(best marathi books to read before you die)
best marathi books to read 2020
best marathi books to read for students
Marathi books pdf free download
पुस्तकाचे नाव :-द सबटल आर्ट ऑफ नॉट गिविंग अ फ*
लेखक :- मार्क मांशन
मार्क मँशन ह्यांनी त्यांचे आयुष्य प्रवाहाच्या दिशेने (Conventional Way) जगून पाहिले परंतु इतर लोकांसारखी त्यांनापण निराशा हाती लागली. त्यांना एकेकाळी गिटारिस्ट बनायचे होते तर दुसरीकडे एक मॉडेल. निराशाजनक परिस्थितीतून निघण्यासाठी नंतर त्यांनी जवळजवळ २० पेक्षा जास्त देशांची सफर केली, आणि स्वतःला ह्या गोष्टींमध्ये व्यस्त ठेवायचा प्रयत्न केला परंतु त्यांना खरा आनंद आणि समाधान कशातच नाही मिळाले. मग त्यांनी आपले नेमके काय चुकलेय ते शोधण्याचा प्रयत्न सुरु केला आणि आपला अनुभव एका ब्लॉगवर लिहायला सुरु केला. (तुम्ही मार्क मँशन म्हणून गुगल केले असता तो मिळेल.) लिहायला सुरु केला. जसे जसे लोक त्यांना वाचू लागले त्यांना समजले की जो प्रोब्लेम मला झाला आहे तोच प्रोब्लेम हर दुसऱ्या व्यक्तीला आहे आणि मग त्यांनी ह्या सगळ्या त्रासाच्या आणि निराशाजनक परिस्थितीच्या तळाशी जायचे ठरवले..
द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फ*' या पुस्तकाचा सारांश थोडक्यात असा:-
१) ह्या पृथ्वीतलावर कोणालाही "यशस्वी - आनंदी - समाधानी" जीवन जगण्याची, आयुष्य तसं घडवण्याची पाककला (Recipe) माहित नाही. इथे प्रत्येक जण आपापल्या परीने आयुष्याचा अर्थ शोधत असतो म्हणून प्रत्येक जण वेगवेगळ्या दिशेला सतत पळत असतो.
२) आयुष्यात आपल्यासोबत जे काही घडते त्याला आपण चांगला "प्रतिसाद" देऊ शकतो ते आपल्या हातात असते. कोणत्याही गोष्टीला आपल्या आयुष्यात महत्व आपण देतो नी तेच आपण काढून घेतो म्हणून आयुष्यात वस्तू - व्यक्ती निवडतांना आपण खूप निवडक (Selective) असले पाहिजे.
३) हे जीवन जगत असतांना आपल्याला अनेक गोष्टीचा विचार करावा लागेल - त्यांच्यावर वेळ, पैसा, शक्ती खर्च करावी लागतील - थोडक्यात म्हणजे आपल्याला आयुष्यात कुठेनाकुठे तरी स्वतःची वाट लावूनच घ्यावी लागणार आहे - मग लेखक म्हणतात की असे असेल तर आपण ज्यामुळे आपली लावून घेऊ ते त्या "लायकीचे" पण हवे.
0 टिप्पण्या