बिटकॉइन म्हणजे काय आणि ते कसे मिळवावे ?

 cryptocurrency information in marathi

आजच्या या डिजिटल आणि तंत्रज्ञान युगात आपल्याला दररोज नवनवीन आणि सृजनशील संकल्पना पाहायला मिळतात..!यातलीच एक संकल्पना म्हणजे (cryptocurrency) क्रीप्टो करन्सी ...! नाही नाही ही संकल्पना नवीन नाही हिचा जन्मच मुळी २००९ साली झाला आहे .परंतु आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल एवढि सुपरिचित ही नाहीये..! तर आपण या लेखात जाणून घेऊया की क्रीप्टो करन्सी म्हणजे नक्की काय भानगड(!) आहे ते?


cryptocurrency in marathi

क्रीप्टो करन्सी म्हणजे एक डिजिटल चलन आहे. जे काल्पनिक रित्या अस्तित्वात आहे. ज्याचा वापर तुम्ही ऑनलाईन खरेदीसाठी करू शकता तसेच कोणाला पाठवू शकता आणि घेऊ शकता म्हणजे अगदी तसेच जसे तुम्ही आपला फोनपे किंवा गुगल पे वापरून तुमच्या बँक खात्यातील रक्कम वापरता ..!
जसे आपल्या रुपयाचे किंवा जगातल्या कोणत्याही चलनाचे मूल्य हे बदलत असते (चढत असते किंवा उतरते) त्याच प्रमाणे या चलनाचे मूल्य देखील बदलत असते.
हे बहुतांशी शेयर बाजारा सारखे आहे.
ज्याप्रमाणे आपण एखाद्या कंपनीचे शेयर घेतो आणि आपल्याला फायदा झाला तर विकतो त्याच प्रमाणे हे काम करते.
सोप्या शब्दात याची कार्यप्रणाली सांगतो म्हणजे लवकर लक्षात येईल.
उदाहरणार्थ:-
मला बीटकोईन हे क्रीप्टो चलन घ्यायचे आहे आणि माझ्याकडे २ करोड रुपये आहेत गुंतवणुकीसाठी ( समजा!) तर आजच्या घडीला एका बिटकोईन ची किंमत बघितली तर ४० लाख रुपये आहे ( घाबरु नका! टोटल ४००० क्रीप्टो चलन अस्तित्वात आहेत काही काही तर २० -३० रुपया पासून चालू होतात)
त्यामुळे ४० लाख या भावाने २ करोड रुपयात मी ५ बिटकोईन घेऊ शकतो उद्या या बिटकोईन ची किंमत वाढून ४५ लाख झाल्यावर त्याला विकून मी एका बिटकोईन मागे ५ लाख रुपये कमवू शकतो ते ही कोणतीही उठाठेव न करता घरबसल्या..!


आणखी एक महत्वाची गोष्ट हे चलन तुम्ही पूर्णांकात ही घेऊ शकता. म्हणजेच समजा एखादे चलनाची सध्या किंमत 2500 रुपये आहे आणि तुमच्याकडे आता फक्त हजार रुपये आहेत ज्याचे तुम्हाला क्रिप्टो खरेदी करायचे आहेत . तर तुम्हाला 1000 रूपया मध्ये तुम्ही 0.4 चलन घेऊ शकता.
आता जाणून घेऊया जगातील सर्वात जुन्या आणि मूल्यवान क्रिप्टो चलनाविषयी हो अगदी बरोबर ओळखलंत तुम्ही बिटकोईन..!
बिटकोईन हे २००९ साली जगाला परिचित झाले ते सातोषी नाकामोटो (satoshi nakamoto) या व्यक्तिद्वारे .
हा व्यक्ती नेमका कोण आहे याबद्दल कोणालाच माहीत नाही. काही लोकांचे असे मत आहे की, बिटकोईन निर्माता हा एक व्यक्ती नसून एक समूह आहे.! आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी म्हणून तो किंवा ते ओळख लपवतात.
जगातील एकूण बिटकोईन पैकी ९,८०,०० कोईन त्यांच्याकडे आहेत. आणि आज एक बिटकोईन ४५ लाख रुपये किमतीचा आहे.

meaning of cryptocurrency in marathi

त्यावरून तुम्ही या संपत्तीचा अंदाज लावू शकता.
आपल्याला माहीत असेल की शेयर बाजारावर नियंत्रण ठेवण्याचं काम सेबी बोर्ड करते. पण बिटकॉईन एक decentralized currency आहे म्हणजेच यावर कोणत्याही बँक अथवा सरकारचे नियंत्रण नाही. जसे आपण वापरत असलेल्या इंटरनेट वर कोणाचेही नियंत्रण किंवा मालकी नाही.
२०१० साली फक्त ५ रुपये किंमत असलेल्या या चलनाची किंमत आज रोजी ४५ लाख रुपये एवढी आहे म्हणजे कवडीमोल घेतलेल्या या चलनाने लाख पटीने परतावा दिला आहे आणि भविष्यातही तो वाढतच जाणार आहे.
खाली दिलेल्या आलेखा वरून तुम्ही हे पाहू शकता.


बिटकोईनची किंमत वाढण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे आपल्या व्यवहारातील गुप्तता..! बिटकोईन ज्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानवर आधारित आहे त्यामध्ये व्यवहार (transaction) कोणत्या व्यक्तीमध्ये झाले आहे हे सहजासहजी कळत नाही त्यामुळे काळे धंदे करणाऱ्या बाजारात हे चलन फार लोकप्रिय झाले आणि याच गोष्टीमुळे सर्व सरकारी सुरक्षा संस्था यावर नजर ठेवून आहेत.
बिटकोईन नंतर बरेच क्रिप्टो आले जसे की एथिरीम थिटा मॅटिक डोजकोईन आणि आणखी बरेच पण बिटकोईन चे मूल्य कोणी गाठू शकले नाही .
सध्या डोजकोईन क्रिप्टो ला खूप जास्त मागणी आहे मागच्या काही महिन्यांपूर्वी फक्त ४ रुपये किंमत असणाऱ्या या डोजकोईन ची किंमत 10 एप्रिल ते 28 एप्रिल मध्ये 30 रुपया पर्यंत जाऊन पोहचली आहे. याला कारण आहे एलोन मस्क होय तोच टेस्ला चा निर्माता मस्क सातत्याने डोजकोईन बद्दल ट्विट्स करत आहे आणि त्यामुळे भरपूर लोक याची खरेदी करत आहेत आणि खात्रीपूर्वक अनुमान आहे की ८ मे ला याची किंमत आणखीन वाढणार आहे.
याचे कारण म्हणजे मस्क ने सध्या केलेलं हे ट्विट.:-

आता मुख्य प्रश्न म्हणजे हे क्रिप्टो मिळवायचे कसे तर हे तुम्ही ३ प्रकारे मिळवू शकता १) तुम्ही वझीरेक्स(wazirex) किंवा कॉइनस्विच(coinswitch) या एप द्वारे चालू किमतीत पैसे देऊन क्रिप्टो घेऊ शकता
२) बिटकॉईन माइनिंग म्हणजे उच्च क्षमता असलेले ग्राफिक कार्ड आणि प्रोसेसर वापरून बिटकॉईन तयार करणे आणि त्याला वापरात आणणे मी पुढील लेखात याबाबद्दल लिहिणार आहे पण ही गोष्ट खूप खर्चिक आहे यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक लागते.
३) यात तुम्ही गेम्स खेळून बिटकॉईन मिळवू शकता उदा. हंटर कोईन स्टॉर्म परंतु या गेम्स च्या विश्वासार्हतेबद्दल शंका आहे त्यामुळे या मार्गाने न जाणच बर..!
निष्कर्षांती तुम्ही पहिला मार्गच निवडावा अशी माझी सर्वाना विनंती आहे जेणेकरून आपल्याला काही नुकसान होऊ नये याची काळजी घेता येईल

हे क्रिप्टो मार्केट २४ तास आणि सातही दिवस चालू असते अनुभव असलेले लोक यात रोजचे काही हजारांपासून ते काही लाखांपर्यंत सहज कमावतात.

ह्या चलनांच्या किमती या मागणी आणि पुरवठा या तत्वांवर अवलंबून असतात म्हणजे बाजारात किती क्रिप्टो चलन अस्तित्वात आहेत आणि त्यांची मागणी आहे की नाही या आधारे किमती चढत आणि उतरत असतात त्यामुळे प्रत्येकाने गुंतवणूक करताना पूर्ण अभ्यास करून मगच एखादया चलनात गुंतवणूक करावी असा सल्ला मी माझ्यावतीने सगळ्यांना देतो.
तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुम्ही आपल्या मित्र परिवाराला नक्की शेयर करा ज्याने करून त्यांनाही या गोष्टीचे ज्ञान होईल..!
धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. खूप उपयोगी माहिती आपण सांगून सर्वास शहाणे करत आहात. आपल्या या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा