चाळीस लोकांच्या सामग्रीत चार हजार लोक जेवले

रावजी पाटील

अक्कलकोट व सोलापूर दरम्यान रामपूर म्हणून एक गांव आहे. तेथील रावजी पाटील, प्रथम शारदी (शास्त्री ? ) ब्राह्मण व त्याची नातलग विठाबाई म्हणून एक होती. दोघे श्रीस्वामींची भक्ति करीत असत. कधी कधी महाराज रामपुरास जात असत. एके खेपेस सोळा दिवस रामपुरास मुक्काम पडला. महाराजांजवळ चोळाप्पा, गणपतराव, रामभाऊ दाढीवाले,महादेव भट, बाबासाहेब यादव वर्ग सेवेकरी मंडळी होती. असो . 
महा- राजाप्रीत्पर्य चाळीस ब्राह्मण जेवू घालण्याचा रावजी पाटलाचा नवस होता. अनायासे समर्थानंची स्वारी आपले गांवास आली. ही संधि नवस फेडण्यासाठी उत्तम आहे, असें मनांत आणून विठाबाईनं चाळीस पानांची सामुग्री आणून स्वयंपाक तयार केला. स्वामीमहाराज रामपुरास आले आहेत, ही वार्ता सोलापूर व इतर गांवी जाऊन हजारों लोक दर्शनास आले. मंडळींची गर्दी फार झाली. इकडे विठाबाईने स्वयंपाक सिद्ध केला व समर्थांची मंगल स्नान घालून गंधाक्षत लावून पोडशोपचारपूजा केली व भोजनास पात्र वाढून तयार केले. लीलाविग्रही स्वामी समर्थ भोजनास उठेनात. याप्रमाणे बराच वेळ गेला. मंडळींची गर्दी जास्त होऊं लागली. सर्वत्रांस भोजन घालावें," म्हणून रावजी पाटील यांस श्रीसमर्थांनी आशा केली. त्याने आशा शिरसावंद्य केली, पण मनांत त्यास मोठी चिंता पडली की, चाळीस इसमांचे स्वयंपाकांत इतके लोक कसे जेवतील ? अशा चिंतेत आहे, इतक्यांत त्यास व विठावाईस बोलावून (स्वामींनी) एक टोपली आणण्यास सांगितली. टोपलीत पोळ्या, भात वर्गरे सर्व पदार्थ भरण्यास सांगितले व देव्हाऱ्यातील देवी, खंडोबा, शाळिग्राम वगैरे त्या अन्नावर ठेवून त्यावर आणखी पोळया रचल्या मग उभयतांकडून अन्नपूर्णेची पूजा करविली. 
विठाबाईचे डोकीवर ती टोपली देऊन, तिजकडून तुळशीस तीन प्रदक्षिणा करविल्या. मग ती टोपली महा राजांनी आपले जवळ ठेवून वाढण्यास सांगितली. स्वयंपाकघरांतून अन्न घेऊन बाहेर आल्यावर फिरून मागे पाहूं नये, अशी वाढणारऱ्यास आज्ञा झाली. त्याप्रमाणे रावजी पाटील, महादेव भट व दुसरे सेवेकरी वाढण्यास लागले. पहिली पंगत चारशें पानांची उठली. अन्न घरांत जसेच्या तसेंच शिल्लक आहे. यासें पाहून सर्वांस आश्चर्य वाटले. सर्वत्रांनी स्वामीनामाचा जयजयकार

" येथे येणारे सर्व लोकांस भोजन पालावें. " अशी वारंबार महाराज आज्ञा करीत. यात्रेकरू श्रींचा प्रसाद घेतल्याबांचून कशास जातील प्रमाणे रात्री प्रहर पावेतो जेवणाच। थाट उडून राहिला होता. पुढे महाराज
उपाशी असल्याने भोजन करावें, म्हणून रावजी पाटील याने प्रार्थना केली, तेव्हा महाराज म्हणाले, " आमचे बाप-आजे अद्याप आले नाहीत, ते आल्या वर भोजन करूं !" या बोलण्याचा अर्थ कोणाच्या लक्षात येईना. पुढे कांहीं वेळाने सोलापुराहून सरकारी कामगार मंडळी आली. त्यांनी दर्शन घेऊन भोजन केले. त्या दिवशीं रात्री अकरा वाजतां श्रीदयाघन सद्गुरूंनी भोजन केले. शिल्लक राहिलेले अन्न रावजीकडून इतर लोकांस वांटून दिले. टोप लींत असलेलें (राहिलेले) अन्न दुसरे दिवशी प्रसाद समजून सर्व सेवेकरी यांनी ग्रहण केलें. असो. चाळीस पानांचे सामुग्रीत चार हजार पान जेवलें. अशी श्रीगुरुसमर्थांची अगाध लीला होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या