहे ते म्हणजे योग्य माहितीचा अभाव..! खूप लोक घरबसल्या कमावत आहेत...काही लोकं त्यांच्या पगारापेक्षा जास्त कमवत आहेत फक्त प्रत्येक जण ही गोष्ट सांगत बसत नाही आणि त्यामुळे अजूनही बरेच लोक या गोष्टीबद्दल अनभिज्ञ आहेत..!



या लेखात ऑनलाईन पैसे कमावण्याचे ७ मार्ग सांगितले आहेत तुम्ही फक्त थोडा वेळ दिला आणि मेहनत घेतली तर हे तुमच्यासाठी पण १०० टक्के काम करेल..! हा लेख माझ्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे यातील सर्व पर्याय मी स्वतः वापरून पाहिले आहेत. त्यामुळे प्रत्येक पर्याय सांगताना मी तुम्हाला सध्या लोक या मार्गाने कसा पैसा कमवत आहेत आणि तुम्ही त्याच मार्गाने पण स्मार्ट आणि सोप्या पद्धतीने पैसे कमवण्यासाठी काय केले पाहिजे ते पण सांगेल..! म्हणून पूर्ण पोस्ट बारकाईने वाचा..!

१) कंटेंट क्रिएशन आणि मार्केटिंग (content creation and marketing in marathi)

आवश्यक कौशल्ये:- टायपिंग , सोशल मीडिया , इमेज एडिटिंग.
गुंतवणूक :- ०₹ (शून्य रुपये)

ज्याप्रमाणे एक ईमारत उभी करण्यासाठी पाया महत्वाचा असतो तसेच ऑनलाईन पैसे कमावण्याचा मुख्य पाया म्हणजेच कंटेंट क्रिएशन...!
आपण इन्स्टाग्राम युट्युब आणि फेसबुक ह्या सगळ्याकडे मनोरंजाचे साधन म्हणून बघतो परंतु त्याद्वारे पण पैसे कमावले जातात हे काही सांगण्याची गरज नाहीये.
सध्याचा सर्वात प्रभावशाली प्लॅटफॉर्म म्हणजे इन्स्टाग्राम आहे जर तुमचे इन्स्टाग्राम वर १० हजार च्या आसपास फॉलोअर्स असतील तर तुम्हाला एक जाहिरात तुमच्या अकाउंट वर पोस्ट करण्यासाठी २०० रुपये कमीतकमी दिले जातात . जितके जास्त फॉलोअर्स तेवढी किंमत पण जास्त मिळते. जर तुम्ही व्हिडिओ तयार करू शकत असाल तर युट्युब उत्तम पर्याय आहे पण युट्युबच्या मानाने इन्स्टाग्राम आणि फेसबुक दोन्ही अतिशय वेगाने प्रसिद्धी देणारे प्लॅटफॉर्म आहेत. आता लोक काय चुका करतात ते बघूया ..!
ते इन्स्टाग्राम/ फेसबुकवर वर एखादे page ओपन करतात.. काही दिवस व्यवस्थित पोस्ट करतात पण त्यांची अपेक्षा असते की काही दिवसातच त्यांना एकदम जास्त फॉलोअर्स/लाईक मिळाले पाहिजेत जेव्हा की त्यांचे कंटेंट हे कॉपी केलेलं किंवा काही नाविन्य नसलेले आणि अनाकर्षक असतात.
सातत्याचा अभाव हे एक मुख्य कारण आहे आणि या गोष्टीमुळे ते अपयशी होऊन ही गोष्ट सोडून देतात.
आता तुम्हाला काय करायचे आहे ते सांगतो
१) आपल्या page चा एक niche म्हणजेच आपण कोणत्या विषयावर पोस्ट बनवणार आहोत ते ठरवा.
यानंतर तुम्ही आपल्या niche मधील इतर page काय करत आहेत ते बघा त्यांच्या कडून प्रेरणा घेऊन स्वतःचे नवीन कंटेंट तयार करा जे त्यांच्यापेक्षा ही छान आणि वरचे असेल . tags hashtags यांचा योग्य वापर करा.
उदा. माझे पुस्तक परीक्षण करण्याचे page आहे तर दुसऱ्या page वरील पोस्ट पेक्षा माझ्या पोस्ट मधील image चांगले आणि कल्पक दिसले पाहिजे नवनवीन hashtags वापरले पाहिजे तसेच पोस्ट खालील description वर पण जास्त मेहनत मी घेतली पाहिजे जेणेकरून त्याच्या page पेक्षा छान पोस्ट तयार होईल आणि user आकर्षित होतील.
किंवा हेही कठीण वाटत असेल तर

२) एक page तयार करून त्याचा niche ठरवा. त्या niche संबंधित अकाउंट शोधा.
Repost app चा वापर करून त्यांनी तयार केलेल्या पोस्ट डाउनलोड करून तशाच आपल्या page वर अपलोड करा आणि त्यांना टॅग करून क्रेडिट द्या.
उदा. मी बाईक प्रेमी niche घेऊन एक page बनवले त्यात मी वेगवेगळ्या बाईकर्स चे फोटो टाकले व त्यांना tag केले तर तेही त्यांच्या story किंवा post मध्ये thank you म्हणून माझ्या page ला tag करतील आणि त्याच्या फॉलोअर्स मध्येही आपली फुकट प्रसिद्धी होईल व आपल्या page वरील भेटी/फॉलोअर्स वाढतील.

इन्स्टाग्राम ची पोस्ट बनवण्यासाठी geulgram हे app खूप सोपे आणि छान आहे त्याचा वापर करा.

ही संकल्पना तुम्हाला फक्त सातत्याने एक महिना करत राहायची आहे ...! त्यांनंतर तुमच्या page ची वाढ जोरात चालू होईल
लक्षात ठेवा consistency is the key.

२) ऑनलाईन रिसेलिंग (online reselling in marathi)

आवश्यक कौशल्ये :- सोशल मीडिया
गुंतवणूक :- शून्य रुपये

आपल्या माहितीतील एक तरी असा व्यक्ती असेल जो त्याच्या व्हाट्सअप्प वर /सोशल मीडिया अकाउंट वर कपडे/ साड्या यांचे फोटो त्यांच्या किमतीसह टाकतो आणि खाली कॅपशन असते की contact me किंवा message me for buy. तुम्ही विचार करत असाल ह्या साड्या हे सामान याच्याकडे आल्या कुठून ?
तर त्याच अस आहे की मिशो (meesho) नावाचे एक app आहे त्यावर आपल्याला उपयोगी अश्या भरपूर वस्तू भेटतात (amazon सारखे) त्या आपण खरेदी करू शकतो किंवा दुसऱ्यांना विकू शकतो म्हणजे एखादी साडी आहे त्याची किंमत मिशो वर ५०० रुपये आहे तर मी माझ्या व्हाट्सअप्प ग्रुपला आणि स्टेटस ला त्या साडीचे फोटो ठेवेल आणि किंमत सांगेल की ७०० रुपये आहे आता जर माझ्या मित्राला त्याच्या आईसाठी ही साडी आवडली तर तो मला मेसेज करेल ही साडी पाहिजे म्हणून मग मी फटाफट मिशो वर जाऊन ती साडी ऑर्डर करेल ५०० च्या साडी वर माझे २०० रुपये कमिशन ऍड करेल व मित्राच्या घरचा पत्ता तिथे टाकेल. आता ती साडी मित्राच्या घरी पोचल्यावर तो ७०० रुपये देईल त्यांनतर माझ्या बँक खात्याला मिशोद्वारे २०० रुपये जमा होतील . म्हणजे शून्य गुंतवणूक करून आपण घरबसल्या पैसे कमवू शकता..
आता समस्या अशी आहे की मिशोबद्दल बहुतांश लोकांना अगोदर च माहिती आहे.
तुम्ही आताही याचा वापर करू शकता हे अजूनही खूप चांगले काम करते त्याचबरोबर shop101 नावाचे पण अँप आहे ते ही रिसेलिंग अँप आहे पण मिशोएव्हढे प्रसिद्ध नाहीये ते ही तुम्ही वापरू शकता.
पण मला तुमच्यासाठी एक स्मार्ट पर्याय सांगायचा आहे.
तुम्ही indiamart किंवा justdial वरून डायरेक्ट सप्लायर्सचे कॉन्टॅक्ट मिळवू शकता आणि विक्रेता आणि ग्राहक यांच्या मधला दुवा बनून कमिशन मिळवू शकता.
या दोन्ही प्लॅटफॉर्म वर सप्लायर्स आणि मनुफॅक्चरर्स यांचा थेट संबंध आपल्याशी जोडला गेल्यामुळे इतर प्लॅटफॉर्म (amazon /flipkart)पेक्षा स्वस्त किमतीत आपल्याला वस्तू भेटतात .
म्हणजे विकत घेणाऱ्याने जर किमतीची क्रॉस चेकिंग केली तर त्याला जास्त तफावत दिसणार नाही आणि याच ठिकाणी आपण कमिशन कमवू शकतो.
यात फक्त आपल्याला ग्राहक कसे मिळवायचे ते जमले पाहिजे जे आपण सोशल मीडिया आपली ओळखी ब्लॉग किंवा वेबसाईट या आधारे मिळवू शकतो.

३) ब्लॉगिंग/वेबसाईट (Blogging in marathi)

आवश्यक कौशल्ये:- इंटरनेट सर्च , टायपिंग , बेसिक कॉम्प्युटर ज्ञान.
गुंतवणूक :- शून्य रुपये (इतर खर्च ऐच्छिक)


तुम्ही स्वतःचा एक ब्लॉग किंवा वेबसाईट तयार करू शकता त्यावर वेगवेगळे लेख/कंटेंट प्रकाशित करून त्याला गुगल वर रँक करू शकता. त्यांनतर गुगल अडसेन्स ला apply करून तुम्ही त्याद्वारे पैसे कमवू शकता.
उदा. मराठीगंध ही माझी वेबसाईट किंवा ब्लॉग आहे तुम्ही त्याला गुगल वर सर्च केलात तर तुम्हाला माझी साईट दिसेल. तसेच इतर भरपूर सर्च साठी जसे की इकिगाई मराठी किंवा मराठी pdf पुस्तके असे सर्च केले तर तुम्हाला माझी वेबसाईट पहिल्या page वरच दिसेल .
आता तुम्ही या पोस्टवर आलात तर तुम्हाला पोस्ट वाचता वाचता जाहिराती दिसतील.
या जाहिरातीवरील प्रत्येक क्लीकमागे मला डॉलर मध्ये पैसे मिळतात.
तुम्ही वर्डप्रेस द्वारे तुमची वेबसाईट बनवू शकता पण त्यासाठी तुम्हाला ४-५ हजार गुंतवावे लागतील.
ब्लॉग/वेबसाईट बनवणे ही आजच्या काळात नवीन गोष्ट राहिलेली नाही..!
तुम्ही पण तुमचा ब्लॉग/वेबसाईट blogger.com वरून मोफत बनवू शकता css author या साईटवरून मोफत theme घेऊन आपल्या वेबसाईटला प्रोफेशनल लूक देऊ शकता.
अगोदर कंटेंट किंवा लेख कसे लिहितात हे शिका त्यासाठी quora.com वरील लेखांची मदत घ्या..! त्यांनतर एखाद्या विषयावर पोस्ट लिहून ते गुगल सर्च काँसोल च्या मदतीने गुगल वर रँक कसे करावे याची माहिती घ्या. ही सर्व माहिती युट्युब वर उपलब्ध आहे एकदा तुम्हाला या सगळ्या गोष्टींचे ज्ञान आले की मग तुम्ही डोमेन नेम विकत घेऊन अडसेन्स ला apply करा जेणेकरून तुमची कमाई सुरू होईल.
अडसेन्स शिवाय तुम्ही तुमच्या वेबसाईटवर दुसऱ्यांच्या जाहिराती दाखवून त्यांचे कंटेंट प्रोमोट करूनही पैसे मिळवू शकता.
मित्रानो ब्लॉग/वेबसाईट बनवणे व त्याला चालू ठेवणे हे थोडे कठीण काम आहे पण तुम्ही हे नक्की शिका कारण हा ऑनलाईन कमाईचा सर्वात मोठा स्रोत आहे. थोडा वेळ लागला तरी जिद्द सोडू नका.

४) वेबिनार होस्टिंग (webinar hosting in marathi)

आवश्यक कौशल्ये:- गुगल मीट , झूम, वेबेक्स.
गुंतवणूक :- शून्य रुपये


या लोकडाऊन च्या काळात ऑनलाईन क्लासेस आणि कोर्सेस यांची खूपच चलती झाली.
तुमच्याकडे देखील एखादे असे कौशल्य नक्की असेल जे तुम्ही दुसऱ्यांना ऑनलाईन माध्यमातून शिकवू शकता तर हा पर्याय खास तुमच्यासाठी आहे . बहुतांश लोक हे एक डेमो वेबिनार ठेवतात व त्यांनंतर पुढील वेबिनार अटेंड करण्यासाठी तुमच्याकडून फी घेतली जाते.
परंतु तुम्ही तुमच्या वेबिनार साठी ऍडमिशन फी ठेवा आणि ती पण जास्तीत जास्त लोक देऊ शकतील अशी ठेवा .तुम्ही शिकवत असलेल्या गोष्टींचा plan, ppt तयार ठेवा तसेच सहभागी असलेल्यांना प्रमाणपत्र सुद्धा द्या ज्याचे template तुम्हाला इंटरनेट वर आरामात भेटून जातील.
आणि यासाठी आवश्यक असलेलं सहभागी तुम्हाला व्हाट्सअप्प ग्रुप फेसबुक आणि इन्स्टाग्राम वरून भेटतील.जर तुमच्याकडे एकही कौशल्य नसेल तरी ही काळजी करू नका .
Youtube वर विविध विषयांवरील भरपूर कोर्स आहेत तुम्ही ते शिकून घेऊन त्यावर थोडा आणखी रिसर्च करून बदल करून त्याला तुमच्या स्वतःच्या भाषेत मांडा याने दोन फायदे होतील एक म्हणजे तुम्हाला पैसे मिळतील आणि दुसरे म्हणजे तुम्हाला ती गोष्ट दुसऱ्यांना शिकवायची असल्याने तुम्ही काळजीपूर्वक ती गोष्ट शिकाल आणि त्यात मास्टर व्हाल..!

५) कॉल मी ४ (callme4 app)

आवश्यक कौशल्ये :- संभाषण कौशल्ये
गुंतवणूक :-शून्य रुपये


जर मी तुम्हाला सांगितले की तुम्हाला मी फोन वर बोलायचे पैसे देईल तर एकतर तुम्ही मला हसाल किंवा वेड्यात काढाल..!
पण हे खरे आहे callme4 app वर तुम्हाला फोन वर बोलण्याचे पैसे मिळतात. तुम्ही फक्त यावर एक अकाउंट ओपन करून त्यात स्वतःबद्दल माहिती लिहा जसे की तुम्हाला कशाबद्दल जास्त ज्ञान आहे कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही मार्गदर्शन करू शकता. त्यांनतर तुम्ही दर मिनिटाला किती चार्ज घ्याल ते सिलेक्ट करा .
आता हे काम कसे करते ते बघूया समजा मला शेयर मार्केट बद्द्ल चांगली समज आहे तर मी त्याबद्दल माझ्या प्रोफाइल वर मेंशन करेल आणि माझा चार्ज हा प्रतिमिनीट ५ रुपये असा ठरवेल. ज्या व्यक्तीला शेयर बाजारबद्दल माहिती हवी असेल तो व्यक्ती या अँप वरून मला फोन करेल व प्रत्येक मिनिटाला ५ रुपये चार्ज देईल व ते पैसे मला भेटतील.
तुमचे संभाषण कौशल्य जेवढे चांगले असेल तेवढी जास्त कमाई तुम्ही या app द्वारे करू शकता..!

६) अफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing in Marathi)

आवश्यक कौशल्ये:- सोशल मीडिया ,कंटेंट रायटिंग ,इंटरनेट सर्च...
गुंतवणूक :- शून्य रुपये


तुम्ही एखादे प्रोडक्ट पहिल्यांदा विकत घेणार असाल तेव्हा काय करता..?
अगदी बरोबर..! तुम्ही त्याबद्दल गुगल वर सर्च करून ते चांगले आहे का वाईट ते बघता...!
जर तुम्ही एखाद्याला हे प्रॉडक्ट का घ्यावे हे पटवून देऊ शकता तर हे क्षेत्र तुमच्या कामाचे आहे जर तुमच्या कडे हेही कौशल्य नसेल तरी काही हरकत नाही मी त्याबद्दल ही मार्गदर्शन करेल.
एखाद्या व्यक्तीला मोबाईल विकत घ्यायचा असतो तर तो गुगल सर्च करून विविध वेबसाईटवर त्या मोबाईलबद्दल असलेले अभिप्राय बघतो त्या पोस्ट मध्ये एक लिंक दिलेली असते buy now ची त्यावर क्लीक केल्यावर तो व्यक्ती अमेझॉन/फ्लिपकार्ट च्या वेबसाईटवर जातो आणि तिथून जर त्याने तो मोबाईल खरेदी केला तर त्या मोबाईलच्या रकमेच्या काही टक्के रक्कम कमिशन म्हणून त्या वेबसाईट मालकाला जाते ज्याच्या लिंक वरून तो अमेझॉन वेबसाईटवर जातो.
अमेझॉन /फ्लिपकार्ट वर हजारो प्रोडक्ट आहेत ज्यांचे अफिलिएट मार्केटिंग करून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता तसेच हे दोन सोडून अजून भरपूर वेबसाईट आहेत ज्याद्वारे तुम्ही अफिलिएट मार्केटिंग करू शकता.
उदा.

मी तुम्हाला यातला सोपा उपाय सांगतो Cuelinks वर हजारो प्रोडक्ट आहेत त्यापैकी एक निवडा..!
त्यांनंतर quora.com वर जाऊन तिथे त्या प्रोडक्ट शी संबंधित प्रश्न शोधा त्यावर तुमच्या भाषेत ऊत्तर लिहून तुमची अफिलिएट लिंक तिथे पेस्ट करा..!
उदा. एखाद्याने प्रश्नामध्ये आपली समस्या सांगितली असेल की मला जोरदार आवाजाचा त्रास होतो तर तुम्ही त्याला उत्तरामध्ये एअर बड्स सारखे प्रॉडक्ट वापरण्याचा सल्ला देऊन अफिलिएट लिंक तिथे पोस्ट करा.
याद्वारे तुमच्या लिंक वर भरपूर क्लीकस येतील आणि तुमच कमिशन वाढेल.

७) क्रिप्टो करन्सी ट्रेडिंग (cryptocurrency trading)

कौशल्ये :- wazirex app चे बेसिक ज्ञान
गुंतवणूक :- कमीत कमी १००० रुपये जास्तीत जास्त ऐच्छिक

२०२१ मध्ये डोजकोईन बिटकॉईन आणि एलोन मस्क या तीन गोष्टी मुळे क्रिप्टो करन्सी मार्केट खूप चर्चेत आले.
या लेखातील सर्व पर्यायांपैकी फक्त हा एकच पर्याय आहे ज्यात गुंतवणुकीची आवश्यकता आहे.
सध्या गुंतवणूक दार शेयर मार्केट पेक्षा क्रिप्टो मध्ये पैसे लावण्यावर जास्त भर देत आहेत कारण हे मार्केट २-३ गोष्टीमुळे शेयर मार्केट पेक्षा उजवे ठरते
१)हे मार्केट कधीच बंद नसते २४/७ चालू असते.
२) यात एकदम बुडण्याचा धोका शेयर मार्केट पेक्षा कमी असतो.
३) याचे ब्रोकरेज चार्जेस कमी असतात.

भरपूर लोक याद्वारे रोज लाखो हजारो कमवत आहेत .
आता बोलूया आपल्याबद्दल ..!
तर आपण २ प्रकारे पैसे कमवू शकतो
पहिल्या प्रकारात तुम्ही रिसर्च करून बाजारात नवीन आलेले कोईन ज्याचा भाव कमी आहे(सध्या मुनसेफ ,शिबा इनु इ.) ते विकत घ्या त्याला महिनाभर विकू नका धरून ठेवा महिनाभरानंतर प्रत्येक कोईन ५० ते १०० पटीने वाढलेला असतो त्यावेळी तुमच प्रॉफिट काढून घ्या..!
दुसऱ्या प्रकारात कोणतेही एक कोईन निवडा उदा. Matic(मॅटिक) आता हा कोईन दिवसभरात रुपयांनी वर खाली होत असतो म्हणजेच त्याच्या भाव हा सध्या दिवसभरात १३५₹ ते १४५₹ दरम्यान वर खाली होत असतो जर तुम्ही १३५ ला विकत घेऊन १४५ ला हा कोईन विकला तर एका कोईन मागे तुम्हाला १० रुपये मिळतील .
या ट्रिक च्या मदतीने तुम्ही १००० रुपयाला कमीत कमी १०० रुपये प्रॉफिट कमवू शकता.
यासाठी binance coinswitch आणि इतरही भरपूर app आहेत पण
माझ्यामते wazirex हे या सगळ्यांपेक्षा वापरायला सोपे आणि विश्वासनिय app आहे.
मित्रानो क्रिप्टो मार्केट हे रिस्की असते त्याच पूर्ण ज्ञान घ्या मगच त्यात पैसे गुंतवा आणि तेही तेवढेच गुंतवा ज्यामुळे तोटा झाला तरी काही फरक पडणार नाही..!

इतर :-

फ्री लांसिंग :- या प्लॅटफॉर्म द्वारे तुम्ही डिजिटल क्षेत्रातील कामे मिळवून पैसे कमवू शकता.
वेबसाईट:-

1. Toptal

2. Guru

3. Upwork

4. Freelancer.com

5. People Per Hour

6. Aquent

7. 99designs

8. Solidgigs


पेड सर्व्हे
याद्वारे तुम्ही सर्वेक्षण करून पैसे कमवू शकता.
वेबसाईट:-
SwagbucksMyPointsInboxDollars,

हे पर्याय पण तुम्ही वापरून बघू शकता यांच्यावर भर न देण्याचे कारण म्हणजे या क्षेत्रात असलेली स्पर्धा . तुम्ही ज्याप्रमाणे मेहनत घ्याल त्याप्रमाणात तुम्हाला परतावा मिळेल का नाही याबद्दल शंका आहे.
हे दोन्ही क्षेत्र नवीन माणसासाठी कठीण आहेत पण अशक्य नाही. एकदा तुम्ही सरावले की मग तुम्ही यातूनही कमाई करू शकता.
मित्रांनो लोकडाऊन च्या या कठीण कालखंडात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या धंदे बंद पडले पण या ऑनलाईन घरबसल्या कमाईच्या क्षेत्राला कधी काही अडचण आली नाही म्हणून आपणही स्वतःला अपडेट केलं पाहिजे . हर्षद मेहता सिरीज तर सगळ्यांनी बघितली असेल त्यातला चांगला वाईट भाग सोडला तर एक आयडिया मला आवडली ती म्हणजे एखादया क्षेत्रातील उणीवा शोधून त्याद्वारे पैसे कमावणे. वाईट मार्गाने न जाता या क्षेत्रातील कोणती गोष्ट आहे जी इतरांच्या लक्षात अजून आलेली नाही आपण त्याचा फायदा उचलू शकतो का यावर विचार करा कारण हे क्षेत्र दररोज अपडेट होणारे आहे आणि त्यात सफल होण्याचा मुख्य मंत्र आहे की, जुने काम नव्या पद्धतीने करा.
आपल्या सर्व मित्रांना ओळखीतल्या लोकांना ही पोस्ट शेयर करा जेणेकरून त्यांना काहीतरी फायदा होईल /मार्ग मिळेल. आपले काही अभिप्राय / सूचना असतील तर नक्की नोंदवा..!
धन्यवाद...!

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या