शेयर बाजाराची ओळख करून देणारी सर्वोत्तम मराठी पुस्तके.


information about share market in marathi

 १) भारतीय शेयर बाजारची ओळख जितेंद्र गाला

शेयर बाजारात करोडपती बनण्याची गुरुकिल्ली...!

अशी लक्षवेधी मार्केटिंग बघून साहजिकच पुस्तकात कोणतं ज्ञानभांडार आहे हे जाणायची उत्सुकता लागते. पुस्तकाचा फॉरमॅट अगदीच शैक्षणिक पुस्तकासारखा आहे. हे पुस्तक शेअर बाजारातील नवख्या गुंतवणूकदारांसाठी किंवा ज्यांना शेअर बाजार म्हणजे नेमकं काय हे जाणून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी आहे.

नक्कीच पुस्तक वाचून तुम्हाला शेअर बाजारातील बऱ्याचशा गोष्टी समजतील पुस्तकात शेअर मार्केट मधील प्रत्येक विषयाबद्दल सखोल लिहलं आहे आणि वाचकांना समजेल अशा सोप्या पद्धतीने लिहिलं आहे..तुम्ही मराठी भाषेत शेअर बाजार म्हणजे नक्की काय हेच शोधत असाल तर नक्की हे पुस्तक वाचाच..!

आपल्याला ज्या वेगात संपत्तीची वाढ हवी असते त्यावेगाने बँकेत संपत्तीची वाढ होत नाही. अशा परिस्थितीत विवेकाने आणि थोडी जागरूकता दाखवून आपली संपत्ती योग्य विस्तृत क्षेत्राकडे वळवली तर आपल्या गरजेनुसार तिच्यात वाढ होऊ शकते आणि त्यासाठी सुरक्षित क्षेत्र आहे शेअर बाजार ..ते समजावून घेण्यासाठी वाचा हे पुस्तक.

learn share market in marathi

२) शेयर बाजार खजिन्याची किल्ली आनंद कुमार



या पुस्तकाला खऱ्या अर्थाने शेयर बाजारची ABCD म्हणता येईल . या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक माणसाचे शेकडो किंवा हजारो शंका असतात तर काही म्हणतात मला यात काही म्हणजे काही कळतच नाही तर त्यांच्यासाठी हे अगदी समर्पक पुस्तक आहे.

                        


एकदम मूलभूत गोष्टी पासून सुरुवात करून मोठमोठ्या संकल्पना सगळं अगदी स्वच्छ आणि सोप्या शब्दात लेखकाने मांडले आहे.तसेच प्रत्येक गोष्ट समजून सांगताना आपल्या रोजच्या जीवनातील उदाहरनांचा चपखल वापर केला आहे.
सुरुवात कोठून व कशी करावी इथून तर धोके टाळण्यासाठी काय काय करावे शेयर ची निवड आणि खरेदी विक्री कशी करावी या सगळ्या गोष्टींचे उत्तर यात आहे.फक्त शेयर मार्केट नाही तर म्युच्युअल फ़ंड एस आई पी या वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक करावी का नाही त्यातील बारकावे काय आणि धोके काय यासारख्या बाबींचे विस्तृत आणि तार्किक विश्लेषण आपल्याला या पुस्तकात बघायला मिळेल.

share market trading in marathi


३) वॉरेन बफे अतुल कहाते



वोरेन बफे यांनी फक्त वयाच्या अकराव्या वर्षी शेयर बाजारात पाऊल ठेवले आणि तरीसुद्धा आजही त्यांना वाटते की ते या क्षेत्रात खूप उशिराने आले...! या माणसाने त्याची ९९ टक्के संपत्ती (१०० बिलयन डॉलर) फक्त शेयर आणि गुंतवणूक यातून मिळवली आहे.
वॉरन बफे जगातील सर्वात मोठ्या विमान कंपनीचे मालक आहेत.त्यांची कंपनी बर्कशायर हाथवेच्या (Berkshire Hathaway) मालकीच्या ६३ कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांच्या CEO's
(कार्यकारी अधिकारी) ना ते फक्त वर्षाला एक पत्र लिहितात.
सर्वCEO's ना त्यांनी दोन नियम सांगीतले आहेत.
पहिला नियम कधीही आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे बुडणार नाहीत याची काळजी घ्या.
दुसरा नियम कधीही पहिला नियम विसरु नका.
ज्या काळात लोकांना शेयर बाजार काय आहे हे माहीत नव्हते त्या काळात ते बाजाराचे अनभिषिक्त सम्राट होते
गुंतवणूक कशी केव्हा आणि करावी याचे अनेक उदाहरणे त्यांच्या जीवनप्रसंगातून तुमच्या समोर येतील .अतुल कहाते यांनी अतिशय सोपे आणि वाचनीय असे लेखन केले आहे


share market basic information in marathi

४) इंटेलिजेंट इन्व्हेस्टर बेंजामिन ग्राहम



१९४९ साली प्रकाशित झालेलं हे पुस्तक आज ७० वर्षानंतर देखील तेवढेच प्रभावी आहे .तर असे नेमकं काय आहे या पुस्तकात?? वॉरेन बफे ने सुद्धा या पुस्तकाबद्दल गुंतवणूक या विषयावरील माझ्या माहितीतील सर्वात चांगले पुस्तक असे म्हटले आहे.
बेंजामिन ग्राहमला (लेखकाला) सामान्य माणसासाठी गुंतवणूकिवर ज्ञान देणारे पुस्तक लिहायचे होते आणि त्याने लिहिलेले हे पुस्तक खूप जास्त यशस्वी झाले त्याला कारणही तसेच होते. अतीशय क्लिष्ट संकल्पना लेखकाने अतिशय सोप्या शब्दात वाचकांसमोर ठेवले. यातील सर्वात महत्वाचा नियम असा आहे की आपल्या भावनांद्वारे चुकीचे गुंतवणूक निर्णय घेण्यापासून आपण नेहमी स्वतःला वाचवले पाहिजे.
शेयर बाजारात थोडे दिवस घालवल्यावर प्रत्येकाला असे वाटते की आपल्याकडे काहीतरी स्ट्रॅटेजी हवी जेणेकरून आपण जास्तीत जास्त नफा मिळवू शकू. हे पुस्तक आपल्याला स्वतःची अशी स्ट्रॅटेजी विकसित करण्यास मदत करते.योग्य वेळी योग्य गुंतवणूक कशी करावी आपला पैसा बुडण्यापासून कसा वाचवला पाहिजे या विषयावर लेखकाने सखोल विवेचन केले आहे.


marathi share market


५)टेक्निकल अनालयसीस आणि कँडल स्टिकचे मार्गदर्शन रवी पटेल



इन्ट्राडे ट्रेडिंग करताना तसेच फ्युचर ऑप्शन मध्ये टेक्निकल अनालयसीस खूप महत्वाचा आहे. एखाद्या गोष्टीची जितकी जास्त माहिती तुमच्याकडे असेल तेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही त्या गोष्टीचा अंदाज बांधू शकता. शेयर बाजारात २ प्रकारचे विश्लेषण म्हणजे अनालयसीस असतात १) मूलभूत विश्लेषण (Fundamental Analysis):- म्हणजे कंपनीची सध्या ची आर्थिक परिस्थिती, बॅलन्स शीट त्यांचे डिल्स या आधारे त्यांची शेयर किंमत वाढेल की कमी होईल हे सांगता येते.
२) तांत्रिक विश्लेषण(Technical Analysis):- म्हणजेच तुमच्याकडे असलेल्या डेटा आणि तांत्रिक माहिती आधारे तुम्ही हा शेयर वर जाईल का खाली याचा अंदाज बांधू शकता.
ह्या पुस्तकात लेखकाने तांत्रिक विश्लेषण आणि कँडल स्टिक पॅटर्न यांबद्दल अथ ते इति अस लिखाण केले आहे म्हणजे हे पुस्तक वाचल्यावर तुमची कोणत्याही प्रकारची शंका या विषयात राहणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या