स्मार्टवॉच घेताय ...? मग हे नक्की वाचा ...!


BEST SMARTWATCH INDIA 2020

स्मार्टवॉच म्हणजे नक्की काय ?     

सर्वात अगोदर एकमेकांशी सम्पर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी (MOBILEPHONE) आले त्यानंतर त्या यंत्रामध्ये अद्ययावता(UPGRADE) येऊन हे भ्रमणध्वनी 'स्मार्ट' झाले . त्यालाच आपण स्मार्टफोन असे म्हणतो ; तर स्मार्ट वॉच हे एका प्रकारे हाताळण्यास सहज (PORTABLE) आणि मनगटावरील स्मार्टफोनच आहे असे आपण म्हणू शकतो . स्मार्ट फोनमधील सर्वच सुविधा या स्मार्ट घड्याळीत आहेत. यामध्ये आपला स्मार्टफोन ब्लूटूथ द्वारे कनेक्ट करता येऊन त्याद्वारे विविध सुविधा पुरवल्या जातात जसे कि विडिओ कॉलिंग ,ऑडिओ कॉलिंग ,स्टॉप वॉच, कॅल्क्युलेटर, होकायंत्र, इंटरनेट मेसेजिंग आणि ह्यासोबतच नवनवीन सुविधा प्रत्येक स्मार्टवॉच मध्ये कंपनीतर्फे दिल्या जातात.


खाली आम्ही आपल्यासाठी  २०२० मधील टॉप ५ स्मार्ट वॉचेस त्यांची वैशीष्ट्ये , बलस्थाने आणि दुबळी बाजू यांचा समावेश केला आहे; नवीन स्मार्ट वॉच घेताना आपण ही माहिती विचारात घ्याल ही अपेक्षा करतो..... !!!

१) एप्पल वॉच सिरीज ५

(येथे विकत घ्या)

वैशिष्ट्ये : -

  1. जीपीएस
  2. इसिजी
  3. फॉल डिटेक्शन
  4. अत्यावश्यक कॉल (एसओएस)
  5. OLED डिस्प्ले

बलस्थाने :-

  1. नेहमी चालू असणारा डिस्प्ले (मागील सिरीज मध्ये काम झाल्यावर डिस्प्ले ऑफ असायचा)
  2. वॉटरप्रूफ
  3. अचूक हार्ट रेट मोजमाप पद्धती
  4. स्टेनलेस स्टिल बॉडी

दुबळी बाजू :-

  1. किमतीने महाग (४-५ अँड्रॉइड मोबाइल येतात एवढ्या किमती मध्ये ...!!)
  2. फक्त आयओएस ला सपोर्ट (फक्त आयफोन डिवाइस करता )
  3. बॅटरी लाईफ ठीक ठाक.

२)एप्पल वॉच सिरीज ४

(येथे विकत घ्या)

वैशिष्ट्ये : -

  1. आयफोन असीस्टंट (सिरी)
  2. होकायंत्र
  3. जीपीएस
  4. अत्यावश्यक कॉल (एसओएस)
  5. हार्ट रेट ट्रेकिंग
  6. आकर्षक म्युझिक प्लेअर इंटरफेस

बलस्थाने :-

  1. फॉल डिटेक्शन
  2. मोठा डिस्प्ले
  3. आकर्षक डिझाईन

दुबळी बाजू :-

  1. किमतीने महाग (परत...! एप्पल आहे शेवटी.... )
  2. बॅटरी लाईफ कमी.
  3. काम झाल्यावर डिस्प्ले डिम होऊन लगेच बंद होतो.

3) हवाई वॉच जीटी २

(येथे विकत घ्या)

वैशिष्ट्ये : -

  1. AMOLED डिस्प्ले
  2. वर्क आऊट रेकॉर्ड (रनिंग जॉगिंग आणि व्यायाम )
  3. हार्ट रेट मॉनिटर
  4. होकायंत्र
  5. जीपीएस

बलस्थाने :-

  1. फेस डिटेक्शन
  2. बॅटरी लाईफ
  3. अँड्रॉइड तसेच आईओएस डिवाइस ला सपोर्ट करतो

दुबळी बाजू :-

  1. वाय फाय सपोर्ट नाही.
  2. स्पीकर तसेच मायक्रोफोन सपोर्ट नाही.

4)होनोर मॅजिक वॉच २

(येथे विकत घ्या)

वैशिष्ट्ये : -

  1. ब्लूटूथ द्वारे कंट्रोल
  2. स्लिप ट्रॅकर
  3. हार्ट रेट मॉनिटर
  4. स्ट्रेस ट्रॅकर

बलस्थाने :-

  1. बॅटरी लाईफ (एकदा चार्ज झाल्यावर २ आठवडे टिकून राहते)
  2. अँड्रॉइड तसेच आईओएस डिवाइस ला सपोर्ट करतो
  3. आकर्षक डिझाईन

दुबळी बाजू :-

  1. इन बिल्ट सोडून दुसरे अँप वर्क नाही होत.
  2. मेसेज ला फक्त नोटिफिकेशन बघू शकतो रिप्लाय करता येणार नाही.

5)फॉसिल जेन ५

(येथे विकत घ्या)

वैशिष्ट्ये : -

  1. गूगल असिस्टन्ट
  2. स्लिप ट्रॅकर
  3. हार्ट रेट मॉनिटर
  4. स्टेनलेस स्टील डिसाईन
  5. होकायंत्र

बलस्थाने

  1. AMOLED डिस्प्ले .
  2. १GB रॅम
  3. ८ GB स्टोरेज
  4. अँड्रॉइड तसेच आईओएस डिवाइस ला सपोर्ट करतो .
  5. बेटरी लाईफ उत्तम .

दुबळी बाजू

  1. म्युसिक सिस्टिम इंटरफेस आकर्षक नाही .

ही झाली २०२० मधील सर्वोत्तम ५ स्मार्ट वॉचेस ....!!

वरीलपैकी किमतीला खऱ्या अर्थाने न्याय देणारी स्मार्ट वॉच ही फॉसिल जेन ५ आहे जर वरील स्मार्ट वॉच पैकी एखादी वॉच घेण्याचा कोणी गंभीरपणे विचार करत असेल तर मी त्यांना फॉसिल जेन ५ च रेफेर करेल पण क्रमवारी मध्ये (सगळ्या बाबी लक्षात घेता) एप्पल चा अव्वल दर्जा कायम असेल.


सगळ्यांचे आभार ..!!

तळटीपा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या