श्रीमंत होण्यासाठी कष्टासोबत बुद्धी आणि नियोजनाचीही जोड हवी ; एखादा मनुष्य किती पैसे कमावेल हे त्याच्या मेहनत करण्याच्या तयारीवर आणि त्याच्या विचार पद्धती वर अवलंबून असते. नेमक्या ह्याच गोष्टी शिकण्यासाठी पुस्तक आपल्याला मदत करतात.
खाली आर्थिक साक्षरता आणि श्रीमंती या विषयावरील अतिशय प्रसिद्ध आणि वाचनीय अशी काही पुस्तके दिली आहेत आशा करतो कि याने आपल्याला नक्की काहीतरी मदत होईल...!!
१)झिरो टू हिरो :- रश्मी बंसल
(२० मेहनती उद्योगपतींची यशोगाथा ज्यांनी MBA DEGREE च्या शिवाय आपला व्यवसाय उभारला)
२)रिच डॅड पुअर डॅड (मराठी) :-रोबर्ट कियोसकी
(पैसा बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे, तुमच्या विचारांवर काम करणं. हे काम रिच डॅड पुअर डॅड पुस्तक अप्रतिमपणे करत.
३)भारतीय शेयर बाजार ची ओळख :- जितेंद्र गाला
आपल्याला ज्या वेगात संपत्तीची वाढ हवी असते त्यावेगाने बँकेत संपत्तीची वाढ होत नाही. अशा परिस्थितीत विवेकाने आणि थोडी जागरूकता दाखवून आपली संपत्ती योग्य विस्तृत क्षेत्राकडे वळवली तर आपल्या गरजेनुसार तिच्यात वाढ होऊ शकते आणि त्यासाठी सुरक्षित क्षेत्र आहे शेअर बाजार ..ते समजावून घेण्यासाठी वाचा हे पुस्तक.
४)श्रीमंत होण्याची सूत्रे :- वेल्स दि वटल्स
यातील सूत्रे एखाद्या व्यक्तीने आत्मसात केली तर ती व्यक्ती निश्चितरूपाने श्रीमंत होऊ शकता
५) कॅश फ्लो क्वाड्रंट :- रॉबर्ट कियोसकी
कमी काम करून काही लोक कसे जास्त पैसे कमवतात? आपल्याला आणखी पैसे कसे मिळतील आणि कसे? आपण लवकरच श्रीमंत कसे बनू शकाल हे पुस्तक आपल्याला सांगेल.
६)विपुल संपत्तीचे १३ मार्ग :- अश्विन सांघी
(विचार आणि थोडे कष्ट यांच्या मदतीने कोणालाही संपत्ती मिळविता येते. या पुस्तकात सांगितलेले विपुल संपत्तीचे १३ मार्ग सहजपणे आचरणात आणता येतात.)
७)जगातील सर्वोत्तम विक्रेता :- ऑग मन्दिनो
(यामधील प्राचीन १० लेखपटातून उलगडलेल्या अमूल्य ज्ञानाच्या मदतीने आपल्या जीवनात खरेखुरे समाधान आणा)
८)धन आकर्षित कसे कराल :- जोसेफ मर्फी
(या पुस्तकात तुम्ही अंतर्मनाची शक्ती वापरुन समृद्ध. श्रीमंत होण्याचं गुपित जाणाल)
९)द बिझनेस स्कुल :- रॉबर्ट टी. कियोसाकी
रॉबर्ट टी. कियोसाकी यांच्या बिजनेस स्कूलची ही मराठी आवृत्ती आहे. लेखक नेटवर्क विपणन (मार्केटिंग)व्यवसायाच्या त्याच्या मूळ 8 लपलेल्या मूल्यांवर अद्ययावत आणि विस्तारित विश्लेषण करतात.हे नेटवर्क मार्केटिंगशी संबंधित असलेल्या प्रत्येकासाठी आवश्यक आहे.
१०)एकविसाव्या शतकाचा व्यवसाय :- रॉबर्ट कियोसकी
(पुस्तक बहुउद्देशीय नेटवर्क मार्केटिंग व्यवसायावर विश्वास ठेवण्यास बाध्य करते आणि पैसे कमविणे हा एक आदर्श मार्ग आहे हे सिद्ध करते)
११)विचार करा आणि श्रीमंत व्हा:- नेपोलियन हिल
(आपल्याला काय हवयं, हे ज्याला ठाऊक असतं, तोच त्वरित निर्णय घेऊ शकतो. तो व्यक्ती आपल्या शब्दांनी आणि आपल्या कर्तूत्वाने आपलं उदिष्ट वेळोवेळी जगासमोर ठेवतो अत्यंत प्रसिद्ध आणि वाचनीय पुस्तक)
प्रत्येक पुस्तकाची हार्ड कॉपी लिंक दिली आहे आपण ती ऍमेझॉन वरून घरी मागवू शकता ....!
अमेझॉन कोविड -१९ सुरक्षा नियमांचे तंतोतंत पालन करते. त्यामुळे निष्चिंत होऊन घरबसल्या खरेदी करा..!!
0 टिप्पण्या