३ सर्वोत्कृष्ट अध्यात्मिक पुस्तके जी आपल्या जीवनाला दिशा देतील ..!

अध्यात्मिक पुस्तके


    अध्यात्म या विषयावर मराठी मध्ये बरीच पुस्तके आहेत मुळात अध्यात्म हा माझा आवडता विषय असल्यामुळे या विषयावरील भरपूर पुस्तके मी वाचली आहेत ; त्यातील मला आवडलेली पुस्तके खाली देत आहे.

१) योगी कथामृत ( ऑटोबायोग्राफी ऑफ योगी )  (खरेदी लिंक)

लेखक :- परमहंस योगानंद


१९४६ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाने पाश्चात्य जगाला अक्षरशः वेड लावले आणि खरे अध्यात्म समजावून सांगताना चमत्कार कसे होतात आणि त्यामागील विज्ञान कसे कार्य करते हे समजावून सांगितले. ५० विविध भाषामधून वाचले जाणारे अध्यात्म या विषयावरील हे सर्वाधिक लोकप्रिय पुस्तक आहे. क्रिया योग म्हणजे काय? त्याचा इतिहास , महावतार बाबा, लाहिरी महाशय आणि इतर सिद्धयोगी यांची माहिती आणि दृष्टांत विस्तृतपणे पुस्तकांत मांडले आहेत

यामधील अध्यात्मिक अनुभव आणि चमत्कार यांचा थांग लावताना बुद्धी कुंठित होते. एवढे हे पुस्तक अगम्य आणि आश्चर्यकारक अनुभवांनी परिपूर्ण आहे.

२) दिव्यत्वाची जेथ प्रचिती भाग १ आणि २   (खरेदी लिंक) 

लेखक :- श्री प्रमोद केने


श्री प्रमोद केने सरांचा सांसारिक दत्तभक्त ते अधिकारी पुरुष होण्यापर्यंतचा हा प्रवास...

सामान्य भक्तांकडून अचाट कार्य करवून घेणे हि दत्तप्रभूंची नित्यविनोदी लीला आहे. ते आपल्या भक्ताला निमित्त बनवून कशाप्रकारे कार्य संपादन करून घेतात हे या पुस्तकात दाखविले आहे. ह्या प्रवासात दत्तगुरुंनी आपल्या भक्ता कडून पर्वतराज गिरनार च्या १०८ हुन अधिक वाऱ्या कशा करून घेतल्या त्या वाऱ्यामध्ये आलेले अंगावर काटा आणणारे अनुभव आणि दृष्टांत नक्की आपले अष्टभाव जागृत करतील यात शंकाच नाही . दत्तगुरूंनी १२००० वर्षे तपश्चर्या करून पावन केलेली जागा म्हणजे गिरनार पर्वत आणि ह्या दुर्गम दत्तस्थळाचे महत्व प्रकाशित करण्यासाठी निवड झालेले भक्त शिरोमणी म्हणजे केने काका..!

३) कैलास मानस सरोवर एक अनुभूती (खरेदी लिंक)

लेखक :- सुभाष नाईक



कैलास पर्वत...!! साक्षात आशुतोष भगवान शंकराचे निवास स्थान तसेच लाखो करोडो वर्षांपासून सृष्टीच्या कल्याणासाठी तप करणाऱ्या ऋषीमुनींचे आश्रयस्थान..!

मानसरोवर यात्रा कशी करावी केव्हा करावी हे सांगतानाच यात्रेत आलेले आश्चर्यकारक अनुभूती लेखकांनी नमूद केल्या आहेत. मानस सरोवरा भोवती असणाऱ्या दिव्य गुंफा व अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी घडणाऱ्या आश्चर्यकारक अद्भुत घटना, मानसतीर्थाचे महत्व आणि फायदे , गंगेचे दिव्यफल व महत्व , कैलासावर कार्यान्वित असलेली अद्भुत ईश्वरी शक्ती यांचे वर्णन सुंदर पने ग्रंथात मांडले आहे.

तशी पुस्तके भरपूर आहेत पण वरील ३ पुस्तके मला खूप आवडलेली आहेत आपणही वाचा आपल्याला नक्की आवडतील...!!

धन्यवाद....!!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या