shree swami samarth in marathi
सुंदराबाई फार कडक स्वभावाची असून सोलापूरची राहणारी होती. तिच्या पायास कांहीं व्याधि झाल्याकारणाने ती अक्कलकोटास सेवा करण्यास राहिली. पुढे चोळाप्पाची व तिची ओळख पडल्यानंतर कांहीं चोळाप्पा करत असलेली काही सेवा तिनें पत्करली. भरविणें, स्नान घालणे, शौचास वगैरे नेणे; परंतु ती राहते वेळी महाराजांनी चोळाप्पास म्हटलें कीं, "चोळया, हिला ठेवू नको बरें. ही तुझ्या डोक्यावर मिरे वाटेल ! "
shri swami samarth
पुढें महाराजांचे म्हणण्या प्रमाणे सुंदराबाईचा पगडा चोळाप्पावर जाहला आणि तिला अतिशय धन- लोभ झाला. ती पैसे घेतल्याशिवाय यात्रेकरूंस दर्शन घेऊ देत नसे. बहुत करून महाराज तिचे वचनांत असत. कोण बाईची पूर्वपुण्याई असेल कोण जाणे ! महाराजांस 'निजा ' म्हणून सांगितले म्हणजे निजावें. ' उठा म्हणून सांगितले म्हणजे उठावें. 'आतां जेवा' म्हणून सांगितले, तर जेवावें. नको म्हणून सांगितले तर जेवू नये. एक वेळ असा चमत्कार झाला कीं, कोणी एका यात्रेकरूनें बाईस कांहीं न देतां महाराजांस दोन पेढे खाण्यास दिले. इतक्यांत बाईची नजर तिकडे पोहोंचली. बाई त्याजपाशी पूर्वी पैसे मागत होती. ते त्याने दिले नाहीत, म्हणून तिला राग आला आणि एकदम जाऊन (तिनें) महाराजांचा गळा धरला आणि ती म्हणाली, " नाहीं पेढा खावयाचा!"
अहाहा ! काय अधिकार हा! ज्याचे सत्तेने जगाचे चलनवलन होते, त्या समर्थांवर यःकश्चित जिवाची एवढी सत्ता असावी ना ? काय पुण्याईचा जोर आहे ? पुण्याई संपेपर्यंत देवादिकांचें कांहींच चालत नाहीं !
swami samarthswami samarth maharajswami samarth marathi
त्या वेळी महाराज म्हणाले, "चोळया, XX ला मस्ती फार आली !" बाईचा पैसे मिळविण्याचा असा घाट होता की, यात्रेकरू लोक आले म्हणजे महाराजांचे गंधास केशर पाहिजे, बुडाखू पाहिजे, कापूर पाहिजे, बैलास पेंड पाहिजे, नैवेद्यास साखर पाहिजे, असे जो कोणी येईल त्याजजवळ मागत असावयाचे. यात्रेकरू भाविक असल्याकारणाने बाईला पैसे देत. इतकें असून कोणी नच देईल, त्याला दर्शन होऊ द्यावयाचें नाहीं. लुगडे नेहमीं फाटकें नेसावयाचे आणि लुगड्याकरितां पैसे मागावयाचे. सहज लोकांना दया येऊन, बाई महाराजांची सेवा करीत आहे, म्हणून तिला पैसे देत. असे करून बाईनें द्रव्य बरेंच मिळविलें. जिकडून साधेल तिकडून ती द्रव्य मिळवीत असे.
shri swami samarth jai jai swami samarthswami samarth prakat din 2020swami samarth mathswami samarth prakat dinswami samarth math dadarshri swami samarth maharajshri swamisri swami samarthswami samarth math near meswami samarth swami samarth
बाईच्या अशा कृतीने महाराजांचे केव्हां केव्हां हालहि होत असत. एके दिवशी महाराज जोशीबुवांचे मठांत असतां त्या दिवशी दत्तजयंती होती. यात्रेची गर्दी फार करितां, महाराजांना सकाळी चार वाजतां स्नान घालून भोजन घातले. तितक्या पहाटेस दर्शनास आलेल्या एका गृहस्थांचे ' श्रींनीं आपला नैवेद्य ग्रहण करावा' अशा इच्छेनें पंच पक्वान्नाने ताट भरून श्रीसन्निध आणले. महाराजांची आंचवण्याची व हा नैवेद्य येण्याची एकच गांठ पडली. तें पाहून गृहस्थ फार हिरमुसला व सुंदराबाईपुढे हात जोडून त्याने विनंती केली कीं, कसेंहि करून महाराजांचे मुखांत एक घास तरी पडावा !" याबद्दल बाइस त्याने दोन रुपये देण्याचे कबूल केलें. "आतां जेवण झालें, दुपारी घालू! म्हणून बाईने सांगितले. ताट आपल्याजवळ घेतलें. दत्तजयंतीचा दिवस म्हणून हजारों लोकांची दर्शनास येण्याची दाटी असल्याकारणाने दिवसा महाराजांनी कांहींच खाल्ले नाहीं. रात्री दहा वाजेपर्यंत दाटी होतीच. मग सर्व वारासार झाल्यावर सुंदराबाईने बाळाप्पास सांगितलें कीं, " ताट वाढलेलें आहे. नवीन स्वयंपाक नको ! " बाईनें पैशाच्या लोभाने त्या गृहस्थाचे शिळे अन्न आणलेले भरविले. महाराजांनी मुकाटयाने खाल्ले. मात्र त्रिवार म्हणाले,
"आता काय नबाब झाले !" एवढ्या शब्दानें बाळाप्पास मरणप्राय दुःख अंतःकरण सद्गदित होऊन श्रींचे दोन्ही पाय पोटाशी घट्ट धरून तो रडू लागला. झाल्या चुकीबद्दल माफी मागितली व बाईचे बोलण्यावरून यापुढे महाराजांस शिळे खाण्याचा प्रसंग त्याने कधींहि येऊ दिला नाही!
कोणी नैवेद्य आणला असतां आणणारा गृहस्थ भक्तिमान् असल्यास महाराज तो ग्रहण करीत. सुंदराबाई पैशाच्या लोभानें कोणाचाहि नैवेद्य खाऊ घाली. महाराज तादात्म्यवृत्तीवर असले म्हणजे खात. देहावर आले म्हणजे तिला रागें भरत आणि म्हणत, " दुर्जनाचे अन्न खाऊं नये !" बाई दिवसेंदिवस शिरजोर होऊं लागली. तिच्यापासून चोळाप्पा व सर्व सेवेकरी यांस अति ताप होऊ लागला. एक वेळ एका भक्तानें श्रींपुढें २५ रुपये ठेविले. श्रींनीं चोळाप्पास देण्यास सांगितले. बाई रुपये देईना. शेवटीं महाराजांनी दोन-चार जोडे मारले आणि ते अतिशय रागावले. तेव्हां बाईने रागावून रुपये फेकून दिले. बाई सेवेकन्यांस नेहमी म्हणे, "फुकटचे खातात आणि पुष्ट झाले आहेत !" हे ऐकून महाराज म्हणाले, , तुझ्या बापाचे ते नोकर आहेत काय ?" काय गे
gurupeeth trimbakeshwarswami samarth samadhi mathshri gurupeeth online shoppingswami samarth and gajanan maharaj
महाराज सेवेकऱ्यास मोठ्या प्रेमाने वागवीत. एखादे वेळी सेवेकरी कांहीं काम चुकला म्हणजे " नमस्कार हो नमस्कार !" असें समर्थ म्हणत. त्या बरोबर सेवेकऱ्यास मरणप्राय दुःख होत असे. सेवेकरी पत्ते खेळण्यास लागले कि , पत्ते फेकून द्यावे आणि "अरे, आयुष्य गेले रे गेले !" (असें म्हणत.) फुकट्या गोष्टी बोलूं लागले, म्हणजे , काय रे, कोणी तुला काय करावयाचें आहे ?" सेवेकरी उंचावर बसला म्हणजे त्याला खाली बैस !' म्हणून सांगावे. कोणास ज्ञान पाहिजे असल्यास, " शिकून जा!" म्हणून सांगावे. बाळाप्पानें एक दिवस एका यात्रेकऱ्यावरोबर इकडच्या तिकडच्या गोष्टी काढल्या. तेँ ऐकून, " काय रे मादरचोदा, त्याच्या गांवास तुला जावयाचे आहे काय ?" बाळाप्पाने आपले दोन्ही कान उपटून घेतले महाराज सर्वांचे केवळ कल्पतरुच होते.
स्वामी समर्थ बखरीतून साभार ...!
0 टिप्पण्या