EWS CERTIFICATE म्हणजे काय ? आणि ते कसे तयार करावे?

     सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने दिलासा म्हणून राज्य सरकारने मराठा आरक्षणसंबंधी अध्यादेश जारी केला आहे.एकूण जागांपैकी १० टक्के जागांवर तुम्ही EWS आरक्षणाच्या आधारे अर्ज करू शकता परंतु SEBC आरक्षणाचा लाभ घेणार्यांना या EWS आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.




EWS पात्रता २०२१

भारताचा कुठलाही नागरिक जो SC / ST किंवा OBC या आरक्षण वर्गाचा लाभ घेत नाही आणि ज्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ८ लाखाच्या खाली आहे अशी व्यक्ती या आरक्षणासाठी पात्र असते
आणखी काही अटी:-

१) लाभार्थी हा खुल्या प्रवर्गातील (general category) असावा.

२) वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी असावे.

३) शेतजमीन ५ एकर क्षेत्रफळ पेक्षा कमी असावी.

४) राहते घर/ जागा १००० स्क्वेअर फूट पेक्षा कमी क्षेत्रफळाचे असावे

५) प्लॉट हा १०० स्क्वेअर यार्ड पेक्षा कमी क्षेत्र फळ असलेला असावा


आवश्यक कागदपत्रे:-

खाली EWS अर्जासाठी लागणाऱ्या महत्वाच्या कागदपत्रांची यादी दिली आहे.
१) आधार कार्ड
२) उत्पन्नाचा दाखला
३) पॅन कार्ड
४) जात प्रमाणपत्र
५)बँक स्टेटमेंट
६) BPL कार्ड (ऐच्छिक)
७) पासपोर्ट आकारातील फोटो
८ ) शपथ पत्र
९) शाळा सोडल्याचा दाखला
१०) वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला

महत्वाच्या बाबी:-

१) सर्वप्रथम उत्पन्नाचा दाखला हा तहसीलदार यांच्याकडून बनवून घ्यावा.
२) जर अर्जदार हा विद्यार्थी असेल तर त्यांनी आपल्या वडिलांच्या उत्पन्नाचा दाखला जोडावा.
३) आपल्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य आहे.
४) लग्न झालेल्या गृहिणीने नवऱ्याच्या नावाने उत्पन्न दाखला बनवला तरी चालेल.


अर्ज कसा करावा:-


१) सर्वप्रथम आपल्या जवळील तहसील कार्यालयात जावून सेतू सुविधा केंद्रातून अर्ज घ्यावा.
२) अर्जात विचारलेली सर्व आवश्यक माहिती पुर्णपणे भरावी.
३) अर्जात नमूद केलेली आवश्यक सर्व कागदपत्रे व त्यांची झेरॉक्स लावावी .
४) हा अर्ज पूर्ण पडताळून बघून तो तहसील कार्यालयात जमा करावा.
५) तुमचे EWS सर्टिफिकेट तुम्हाला सामान्यतः ३-४ दिवसात मिळते. कार्यालयीन कामकाजानुसार हा कालावधी कमी जास्त होऊ शकतो.

टीप:- तुमच्या सोयी साठी तुम्ही जवळील कॉमन सर्व्हिस सेंटर ला सम्पर्क करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या