स्वामीलीला वर्णन -२(shri swami samarth in marathi)

 swami samarth information in marathi

shri swami samarth

swami samarth image


श्री स्वामींचा चा जन्मकाळ:-
                                                                                                                                                                                    
                                                  Swami Samarth - Alchetron, The Free Social Encyclopedia

श्रीस्वामीमहाराज हे प्रथम मंगळवेढयास शके १७६० चे सुमारास आले/ ते तेथे कोठून आले, याबद्दल  आजतागायत खात्रीपूर्वक  माहिती मिळालेली  नाही. तथापि त्यांचे भक्तगणांनी होईल ती खटपट  करून जी काही माहिती मिळविली ती अशी कि , उत्तर हिंदुस्थानांत श्रीभागीरथी नदीच्या उत्तरेस मोठे अरण्य आहे. तेथे योगी लोक तपश्चर्या करीत असतात. त्या वनांत एका वारुळांत स्वामीमहाराज तपश्चर्या करत असताना, एक लाकूडतोड्या लाकडे तोडीत तोडीत महाराजांचे वारुळाजवळ आला.  लाकडे तोडता तोडता ती कुर्हाड पडून महाराजांचे मांडीस लागली . ते  घाव पुढे  कधीकधी महाराजांचे  मांडीवर दिसत असत.

shri swami samarth jai jai swami samarth

shree swami samarth in marathi

swami samarth prakat din 2020

swami samarth math

swami samarth prakat din


 लाकूडतोड्याने एका अर्थी जगावर उपकाराच केले. असो. तेथून महाराज निघाले ते काशीक्षेत्रीं जाऊन पूर्वदेशी प्रकट झाले. पुढे महाराज गंगासंगमी जाऊन कांहीं दिवस राहिले. नंतर यतिराज देवलग्रामास जाऊन तेथे त्यांनीं आपल्या पादुका स्थापन केल्या . ब्रह्महत्यादि पातकें पादुकांचे दर्शनाने नाहींशीं होतात, असा त्या स्थानाचा महिमा आहे. नंतर महाराज मोंगलाईत जाऊन राहिले. तेथे त्यांनी आपला  मठ स्थापन करून त्यास आठ गांवांची जहागिरी मिळवून, शिष्यांकडे मठ सोपवून दिला व महाराज पुढें निघाले. त्या वेळीं महाराज 'चंचलभारती ' या नावाने प्रसिद्ध होते.पुढे महाराज दक्षिणेला रामेश्वरास  गेले. तेथून उडपी क्षेत्रास जाऊन पंढरपुराला आले, नंतर मंगळवेढे गावी महाराज प्रसिद्धीस आले. महाराजांचे वय ४०० ते ५०० वर्षांचे होते, असें लोक सांगतात. स्वामीमहाराज म्हणजे प्रत्यक्ष प्रभू दत्तात्रेयांचा चौथा पूर्णावतार होते .त्यांनी अक्कलकोटच्या आपल्या २०  वर्षाच्या वास्तव्याच्या काळात ३०० हुन अधिक सिध्दपुरुष  निर्माण केले.
  श्री स्वामी  महाराजांचा जयजयकार असो  ....!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या