प्रेमकथेवर आधारित बरीच छान छान पुस्तके मराठी भाषेत उपलब्ध आहेत मी वाचलेल्या पुस्तकांपैकी मला जी ३ पुस्तके खूप आवडली ती मी पुढे दिली आहेत.
(best marathi books to read before you die)
best marathi books to read 2020
best marathi books to read for students
Marathi books pdf free download
१)पुस्तकाचे नाव :-पहिले प्रेम
लेखक :-वि स खांडेकर
जेव्हा हे पुस्तक पहिल्यांदा हातात घेतले तेव्हा वाटले हे पुस्तक एवढे उशिरा का भेटले आपल्याला वाचायला..? पहिल्याच बैठकीत संपवलेल्या पुस्तकापैकी हे पुस्तक माझे विशेष आवडते आहे..!
मधेच हसवणारी आठवणीत घेऊन जाणारी आणि डोळे ओले करणारी ही प्रेमगाथा आपल्या समोर पहिल्या प्रेमाचे विविध पैलू उलगडत जात असताना पहिले प्रेम हेच खरे प्रेम असते का याबद्दलचा उहापोह प्रकाशित करते . प्रत्येकाने एकदातरी हि कादंबरी नक्कीच वाचली पाहिजे.
२)पुस्तकाचे नाव :-शाळा
लेखक :-मिलिंद बोकील
मिलिंद बोकील यांच्या सर्वोत्कृष्ट रचनेपैकी एक असलेली शाळा ही कादंबरी..!
आपल्यातील प्रत्येकाला जाणते अजाणतेपणे न कळत्या वयात प्रेम होते त्यातल्या त्यात शाळेतील प्रेम जरा खासच असते.
ही कादंबरी म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात समृद्ध क्षणांपैकी एक असणाऱ्या आपल्या शालेय जीवनाची आठवण करून कॅलिडोस्कोप आहे असं म्हटलं तरी हरकत नाही.
या पुस्तकावर आधारित शाळा हा मराठी चित्रपट सुद्धा प्रदर्शित झाला आहे यातील मुकुंद जोशींची या प्रेमवीराची कहाणी तुम्हाला आपलीशी न वाटली तर नवलच ...! भौतिकवादाच्या जाळ्यात अडकलेल्या सध्याच्या पिढीला उत्तम दृष्टांत तर आपल्यासारख्याला आठवणींचा उजाळा म्हणून हे पुस्तक नक्कीच वाचले पाहिजे असे आहे.
३)पुस्तकाचे नाव :- पार्टनर
लेखक :- व पु काळे
प्रेम आणि नातेसंबंध हा विषय म्हटला कि आपसूक माझ्या डोळ्यासमोर व पुं चेच नाव येते आपल्या नेहमीच्या ओघवत्या शैलीतील त्यांच्या लेखांमुळे ते माझ्या आवडत्या लेखकापैकी एक आहेत. पार्टनर ही शुद्ध प्रेमकथा जरी नसली तरी लग्न व त्यानंतर येणाऱ्या सांसारिक जबाबदाऱ्या आणि अडथळे यासंबंधी हे पुस्तक आहे प्रत्येकाने जो प्रेमात पडला आहे आणि ज्यांचं लग्न होणार आहे त्याने हे पुस्तक नक्की वाचले पाहिजे
आपण देखील ही पुस्तके वाचून पाहावीत आपल्याला नक्की आवडतील..!!
धन्यवाद...!
0 टिप्पण्या