सुरुवातीच्या रुग्णांमधून घेतलेल्या या विषाणूच्या सॅम्पलची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यानंतर चीनचे अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेने हा कोरोना विषाणू असल्याचं सांगितलं.
रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (
Centers for Disease Control and Prevention)
सीडीसी मधील कोरोनाव्हायरसवरील तज्ञांनी आरोग्य व्यावसायिक आणि सर्वसामान्यांसाठी व्हायरसच्या लक्षणांवर आधारित मार्गदर्शक तत्व जाहीर केले आहेत.कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी खालील गोष्टी नियमितपणे करा -
- १)आजारी व्यक्तींच्या फार जवळ जाऊ नका.
- २)हात न धुता तोंड, नाक, डोळे, कान यांना स्पर्श करू नका.
- ३)शिंकताना आणि खोकलताना टिशू पेपर वापरा. वापरून झाल्यावर तो कचरापेटीत टाकून हात स्वच्छ धुवा.
- ४)साबणाने नियमित हात धुवा.
WHO ने त्यांच्या वेबसाईटवर कोरोना व्हायरसमुळे जाणवणाऱ्या 13 लक्षणांची यादी दिली आहे. यातली सर्वसामान्य लक्षणं आपण याआधी वर पाहिली आहेत. पण, आता जगभरातल्या काही रुग्णांमध्ये पुढे दिसून आलेली लक्षणं दिसून आली आहेत.
- १)कंजंक्टीवायटीस (डोळे येणे)
- २)त्वचेवर लाल चट्टे, पुरळ उठणे
- ३)हातापायांच्या बोटांवर, तळव्यांवर चट्टे उठणे
- ४)मळमळणे
- ५)नाक वाहणे
- ६)अतिसार किंवा हगवण लागणे
- ७)अंगदुखी.
गंभीर लक्षणं
- १)छाती दुखणे
- २)छातीवर दबाव आल्यासारखं वाटणे
- ३)वाचा जाणे
- ४)शरीराची हालचाल थांबणे
जर तुम्हाला श्वास घ्यायला खूपंच त्रास होत असेल तर तुम्ही लगेचच कोव्हिड-19साठी असलेल्या राष्ट्रीय हेल्पलाईन नंबरला संपर्क करा. या राष्ट्रीय हेल्पलाईनचा नंबर आहे +91-11-23978046 (मोबाईलवरून लावताना 011 डायल करावा).
0 टिप्पण्या