बॉम्बस्फोटात गमावले दोन्ही हात ..! पण आज आहे आंतरराष्ट्रीय व्याख्याती...! (Motivational stories marathi)

marathi motivational    

 Malvika Iyer In Marathi 

  मालविका अय्यर फक्त १३ वर्षाची होती जेव्हा तिने आपले दोन्ही हात  बॉम्बस्फोटात गमावले..!आज तिची कहाणी ही दुर्दम्य साहस , सहनशक्ती आणि दृढ - इच्छा शक्ती यांचा एक उत्तम वस्तुपाठ आहे.

हवं तर आपल्यासोबत झालेल्या अपघाताचा धसका घेऊन जीवनभर ती एक सामान्य स्त्री बनून राहू शकली असती परंतु तिने आपल्या दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर या परिस्थितीवर मात करून एक आंतरराष्ट्रीय ख्यातीची व्याख्याती म्हणून नावलौकिक मिळवला आहे. तसेच तिने आपले पीएचडी पर्यंत चे शिक्षण सुद्धा पूर्ण केले आहे..! आजकाल मालविका एक फॅशन मॉडेल म्हणून उदयास येत आहेत तसेच दिव्यांग व्यक्तींच्या  हक्कासाठी लढा देत आहेत. 

      मालविका अय्यर ह्या मूळ तामिळी ब्राम्हण कुटुंबातील आहेत त्यांचे वडील बी कृष्णन हे बिकानेर येथे पाणी पुरवठा विभागात  नोकरीला होते. २६ मे २००२ चा तो काळा दिवस तिला जसाचा तसा  आठवतो,एका मुलाखतीत तिने आपल्यावर ओढवलेला हा दुर्दैवी प्रसंग उलगडून सांगितला होता . तिचा जीवनपट पाहूया तिच्याच शब्दात.....! 

मालविका म्हणते , "तो दिवस अगदी काल घडून गेल्याप्रमाणे लख्ख आठवतो. नुकतीच मी नववीची परीक्षा दिली होती व शाळेला उन्हाळी सुट्ट्या लागल्या होत्या. त्या दिवशी रविवार होता  व आमच्या घरी पाहुणे आलेले असल्यामुळे माझी आई, वडील आणि दीदी सगळे आपापल्या कामात व्यस्त होते. "

"मी  त्यादिवशी घातलेल्या ड्रेसचा एक खिसा थोडा फाटला होता .माझ्या डोक्यात त्या खिश्याला फेविकॉल लावून चिटकवण्याचा विचार आला त्यावेळी मी स्वतःवर जाम खुश झाली. पण फेविकॉल लावून झाल्यावर ते चिटकवण्यासाठी एखाद्या जड वस्तूने त्यावर दाब देण्याची आवश्यकता होती. म्हणून मी ते घेण्यासाठी  आमच्या स्टोररूम वजा गॅरेज  मध्ये गेली त्याठिकाणी मला एक गोलाकार जड वस्तू मिळाली ती घेऊन मी माझ्या खोलीत आली."  

( मालविका बिकानेरला  जिथे राहायची  त्याठिकाणी जवळच एक गोळा बारूद चा साठा  करणारे गोदाम होते ,त्यादिवशी त्या गोदामाला लागलेल्या आगीत स्फोट सुरु होते; त्या स्फोटात काही बॉम्ब व त्याचे तुकडे आसपासच्या परिसरात पडले होते त्यातील एक बॉम्ब मालविका जड वस्तू म्हणून घरात घेऊन गेली होती.)

मालविका पुढे म्हणते," मी परत परत त्या वस्तूने खिश्यावर दाब देत असतानाच त्याचा जोरदार स्फोट झाला. त्यावेळेस बरोबर १ वाजून १५ मिनिटे झाली होते हे अजूनही आठवते कारण त्या स्फोटांनंतर घड्याळ लगेचच बंद पडले होते. स्फोटाचा आवाज ऐकून सगळे माझ्या रूम कडे पळत आले . ते दृश्य पाहिल्यावर माझी आई जोरजोरात ओरडत पळाली "मेरे बेटी के दोनो हाथ चले गये "( माझ्या मुलीचे दोन्ही हात चालले गेले). मागून पप्पा आणि त्यांचे मित्र पळत आल्यावर त्यांनी जे दृश्य बघितले त्यामुळे ते स्तब्ध झाले . मी बघितले कि माझे दोघी हात गायब झालेले आहेत व मी पूर्णपणे रक्तबंबाळ झालेली आहे ." 

(ज्यावेळेला स्फोट झाला त्यावेळी मालविका शुद्धीवरच होती आणि आश्चर्याने काय झाले ते बघत होती परंतु तिला कोणत्याही  प्रकारे वेदनेचा अनुभव झाला नाही कारण या जोरदार स्फोटाने तिच्या शरीरातील चेतना संस्थाच बंद पडली  होती)

"तशाच अवस्थेत मला गाडीत बसवून हॉस्पिटल ला घेऊन जायला लागले तेव्हा मला कळले कि आपला पाय मधून तुटला आहे व फक्त कातडीच्या आधारे लोंबत  आहे....! माझ्या शरीराला वेदनांची जाणीव व्हायला ४ दिवस लागले परंतु या वेदनापेक्षा मरण परवडले असते असे मला वाटायला लागले , कोणीतरी माझ्या शरीरावर तप्त धारदार चाकू फिरवीत आहे अश्या प्रकारच्या त्या वेदना होत्या ..! शरीरात ग्रेनेडचे कण  घुसल्याने इन्फेकशन होऊ नये म्हणून तब्बल ३ महिने माझ्या जखमा उघड्या ठेऊन स्वच्छ करायला लागल्या ....!"

कोणाचेही काळीज पिळवटून जावे असा अनुभव .. ती म्हणते कि , "देवाने असा प्रसंग परत कुणाच्याही आयुष्यात आणू नये....!"

सर्वसाधारण पणे एखादा मनुष्य आघात झाल्यावर पुरता खचतो व परत उभारी घेत नाही पण मालविकाचा प्रेरणादायी जीवनवृत्तांत ऐकून तुम्ही पुरते हरखून जाल . 

 Inspirational stories of success in marathi

तिचे खरे जीवन या अपघातानंतर च सुरु झाले असे म्हटले तरी काही हरकत नाही ;या अपघातानंतर तिला तब्बल १८ महिने विविध ऑपेरेशन आणि उपचारातून जावे लागले. घरी आल्यावर तिला इथल्या एकाकी वातावरणाची सर्वात जास्त भीती वाटली . तिच्या सोबत असलेली मुले - मुली बोर्डची परीक्षा देत होते कोणी पुढच्या आयुष्यात काय बनायचे हे ठरवत होते.  ती नेहमी बेड रेस्ट वर असल्यामुळे पेपर देण्याचा परिस्थितीत ती मुळीच नव्हती आणि त्यावेळी तशी अपेक्षा देखील कुणी तिच्याकडून ठेवली नव्हती ...!

परीक्षेला ३ महिने बाकी असताना तिने मनाशी पक्की केले कि काहीही झाले तरी परीक्षेला बसायचेच ..शाळेचा अभ्यास हा कधीच मालविका चा प्रांत नव्हता त्या ऐवजी तिला खेळा-हुंदडायला खूप आवडायचे , स्केटिंग करायला आवडायचे . त्यामुळे तिची शाळेतील प्रगती यथातथाच होती . परंतु तिला स्वतःला आणि जगाला काहीतरी करून दाखवायचे होते. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेला बसायचेच हि खूणगाठ तिने मनोमन पक्की केली. या ३ महिन्यात ज्या मुलीला बसायला अवघड होत होते तिने फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर ३ महिने कसून अभ्यास केला.. !

परीक्षा झाल्यावर तिला आपण नुसतेच पास नाही पण काहीतरी विशेष प्राविण्य मिळवू हि खात्री होतीच. निकाल लागला आणि मालविकाचे नशीब एका रात्रीत पालटले . तिला चक्क ५०० पैकी ४८३ गुण मिळाले होते आणि त्यात देखील गणित आणि विज्ञान या विषयात पैकी च्या पैकी मिळवुन राज्याच्या गुणवत्ता यादीत तिने उच्च स्थान पटकावले होते.

एक दिव्यांग मुलगी जी अजून पूर्णपणे धक्क्यातून सावरलेली नाही तिने अश्याप्रकारचे यश मिळवल्यावर आपसूकच सगळ्यांच्या नजरा मालविका कडे वळाल्या. त्यामुळे ती लोकांच्या चर्चेचा विषय झाली . तिच्या कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रपती कलाम सरानी तिची भेट घेतली.या एका घटनेने तिला स्वतःच्या शक्ती ची जाणीव करून दिली. त्यांनतर स्टिफन्स कॉलेज मध्ये प्रवेश घेऊन तिने अर्थशास्त्रात पदवी पूर्ण केली.
जसजशी ती सुरक्षित कवचातून बाहेर येऊन लोकांशी जुडत गेली तसा तिचा आत्मविश्वास वाढत गेला. सामान्य जणांकडे पाहून तिला नेहमी माझ्यासोबतच असे का व्हावे हा प्रश्न पडत असे. कारण बऱ्याचदा लोक तिच्याबद्दल दाखवत असलेली सहानुभूती किंवा इतर कोणतीही भावना तिला नकोशी व्हायची काही लोक तिला बघून म्हणायचे कि तुझ्यासारख्या मुलीसोबत कोण करेल लग्न ? तू हि गोष्ट करू शकत नाही . तुझे जीवन आता पूर्ण परावलंबी असेल वगैरे वगैरे अश्या टिप्पण्यांमुळे तिला खूप मानसिक त्रास सहन करावा लागला.


Motivational stories in marathi for students

(मराठी प्रेरणादायी कथा )

कलाम सरांसोबत 

दिल्ली स्कूल ऑफ सोशल वर्क इथून मास्टर डिग्री करताना तिला फिल्डवर्क म्हणून लहान मुलांना शिकवावे लागायचे . त्या लहान मुलांची शक्ती आणि दिनक्रम बघून तिच्या विचारात बदल घडू लागला . मालविका म्हणते "या मुलाकडून मला खूप काही शिकायला मिळाले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मी जेव्हा स्वतःवर विश्वास करायला लागले त्यावेळेला माझ्या जीवनात अनेक चमत्कारिक गोष्टी घडून आल्या."

आपण आपल्या आजूबाजूला कितीतरी लोक बघतो कि , अमुक एका गोष्टीसाठी जे नशिबाला दोष देतात; परिस्थितीला दोष देतात परंतु मालविका सारखे उदाहरण त्या सर्वाना नक्कीच काहीतरी शिकवून जाईल . नियतीने एवढी क्रूर निर्भत्सना केल्यावर देखील जिचा जीवनावर विश्वास आहे अशी व्यक्ती नक्कीच सगळ्यासाठी प्रेरणास्थान ठरू शकेल.


Motivational stories in marathi video


आज मालविका एक पीएचडी स्कॉलर आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक व्याख्याती म्हणून देखील ती प्रसिद्ध आहे. २०१७ साली तिला संयुक्त राष्ट्रसंघात भाषणासाठी आमंत्रण मिळाले होते. नुकताच तिला राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला . TEDtalks शो मधील तिचा एपिसोड लाखो लोकांनी बघितला आहे. त्याचबरोबर ती एक फॅशन मॉडेल म्हणून स्वतःला सिद्ध करू पाहत आहे . मालविका एका खुशहाल  जोडीदारासोबत प्रेमसंबंधात आहे व ते लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे.आजपर्यंतचा तिचा हा प्रवास हा थक्क करणारा आहे.



लोक नेहमी तिला ती दिव्यांग असल्याची आठवण करून देतात पण मालविका म्हणते मी स्कॉट हॅमिल्टन च्या तत्त्वावर चालते . (''जीवनातील  एकमेव  अपंगत्व म्हणजे वाईट मनोवृत्ती."मी माझ्या स्वत:च्या क्षमतांवर लक्ष केंद्रित करते , लोकांच्या माझ्याबद्दलच्या प्रतिक्रियांवर नव्हे .ह्या गोष्टी मुळे  माझ्या जीवनात अमूल्य बदल घडून आले. 


आपल्या प्रत्येकासाठी संधी उपलब्ध आहेत . हार मानू नका संघर्ष करा आणि विजयी व्हा ...!




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या