धोनी मैदानावरील त्याच्या शांत स्वभावामुळे प्रसिद्ध आहे ; कितीही तणावाची परिस्थिती असली तरी ती शांततेने हाताळुन निर्णय घेण्यात त्याची विलक्षण हातोटी आहे ,तसेच खऱ्या खुऱ्या आयुष्यात देखील तो मितभाषी स्वभावाचा आहे. यामुळेच त्याने आपल्या सेवानिवृत्तीची पोस्ट देखील एका वाक्यात संपवली.
त्याने आपल्या इंस्टाग्राम पोस्ट मध्ये लिहिलेल्या कोड्यात टाकणाऱ्या वाक्यामुळे सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
Thanks a lot for ur love and support throughout.from 1929 hrs consider me as Retired.
(तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि समर्थनाबद्दल खूप खूप आभार १९२९ या तासापासून मला सेवानिवृत्त समजा.)
काय आहे १९२९ चे रहस्य ?
WHY DHONI CHOSE RETIREMENT AT 1929? DHONI 1929 ? DHONI RETIREMENT
मागील वर्षी १३ जून रोजी झालेला २०१९ विश्व् चषक सामना सगळ्यांनाच आठवत असेल..! या उपांत्यपूर्व सामन्यात न्यूझीलंड ने भारताला फक्त १८ धावांच्या फरकाने हरवले होते. लोकेश राहुल पासून ते हार्दिक पंड्या पर्यंत सगळे दिग्गज फलंदाज बाद होऊन पावलियॉन ला परतल्यावर पूर्ण मदार आता फक्त धोनी वर होती जडेजा सोबत शतकोत्तरी भागीदारी केल्यावर धोनी ५० धावांवर बाद झाला ती वेळ होती १९ वाजून २९ मिनिटे..! (भारतातील संध्याकाळचे ७:२९ मिनिटे ).
साहजिकच या सामन्यांनंतर क्रिक्रेटप्रेमींनी आणि चाहत्यांनी देखील धोनी वर टीकेची झोड उठवली आणि त्याच्या सेवानिवृत्तीची मागणी जोर धरू लागली कारण त्यांना फिनिशर म्हणून नावलौकिक मिळवलेल्या धोनीकडून खूप अपेक्षा होत्या आणि एवढा महत्वाचा सामना हरण्याचा धक्का पचवणे त्यांना अशक्य होते. तेव्हाच मनोमन धोनीने निवृत्तीची तयारी केली असावी कारण त्या सामन्यांनंतर त्याने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही.
आकडेशास्त्रानुसार १९२९ आकड्याचा अर्थ "तुम्ही एक मोठा प्रकल्प , ध्येय पूर्णत्वास नेले आहे'' असा होतो. महेंद्र सिंग धोनी हा आकडेशास्त्रावर खूप विश्वास ठेवतो म्हणून पोस्ट टाकताना देखील त्याने १९:२९ याच वेळेची निवड केली.
बाकी काहीही असो पण त्याचे कट्टर चाहते आणि क्रिकेटप्रेमी हेलिकॉप्टर शॉट ला खूप मिस करतील.
धोनी तू नेहमी आमच्या हृदयात राहशील...!
0 टिप्पण्या