मराठी रहस्यमय कादंबरी

महाभारताचे रहस्य ही ख्रिस्तोफर डोयल लिखीत सत्य कथेवर आधारीत कादंबरी अतिशय रहस्यमय आहे...!!
आधुनिक वैज्ञानिक काळात ज्या गोष्टी आणि सिद्धांत उजेडात येत आहेत त्यांचे मूळ कुठेतरी भारतीय संस्कृती मध्ये होते व ते कसे बेमालूमपणे लपवले गेले ह्याबद्दल पुराव्यानिशी दावा करणारे अतिशय वाचनीय पुस्तक....!
या पुस्तकाची समीक्षा खाली दिली  आहे

एखादी वेब सिरीज किंवा चित्रपट यावर बनावा एवढी रहस्यमय ही कादंबरी नक्कीच आहे..!

 

(best marathi books to read before you die)

best marathi books to read 2020

best marathi books to read for students

Marathi books pdf free download 

महाभारताचे रहस्य - ख्रिस्तोपर सी. डोयल :

महान सम्राट अशोकाला जगाचा विनाश करणाऱ्या एका प्राचीन आणि भयावह रहस्याचा शोध लागला होता. महाभारतात खोलवर ते रहस्य गाडून, 2300 वर्षांपूर्वी ते रहस्य जगापासून लपवून ठेवण्यात आलं होतं. काही हजार वर्षांनी त्या रहस्यामुळेच एका निवृत्त अणुशास्त्रज्ञाचा खून होतो. आपल्या पुतण्यासाठी तो केवळ ई-मेलच्या माध्यमातून काही संकेत ठेवतो. गुप्त प्राचीन सांकेतिक लिपीतील संकेतांमधून आणि 2,000 वर्षांपूर्वीच्या अवशेषांमधून त्याचा पुतण्या आणि त्याचे मित्र त्याच्या ई-मेलची उकल करतात. यांच्या या शोधमोहिमेत ते शक्तिशाली दुष्ट शक्तींच्या पाठलागामुळे भूतकाळातील रहस्ये आणि वर्तमानातील कारस्थाने यांच्या कचाट्यात सापडतात. शब्दांत मांडता न येण्याजोग्या भयानक दहशतीचा पगडा जगावर बसण्याआधी ‘ते’ गूढ ते उकलू शकतात का ?एकूण कादंबरीतील घटना वेगवान आहेत. वाचताना कुठेही रटाळ भाग नाही, सुरवातीपासून शेवटपर्यंत वाचकाला खिळवून ठेवण्याची क्षमता पुस्तकाच्या प्रत्येक परेग्राफ मध्ये आहे.पुस्तक एका बैठकीत संपण्या सारखे नाही.पुस्तकाचा एकूण सारांश असा की,अनपेक्षित पणे येऊन ठाकलेली जबाबदारी म्हणून महाभारत कालीन एका रहस्याचा शोधत कथेचा नायक विजय आणि त्याची टीम निघालेली असते,ऐतिहासिक रहस्यमयी कोडी सोडवत आणि त्यांच्या पाठीमागे लागलेल्या आतंकवादी संघटनांच्या कारवायांना तोंड देत हे जगाला संपवू शकणाऱ्या आशा रहस्या पर्यंत पोहोचते.

एखाद्या हॉलिवूड चित्रपटाला शोभेल असा घटनाक्रम आणि मांडणी आहे. या पुस्तकाची हार्ड कॉपी लिंक खाली दिली आहे आपण ती ऍमेझॉन वरून घरी मागवू शकता . 

 पुस्तकाची हार्ड कॉपी लिंक 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या