हिंदूपतपातशाहीचा तेजस्वी हुंकार यवनांच्या जुलमी राजवटीविरोधात यशस्वी लढा देणारा मानबिंदू. रयतेचा राजा ही विरुदावली सार्थ करणारा समर्थ नेता... सामान्यातल्या सामान्य , अठरा पगड जाती जमातीच्या मावळ्यांच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवून 'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता' अशा राज्यशकटाची निर्मिती करणारा आणि अटकेपार मराठा साम्राज्याची पताका उंचावणाऱ्या लढवय्या सरदारांचे प्रेरणास्थान... म्हणजे, गो ब्राह्णण प्रतिपालक, प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराजयोगीराज श्रीछत्रपती शिवाजीमहाराज... रयतेचे राज्यस्थापित करणाऱ्या छत्रपती शिवाजीमहाराज व स्वराज्य स्थापनेसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या त्यांच्या महापराक्रमी सरदारांना मानाचा मुजरा....!
बहिर्जी नाईक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामर्थ्याचा गुप्त आधार स्तंभ .....!
शत्रूच्या गोटात जाऊन आपल्या शब्दांनी समोरच्याच्या काळजाचा वेध घेत नकळत त्यांच्याकडून हवी ती माहिती काढून घेण्याचे असामान्य कसब असणारा महाराजांचा तिसरा डोळा म्हणजे गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतल्यापासून ते महाराजांच्या निधनापर्यंतचा साक्षीदार म्हणजेच बहिर्जी नाईक,
बहिर्जी हे कुठलेही वेशांतर करण्यात पटाईत होते. समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातून शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होते. पहिल्याच नजरेत महाराजांनी हेरले कि , ही व्यक्ती खेळ करण्यासाठी नव्हे तर शत्रूच्या गोटात शिरुन त्यांना खेळवण्यासाठी जन्माला आली आहे. बहिजींनी विविध प्रांतात तीन ते चार हजार गुप्तहेर अगदी हुशारीने पेरले होते. स्वराज्याच्या सर्वच मोहिमांत नाईकांच्या गुप्तहेर खात्याचा बहुमोल वाटा होता. महाराज मोहिमेवर जाण्यापूर्वी त्या ठिकाणाची व संबंधित व्यक्तींची खडान् खड़ा माहिती बहिर्जी नाईक काढत व योग्य वेळेत महाराजांपर्यंत पोहोचवत. त्यांनी गुप्तहेर खात्याची एक सांकेतिक भाषा तयार केली होती, जी फक्त त्यांच्या गुप्तहेरांना माहीत असे. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे विजापूरचे आदिलशहा व दिल्लीचे बादशहादेखील नाईकांना ओळखून जेरबंद करू शकले नव्हते. शिवरायांना सर्वच बाबतीत जाणते ठेवण्याचे कार्य त्यांच्या हेरव्यवस्थेने चोखपणे बजावले होते. अफजलखानाच्या भेटीपूर्वीच खानाचा हेतु राजांस जीवे मारण्याचा आहे व प्रत्यक्ष भेटीच्या वेळी खानाने चिलखत घातले नसल्याची तसेच सय्यद बंडा धोकादायक असल्याची माहिती बहिजींनी वेळेत व अचूक पोहोचवली होती.
५ जानेवारी १६६४ मधील सुरतेची पहिली लूट, लालमहालावरील मोहिम व आग्रा येथून सुटकेच्या वेळी नाईकांचे गुप्तहेर खाते विलक्षण तत्पर होते. त्याकाळात तंत्रज्ञानाची साथ नसतानाही बहि्जीच्या गुप्तहेरांनी माहिती व भौगोलिक ज्ञान अचूकपणे कसे मिळवले? ती माहिती योग्य वेळी इच्छित व्यक्तीपर्यंत कशी पोहोचवली असेल, हे एक न उमगणारे कोडेच... महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात बानूर गडावर या महान गुप्तहेराची समाधी आहे.
प्रतापराव गुजर
स्वामीनिष्ठेचे सरसेनापती - प्रतापराव गुजर
शिवरायांच्या सैन्यातील एक स्वामीनिष्ठ शिलेदार म्हणजे प्रतापराव गुजर. मूळ नाव कुडतोजी असलेल्या या शूर वीराचा पराक्रम पाहून महाराजांनी त्यांना प्रतापराव' हा किताब देऊन गौरविले होते. रणझुंजार प्रतापरावांनी वादळ वेगाने झंझावाती लढा देत गनिमांना जेरीस आणले होते. शिवाजीराजे आग्राला कैदेत असतांना याच प्रतापरावांनी स्वराज्याचा गाडा मोठ्या चतुराईने व व्यवस्थित चालविला होता.
उमराणीच्या लढाईत प्रतापरावांकडून अभय मिळालेला बेहलोलखान पुन्हा शिवरायांच्या भूमीत धुमाकूळ घालून उपद्रव करू लागला होता. बेहलोलखानासारखा क्रूर व कपटी शत्रूला सोडून दिल्यामुळे शिवाजीराजे प्रतापरावांवर नाराज झाले. महाराजांचा राज्याभिषेक जवळ येत असतानाच, 'बेहलोलखान पुन्हा-पुन्हा स्वराज्यावर चालून येत आहे, त्यांचा बंदोबस्त केल्याखेरीज आमच्यासमोर येऊ नका. अशा आशयाचा खलिता महाराजांनी प्रतापरावांना पाठवला. खलिता हाती येताच प्रतापरावांचे रक्त सळसळू लागले. प्राणापेक्षा प्रिय असणाऱ्या महाराजांचा हुकूम पाळायचा या उद्देशाने प्रतापराव गुजर महाशिवरात्रीला २४ फेब्रु. १६७४ रोजी फक्त सहा शिलेदारांसह नेसरी खिंडीत शेकडो सैन्यासह तळ ठोकून बसलेल्या बहलोलखानाच्या छावणीवर तुटून पडले. हर हर महादेव चा गजर उठला. थोडी गडबड उडाली; सातही रिकामी घोडी छावणी सोडून जंगलात शिरतांना दिसली. एकच कापाकापी झाली. या धुमश्चक्रीत प्रतापराव आणि त्यांचे सहा सरदार युद्धात खर्ची पडले. सात शुर शिलेदारांनी स्वराज्य रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देऊन नेसरी खिंड पावन केली.
प्रतापरावांच्या पराक्रमावर कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेले वेडात मराठे वीर दौडले सात हे गीत आज देखील कानी पडताच अंगात वीरश्री संचारते आणि प्रतापरावांचा इतिहास जिवंत होतो. त्यांच्या या बलिदानामुळे शूर मावळ्यांच्या शौर्याला एक नवं परिमाण लामलं होतं. त्यांच्या पराक्रमाला एक नवं कोंदण मिळालं होतं.
कोंडाजी फर्जद
जंजिऱ्याच्या गुहेत शिरून दारूगोळा उडविण्याचा धाडसी प्रयत्न करणारे नररत्न!
स्वराज्याची शान असणारा बलाढ्य अंगापिंडाचा पन्हाळा किल्ला गनिमी काव्याने शक्ती आणि युक्तीने घारी सारखी झडप घालून ताब्यात घेत तो पुन्हा स्वराज्याला समर्पित करणारा पराक्रमी शिलेदार म्हणजे कोंडाजी फर्जद.
कोंडाजी कोकणातूनच महाड, पोलादपूर, चिपळूण, खेड या मार्गाने अगदी गुपचूप बिनबोभाट राजापुरास पोहोचले. तेथूनच चोरट्या पावलांनी जाऊन त्यांनी पन्हाळ्याचा वेध घेतला. जिथे पहारे कमी आहेत अशी जागा हेरून कोंडाजी दि. ६ मार्च १६७३ ला सोवत अवधे ६० वीर मावळे घेऊन गडावर चढले. फाल्गुन वद्य त्रयोदशीच्या मध्यरात्री किर.. अंधारात ठरल्याप्रमाणे हरहर महादेव चा बुक्का उधळला. तशी गडाला जाग आली.
गनिमाला चकविण्यासाठी गडावर पोहचल्यावर मावळ्यांनी शंख फुकले. रणवाद्य वाजवली, घोषणा देत, आरडाओरड करत आदिलशाहीच्या सैन्यावर चाल केली. या अतर्क्य प्रकारा मुळे एकच गोंधळ उडाला व मराठे मोठ्या संख्येने आले आहेत असे समजून शत्रू पक्षाचे अवसान गळाले.
किल्लेदार बाबूखान व कोंडाजी यांच्यातील महाभयंकर युद्धात किल्लेदार पडल्याची बातमी ऐकताच बाबूखानाच्या सैन्याची घाबरगुंडी उडाली. सैनिक सैरावैरा पळू लागले, पण गडावरील मावळ्यांनी त्यांची दाणादाण उडवत गड ताब्यात घेतला. आदिलशाहीचा एक मातव्वर गड अवध्या साठ मावळ्यांनी ताब्यात घेत पन्हाळा पुन्हा स्वराज्यात दाखल केला.
पन्हाळासारखाच जंजिऱ्याच्या गुहेत शिरून दारूगोळा उडवण्याचा धाडसी प्रयत्न कोंडाजीने केला. त्यावेळी जंजिऱ्या वर असणाऱ्या खैरत खान व सिद्दी कासम या आफ्रिकन हबशांकडून तटावरील प्रजेचा होणारा अतोनात छळ पाहून संभाजी राजांनी जजिऱ्या वर आक्रमण करण्याचा येत आखला, सन १६८२ ला कोंडाजी आपल्या बारा मावळ्यांसह जंजिऱ्या च्या गुहेत शिरून योग्य वेळी तेथील दारुगोळा उडवण्याचा धाडसी मनसुबा घेऊन सिद्धीच्या चाकरीला गेले। पण दुर्दैवाने जंजिरा ताब्यात घेण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले.
साक्षात मृत्यूच्या मगरमिठीत अडकले असताना देखील कोंडाजींनी ताठमानेने मरण पत्करले. सिद्धी पुढे ते ना वाकले ना झुकले कारण.... 'मरण आले तरी चालेल पण शरण जायचं नाही....ही स्वराज्याची शिकवण त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपली. धन्य ते कोंडाजी....
कान्होजी जेधे
"तुटेल मस्तक परी न उलटा फिरेल शब्द इमानी"
एका हातात निखारा आणि दुसऱ्या हातात तुळशीपत्र, अशी जी माणसे महाराजांच्या भोवती होती त्यात प्रामुख्याने अगदीच तलवारीचे पहिलं पाते म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते कान्होजी जेधे.
भोरजवळील कारी या गावी जन्मलेले कान्होजी कारी-अंबवडे गावासह रोहीडखोऱ्याचेही देशमुख होते. पुणे प्रांतापासून सर्व मावळ खोऱ्यात विलक्षण प्रभाव असणाऱ्या कान्होजींनी पराक्रमाने व सचोटीच्या वर्तनाने संपूर्ण बारा मावळामध्ये आपला दरारा बसविला होता. किल्ला कितीही दुर्गम असला तरी शिड्या व माळा लावून गड सर करण्याचे खास तंत्र कान्होजींना अवगत होते.
प्रत्यक्ष शहाजी राजांचे समकालीन व विश्वासू मित्र असल्यामुळे कान्होजी तुम्ही आता माझ्या शिवबाची चाकरी करावी. स्वराज्याला तुमची गरज आहे. आपण शूर लढवय्ये, अनुभवी आहात. आपल्या मायेचे छत्र शिवबा वर धरा", असे म्हणत शहाजी राजांनी कान्होजी जेधे यांना शेवटचा निरोप घेतांना अश्रूपूर्ण नयनांनी मिठी मारली. शहाजी राजांचे बोल ऐकून कान्होजी शिवाजी राजांकडे स्वराज्याच्या कार्यात सामील झाले.
जून १६५९ मध्ये अफझल खान स्वराज्यावर चालून आला तेव्हा त्याच्या भीतीने स्वराज्यातील अनेक सरदार त्याला सामील झाले, पण कान्होजींची स्वामीनिष्ठा अभंग असल्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांना पाठींबा दिला व सर्व वतनांवर पाणी सोडले. शिवाजी महाराजांच्या दरबारात तलवारीचे पहिले पान म्हणजे कान्होजी जेधे. कोणतीही मोहीम ठरली असता पहिलं पत्र त्यांना पाठविले जायचे.
सिद्दी जौहरच्या रूपाने, स्वराज्यावर आलेल्या दुसऱ्या संकटात लढता लढता बांदलांच्या सैन्याच्या तुकडीतील तीनशेच्यावर सैनिक मारले गेले होते. त्यामुळेच महाराज विशाल गडावर सुखरूप पोहचले होते. बांदलांच्या या पराक्रमाने महाराज गहिवरले. कान्होजींनी महाराजांच्या इच्छेखातर त्यांना मिळालेलं तलवारीच्या पहिल्या मानाचं पान कृष्णाजी बांदलास देऊन आपल्यात असणारे औदार्य दाखवून दिले.
अशा या स्वामीनिष्ठ शूर कान्होजींना मानाचा मुजरा !
मुरारबाजी देशपांडे
अवघ्या सातशे मावळ्यांनिशी दिलेरखानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचे पाणी पळविणारा वीर योद्धा -मुरारबाजी देशपांडे, पुरंदर म्हटलं की आठवतो पुरंदरचा तह, शंभू राजांचा जन्म आणि अवध्या सातशे मावळ्यांनिशी दिलेरखानाच्या फौजेच्या तोंडचे पाणी पळविणारे एक अमूल्य रत्न म्हणजे मुरारबाजी देशपांडे. महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडे यांचे मूळगाव.मुरारबाजी देशपांडे हे सुरुवातीला जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्या सेवेत होते. शिवरायांच्या जावळीवरील छाप्याच्या वेळी महाराजांनी मुरारबाजींमधील कर्तृत्व जाणले आणि त्यांना गोड बोलून आपलेसे केले. तेव्हापासून मुरारबाजी देशपांडे शिवकार्यात सामील झाले.
१६ मे १६६५ रोजी पुरंदरच्या लढाईत मुरारबाजच्या मनात एक धाडसी विचार आला. ते धाडस भयंकरच होते. गडावरून सुमारे सातशे योद्धे सोबत घेऊन उत्तरेच्या बाजूने एकदम मुघलांवर अन् खुद्द दिलेरखानावरच तुटून पडायचे असा तो विचार होता. सहजासहजी किल्ला मुघलांच्या हातात देण्यापेक्षा प्रयत्न यशस्वी झाला, तर इतिहास घडेल, या विचाराने मुरारबाजींनी एकदम दिलेरखानाच्या रोखाने गडावरून खाली झेप घेतली. वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्या तसे सातशे मावळे गडाच्या माचीवर आले. भुकेला वाघ जसा शिकारीवर झडप घालतो तसे हे सातशे वाघ मुघल फौजेवर तुटून पडले . हरहर महादेव, मारो, काटो च्या आवाजाने माची दुमदुमत होती. मराठ्यांच्या क्रोधापुढे कोणाचाच टिकाव लागत नव्हता. स्वतः दिलेरखान मागे सरला. मुरारबाजी दोन्ही हातात दोन तलवारी घेऊन कर्दनकाळ बनून सैरभैर फिरत होते. एवढ्यात दिलेरखानाने आवाज दिला तुम हमारे साथ आओ, हम तुम्हारी शान रखेंगे. हे शब्द कानी पडताच तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजी राजांचा शिपाई, तुझा कौल घेतो की काय?' असे म्हणत मुरारबाजी त्वेषाने खानावर तुटून पडले. त्याच वेळी दिलेरखानाने सोडलेला तीर मुरारबाजांच्या कंठात घुसला. लढवय्या मुरारबाजीचा देह पुरंदरच्या मांडीवर कोसळला. गतप्राण झालेले मुरारबाजीचे शरीर रणावेशाच्या गतीमात्रेने घुमत राहिले. एक महान तेज सूर्यतेजात मिसळले गेले...
फिरंगोजी नरसाळा
चाकणचा देखणा भुईकोट किल्ला अर्थात संग्रामदुर्गाचा वीरपुरुष फिरंगोजी नरसाळा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या फक्त एका शब्दाखातर आदिलशाहीची नोकरी सोडून स्वराज्यात सामील झालेले किल्लेदार आणि शाहिस्तेखानाच्या बलाढ्य मुघल सैन्याला जेरीस आणणारा धुरंधर मावळा फिरंगोजी नरसाळा. चाकणचा भुईकोट संग्रामदुर्ग फिरंगोजींनी अतिशय मेहनतीने व आपल्या लेकराप्रमाणे सांभाळून शेवटपर्यंत जिद्दी ने लढवला. प्राचीन काळी व्यापारी केंद्र असलेल्या चाकणच्या रक्षणासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता.
छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलेले असतांना पुण्यात ठाण मांडून बसलेला शाहिस्तेखान २१ जून १६६० रोजी प्रचंड तोफखाना व वीस हजार फौजेसह चाकणवर चालून आला. फिरंगोजीने अवघ्या तीनशे मावळ्यांच्या जोरावर ५५ दिवस झुंज दिली. पावसाळा सुरू होणार म्हणून किल्ल्यावर भरपूर रसद भरून ठेवली होती. मुघलांनी किल्ल्यास वेढा घातला व तोफांचा भडिमार चालू केला, परंतु मराठयांनी सुरुवातीला काही दाद दिली नाही. मुघल सैन्य किल्ल्याच्या बुरुजावर आले, की मावळे गोफणीच्या सहाय्याने मुघली सैन्यास रक्तबंबाळ करत. मुघलांना काही केल्या किल्ल्यात प्रवेश करता येत नव्हते , अखेर मुघलांनी तटापर्यंत भुयार खणून किल्ल्याचा तट उडविला. किल्ल्याची एक बाजू उपही पडली. किल्ल्याजवळ हातघाईची लढाई सुरू झाली. मुघलांच्या प्रचंड सैन्यापुढे आपल्या सैन्याची वाताहत होणार हे ध्यानात आल्यामुळे फिरंगोजीने माघारीचा निर्णय घेऊन किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला व मावळ्यांचे होणारे नुकसान टाळले. कारण महाराज म्हणल, आपण राखून गनीम घ्यावा माणूस खराब होणार नाही याची काळजी घ्यावी." फिरंगोजीच्या या पराक्रमावर खुश होऊन शिवाजी राज्नी त्याना भू पालगडाची किलले दारी एक भरजरी दुशेला मानाची तलवार भेट देऊन यथोचित गौरव केला.
स्वराज्यासाठी अतुलनीय पराक्रम गाजवून प्राणार्पण करणारे आणि हिंदवी स्वराज्याचा पाया रचणारे 'शूर सरदार... बाजीप्रभू देशपांडे
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातला सहाद्रीसारखा पुराणपुरुष, पिढीजात सरदार म्हणजे बाजीप्रभू देशपांडे. त्यांचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य हेरून महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले. वयाच्या पन्नाशीतही २०-२२ तास अविश्रांत काम करणाऱ्या बाजींचा संपूर्ण मावळ प्रांतात मोठा दबदबा होता.
पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकून पडलेले महाराज आणि त्याच वेळी स्वराज्याच्या वेशीवर धडकलेला शाहिस्तेखान अशा स्वराज्यावर आलेल्या दुहेरी संकटाने महाराज विचारात पडले. १२ जुलै १६६० ची ती काळरात्र... तलवारीबर हुकमत असलेले बाजीप्रभू देशपांडेंसह महाराज गडाबाहेर पडले. इतक्यात दरीतून सिद्दी मसूद च्या घोडेस्वारांची आरोळी ऐकायला आली. त्याचवेळी बाजीप्रभूनी वडिलकीच्या नात्याने आपली योजना सांगून महाराजांना विशाळगडाकडे रवाना केले. घोड खिंडीत मसूदचे सैन्य अडविताना बाजी दोन्ही हातात तलवारी घेऊन पहाडासारखा उभा राहून शत्रूवर सपासप वार करत होता. घनघोर लढाई... महाभयंकर रणकंदन... बाजींच्या अंगात जणू वीरश्री संचारली होती. तिकडे महाराज विशाळगड गाठण्याची पराकाष्टा करत होते. अखेर महाराज एकदाचे गडावर पोहोचले. तर इकडे बाजींच्या देहाची जणू चाळण झाली होती. गजापूरची खिंड रक्ताने भिजलेली होती. इतक्यात... विशाळगडावरील तोफेचा पहिला आवाज याजींनी ऐकला, धन्य झालो असे म्हणत असतानाच बाजींच्या देहावर शत्रूचा वार पडला. रक्त आणि जखमांनी सजलेली बाजींची मृर्ती कोसळली. आभाळाकडे एकदा पाहून बाजींनी हात जोडले. १३ जुलै १६६० रोजी गजापूरची घोडखिंड पावनखिंड झाली. बाजींच्या मनातील अखेरची घालमेल व्यक्त करताना कविवर्य कुसुमाग्रज म्हणतात
सरणार कधी रण, प्रभू तरी हे कुटवर साहू , घाव शिरी ?
पावनखिंडीत पाउल रोवून, शरीर पिंजेतो केले रण ,
शरणागतीचा अखेर ये क्षण बोलवशील का आता घरी ?
सरणार कधी रण, प्रभू तरी हे कुटवर साहू , घाव शिरी ?
तानाजी मालुसरे
शिवरायांच्या एका शब्दाखातर ऐतिहासिक पराक्रम गाजवणारे नरवीर तानाजी मालुसरे
आपले शोर्य, निष्ठा यांच्यासह प्राणाचे बलिदान देऊन स्वराज्याचा पाया बळकट करणारे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे।
सातारा जिल्ह्यातल्या गोडोली गावचे तानाजी मालुसरे है छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी होते. आत्यंतिक विद्वासातले तानाजो है। स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक घडामोडींचे साक्षीदार गहिले, बेभान होऊन लढण्याची वृत्ती असणान्या तानाजीने अफजलखान स्वारीच्या वेळीही मोलाची कामगिरी बजावली होती.
रायगडाच्या बाजुला कोकण पट्ट्यात असणाऱ्या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजींना मोठ्या विश्वासाने सोपविली होती. या भागातील उमरठे गावात राहून त्यांनी परिसरातील लोकांना आपलेसे करून स्वराज्यकार्यात सहभागी केले होते.
आऊसाहेबांच्या इच्छेखातर जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा ' किल्ला ताब्यात येण्याचा विडा तानाजींनी उचलला होता. स्वराज्याच्या कामगिरीपुढे त्यांना आपल्या संसाराचेही भान नव्हते. म्हणून काही दिवसात आपल्या मुलाचे लग्ण असताना देखील आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबा चे असे त्यांनी सांगितले होते.
४ फेब्रुवारी १६३० माघ वद्य नवमीस शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा द्रोणागिरीचा कडा कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग म्हणून निवडला. रात्रीच्या वेळी केवळ ५०० मावळ्यांसह अत्यंत दुर्गम असा कडा चढून त्यानी हल्ला केला. शत्रूशी बेभान होऊन लढतांना तानाजींची ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच त्यांनी प्राण सोडले. तानाजी गेल्याची वार्ता समजताच महाराज कोंडाण्यावर आले. तानाजीच्या पार्थीवाला अभिवादन करुन म्हणाले , अजिकय असा किल्ला जिंकला, पण माझा तानाजी गेला."
आजही कोंडाणा किल्ला तर्फ सिंहगड आणि त्याच्या आसपासचा परिसर तानाजी मालुसले व त्यांच्या मावळ्यांच्या शौर्याच्या पाऊलखुणा कणाकणात माठन इतिहासाची साक्ष देत अभिमानाने उभा आहे. धन्य ते तानाजी आणि अन्य त्यांचा पराक्रम ।
बाजी पासलकर
हिंदवी स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावणारे शूर वीर - बाजी पासलकर
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून जगाच्या इतिहासात एक तेजस्वी पर्व निर्माण केले. मोस मावळ खोऱ्याचे वतनदार असलेले बाजी पासलकर हे उत्तम न्यायदानात आणि प्रजेचे तंटे सोडविण्यात निष्णात होते.
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संग्रामात प्रारंभी सहभागी झालेले बाजी पासलकर हे स्वराज्याचे पहिले सेनापती होते. बाजींसारख्या मावळ्यांच्या बळावर सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील एकेक किल्ले स्वराज्यात दाखल झाले. विजापूरच्या आदिलशाही दरबारात शिवाजी राजांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी धडकू लागताच शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने सन १६४८ मध्ये फक्तेखानास धाडले. फत्तेखानाने जेजुरी जवळील बेलसर येथे आपला तळ ठोकत शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून तो काबीज केला. गडाजवळ फत्तेखान मराठ्यांच्या तुंबळ युद्धात लढताना एक घाव बाजींच्या समशेरधारी उजव्या हातावर झाला. बाजी प्रतिकार करण्यासाठी वळताच गनिमाने छातीवर वार केला आणि वीर योद्धा खाली कोसळला.
कावजी मल्हारला बाजी कोसळल्याची बातमी समजताच तो तीरासारखा सासवडला धावला. आपल्या धन्याचे जखमी शरीर पाठीवर वाहन नेणारी बाजींची यशवंती घोड़ी अश्रू ढाळत मंद पावलांनी माघारी येत होती. पुरंदर किल्ला येईपर्यंत बाजींनी शरीरातली धुगधुगी फक्त आपल्या शिवरायांना पाहण्यासाठी व दोन अखेरचे शब्द बोलण्यासाठी शिल्लक ठेवली होती. बाजींची पालखी गडावर आली आणि वाट चुकलेले कोकरू जसे आपल्या आईला-गोमातेला बघताच धावत सुटते, तसे राजे पालखीकडे धावले. बाजींना पाहताच राजांनी टाहो फोडला, "बाजी आम्हाला असं पोरकं करून कुठे चाललात?" अतिशय क्षीण ; पण करारी आवाजात बाजी बोलले, "आरं मा्या राजा, तुला मेटलो, औक्षाचं सोनं झालं स।" असे म्हणत शिवाजी महाराजांच्या मांडीवर डोके ठेवून बाजी पासलकरांनी प्राण सोडले. बाजी पासलकरांच्या बलिदानामुळे मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला आणि स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण केला.
जिवा महाला
होता जिवा म्हणून वाचला शिवा
पारतंत्र्याचा अंधकार दूर करून ४०० वर्षापूर्वी लाखों मावळ्यांच्या त्यागातून, पराक्रमातून आणि बलिदानातून रयतेचं स्वराज्य उभं राहिलं. स्वराज्यासाठी छत्रपती शिवरायांसोबत जे काही वीर मावळे आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत लढले, त्यापैकीच स्वराज्याचे अनमोल रत्न म्हणजे जिवा महाला.
वीर जिवाचा जन्म प्रतापगडच्या पायथ्याजी मु. पो. कॉडवली जि. सातारा येथील साकपाळ कुटुंबात झाला. आई-वडिलांच्या निधनानन्तर जिवा आणि त्यांच्या भावंडांचा सांभाळ देव महाला या आप्ताने केल्यामुळे त्यांचे आडनाव महाला असे पडले, बालपणापासूनच जिवा हा साताऱ्याच्या तालमीतला, लाल मातीत मेहनत करणारा तयार होऊ लागला. जोर, बैठका, तलवारबाजी, दांडपट्टा बालबजे याचे शिक्षण त्याला मिळाले. जिवा दांडपट्टा तर असा फिरवायचा की पायाच्या टाचेखाली ठेवलेल्या लिंबाचे तो डोळ्याचे पाते लवते न लव्ते तोवर दोन तुकडे करायचा. उंच उड्या मारण्यात तर तो निष्णात होता. उडी मार ल्याकर हवेतच शत्रूच्या शरीराचे दोन तुकडे करत असे. तरणाबांड, मान जाड पिळदार मिशा, सरळ नाक, भले मोठे कपाळ आणि तीक्ष्ण व मेदक नजरेचा जिवा पाहताच शत्रूलाही कापरे भायचे.
शिवरायांनी जिवा महालाचे अंगभूत कौशल्य हेरुन त्याला सैन्यदलात दाखल करून घेतले. प्रताप गडाच्या पायथ्याशी १० मोव्हेंबर १६५९ रोजी अफजलखानासारख्या ताकदवान सरदाराला शिवाजी राजांनी या जिवा महालामुळेच संपवला. अफजलखानाच्या अत्यंत चपळ अंगरक्षक सय्यद बंडाचा हात त्याने वरचेवर छाटून टाकला. शिवरायांचे प्राण वाचवले व स्वराज्याची घोडदौड संरक्षित केली. शिवरायांनाही जिवाच्या या चपळाईचे कौतुक वाटले. तेव्हापासूनच होता जिवा म्हणून वाचला शिवा हे वाक्य जिवा महालाच्या पराक्रमाची साक्ष देते.
स्वराज्याच्या या जिगरबाज मावळ्याला मानाचा मुजरा
हिरोजी इंदलकर
"सेवेचे ठायी तत्पर"- हिरोजी इंदलकर
स्वराज्याचे वास्तुविशारद आपल्या कौशल्याने अभेद्य, ताकदवान आणि रौद्र अशी स्वराज्याची राजधानी घडविणारे हिरोजी इंदलकर.
सुरतेच्या स्वारीवर निघण्याआधी महाराजांनी हिरोजींच्या हाती मोहरा दिल्या आणि राजे स्वारीवर निघून गेले. सन १६५६ ला हिरोजीनी किल्ले रायगडाच्या बांधणीचा श्रीगणेशा केला. जवळ-जवळ १४ वर्षे रायगडाचे बांधकाम चालले. इतकी वर्षे का लागली रायगडाच्या बांधकामाला? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. त्याचे कारण म्हणजे पंधराशेच्या आसपास गडाच्या पायऱ्या, तीनशे इमारती, राजभवन, राजसभा, राण्यांचे महाल, व्यापारी बाजारपेठा, अष्टप्रधान मंडळाची सदर, टांकसाळ, धान्याची कोठारे, तलाव, दोन, स्तंभ, गजशाळा इत्यादी असं तनमनधन लावून हिरोजी इंदलकरांनी रायगडाचे बांधकाम केले. हिरोजींनी या वास्तूच्या बांधकामावेळी पैशांची कमतरता भासल्यावर आपली वडिलोपार्जित जमीनजुमला, घर सर्वकाही विकून हा भव्य दिव्य असा डोळ्यांना दिपवणारा रांगडा असा रायगड उभा केला.
हिरोजीच्या बांधकाम कौशल्याने सजलेला आणि परिपूर्ण असा रायगड पाहिल्यावर महाराज भलतेच खुश झाले. रायगडाचे वर्णन एका वाक्यात सांगताना हिरोजी म्हणतात, "परवानगीविना गडाखालून एकच गोष्ट वर येऊ शकते, ती म्हणजे वारा आणि गडावरून एकच गोष्ट खाली जाऊ शकते, ती म्हणजे पाणी." सर्वार्थाने परिपूर्ण अशा रायगडाची भव्यदिव्य कलाकृती पाहून महाराजांनी इंदलकरांना बक्षीस म्हणून काहीतरी मागण्याचा आग्रह धरला, त्यावर हिरोजीनी आदरपूर्वक विनंती केली, की गडावर असणाऱ्या जगदीश्वर मंदिराच्या एका पायरीवर माझे नाव असावं, यामागचं कारण विचारल्यावर हिरोजींनी त्याचं स्पष्टीकरण दिलं "महाराज तुम्ही जेव्हा जेव्हा गडावर असाल, तेव्हा तेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला नक्की याल आणि आल्यावर प्रत्येक वेळी तुमच्या पायाची धूळ आमच्या मस्तकी लागावी एवढीच आमची इच्छा आहे." हे ऐकल्यावर हिरोजींची महाराजांप्रती असणारी निस्सीम भक्ती, सेवाभाव पाहून दरबारातील सर्वांचा ऊर भरून आला. महाराजांनी लगेच हिरोजींना नुसतीच परवानगी न देता त्यावर खालील मजकूर लिहिण्यास सांगितले.
"सेवेचे ठायी तत्पर...... हिरोजी इंदलकर"
0 टिप्पण्या