शेयर बाजार म्हटलं की डोळ्यासमोर येतात शेयर्स चे चढते उतरते भाव ..! कोणी नफा कमावतो तर कोणी तोटा करून घेतो..! काही लोक हा जुगाराचा खेळ समजून या पासून लांब राहणेच पसंत करतात..! परंतु शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याअगोदर आपल्याला काही महत्वाच्या संकल्पना माहीत असणे अत्यंत आवश्यक असते आणि ह्याच गोष्टी आपले नुकसान होण्यापासून आपल्याला वाचवतात.
या लेखात आपण जाऊन जाणून घेऊया रिस्क रिवार्ड रेषो (Risk Reward Ratio) आणि रिस्क मॅनेजमेंट अर्थात मनी मॅनेजमेंट बद्दल. सोप्या शब्दात सांगायचे म्हटले तर रिस्क रिवार्ड रेषो म्हणजे आपण गुंतवणूक करताना किती रकमेची जोखीम घेतली पाहिजे आणि त्या जोखमी वर आपल्याला किती परतावा किंवा नफा मिळवता येईल याचा अंदाज होय. त्या अगोदर जाणून घेऊया रिस्क मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय आणि रिस्क मॅनेजमेंट गरजेचे का आहे ?
आजकाल शेयर बाजारात खूप सारे इंट्राडे ट्रेडर्स (दररोज शेयर ची खरेदी- विक्री करून नफा कमावणारे)आणि गुंतवणूकदार एका रात्रीत करोडपती होण्याचे स्वप्न बघून गुंतवणूक करत असतात; परंतु अशा प्रकारची अपेक्षा ठेवणे हेच एक मूर्खपणा चे लक्षण आहे. जेव्हा एखादा नवीन गुंतवणूकदार इंट्राडे ट्रेडिंग चालू करतो त्यावेळेला इंट्राडे ट्रेडिंग बद्दल त्याला कोणताही अनुभव नसतो आणि इंट्राडे ट्रेडिंग हे पुस्तकी ज्ञान किंवा ऐकीव माहितीच्या आधारे नाही तर अनुभव घेऊनच आपण शिकू शकतो. जसं पाण्यात पडल्या शिवाय आपल्याला पोहता येत नाही त्याच प्रकारे खरोखरीच इंट्राडे ट्रेडिंग चा अनुभव घेतल्याशिवाय त्यात आपण १०० टक्के यशस्वी होऊ शकत नाही.
शेअर बाजारा बद्दल असं म्हटलं जातं के येथे माणूस आपल्या चुकांमधूनच भरपूर काही शिकतो परंतु या प्रक्रियेदरम्यान आपल्याला एखादी मोठी रक्कम गमवावी लागू शकते. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करण्याअगोदर गुंतवणूकदाराला रिस्क मॅनेजमेंट करणे गरजेचे असते याद्वारे कळते के गुंतवणूकदार किती रिस्क(जोखीम) घेऊ शकतो आणि त्याच्या दैनंदिन आर्थिक स्थिती वर या गोष्टीचा किती प्रभाव पडू शकतो. रिस्क मॅनेजमेंट करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला आपली रिस्क प्रोफाइल तयार करावे लागेल म्हणजेच आपल्याला हे ठरवावे लागेल की आपण किती जोखीम घेऊ शकतो. तुमची गुंतवणूक तुमच्या रिस्क प्रोफाइल अनुसारच असली पाहिजे. आपली रिस्क प्रोफाइल हे आपले वय, जबाबदाऱ्या ,आपली आवक व बचत आणि आपली आर्थिक परिस्थिती बघूनच ठरवली पाहिजे जर तुम्हाला इन्ट्राडे ट्रेडिंग करायची असेल तर तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट करताच आले पाहिजे. काही ट्रेडर बाजारात येऊन खूप सारे पैसे गुंतवतात परंतु रिस्क मॅनेजमेंट कडे लक्ष न दिल्यामुळे त्यांना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो ज्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती मंदावते आणि त्यामुळेच त्यानंतर ते शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत नाहीत. जर तुमच्याकडे जोखीम घेण्याची क्षमता नसेल तर शेअर मार्केट पासून दूर राहुन एफडी, पी पी एफ किंवा पोस्ट ऑफिस बचत खात्यामध्ये तुम्ही आपले पैसे सुरक्षित ठेवले पाहिजे. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये रिस्क मॅनेजमेंट संकल्पनेचा उपयोग करणे खूपच गरजेचे आहे कारण याचा उपयोग करूनच गुंतवणूकदार मोठ्या कालावधीसाठी बाजारात यशस्वी पणे ट्रेडिंग करू शकतो.
मित्रांनो रिस्क मॅनेजमेंट साठी दोन टक्क्यांच्या नियम बनवला गेलेला आहे हा दोन टक्के (२%) चा नियम पूर्ण जगात प्रसिद्ध आहे तर बघूया हा दोन टक्क्याचा रिस्क मॅनेजमेंट नियम नेमका काय आहे ? जर आपण एखादी ट्रेड(गुंतवणूक) करत आहात तर आपल्या ट्रेडिंग खात्यातील संपूर्ण रक्कमेच्या दोन टक्के रकमेपेक्षा जास्त आपण रिस्क घेऊ शकत नाही. हा नियम तुम्ही अमलात आणला तर तुम्हाला ट्रेडिंग मधल्या संपूर्ण रकमेच्या फक्त दोन टक्के रकमेवर नुकसान होईल. अचानक होणाऱ्या मोठ्या नुकसानापेक्षा २ टक्के नुकसान हे सहन करण्यायोग्य असते. शेअर मार्केट हे खूप चंचल आणि आक्रमक आहे जर तुम्ही अंदाज लावल्याप्रमाणे बाजार वर खाली होत आहे तर ते तुमच्यासाठी चिंतेचा विषय नाही परंतु जर तुमचा अंदाज चुकला तर या नियमाचा वापर करून तुम्हाला फक्त दोन टक्के नुकसान होईल . आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ब्रोकरेज आणि टॅक्स चा समावेश देखील या दोन टक्क्यांमध्ये व्हायला पाहिजे परंतु दर वेळेस हे शक्य होईल असे नाही.
या नियमामुळे होणारा सर्वात महत्वाचा फायदा असा आहे की जर ट्रेडर एका दिवसातून चार-पाच वेळा जरी ट्रेड मध्ये हरला तर त्याला जास्त नुकसान होत नाही आणि दुसऱ्या दिवशी या नुकसानाची भरपाई तो नफा कमवून करू शकतो आता आपण एक उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला समजून जाईल ही रिस्क मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय आहे? समजा तुम्ही एक लाख रुपयांची गुंतवणूक करत आहात तर आपली जोखीम (Risk ) ही पूर्ण गुंतवणुकीच्या दोन टक्के म्हणजेच दोन हजार रुपये असली पाहिजे याचाच अर्थ जर तुम्ही एक लाख रुपयाचे शेयर विकत घेतल्यावर तुम्हाला जर तोटा होत असेल तर जास्तीत जास्त तुम्ही २००० रुपये तोटा सहन केला पाहिजे त्यांनतर तुम्ही त्या ट्रेड मधून बाहेर पडले पाहिजे जेणेकरून तुमचा तोटा आणखी वाढणार नाही. हा नियम खूप वर्षाच्या अध्ययनातून बनवला गेलेला आहे त्यामुळे तुम्ही मनात कोणतीही शंका न ठेवता किंवा प्रश्न न ठेवता या नियमाचे तुम्ही पालन करा म्हणजे तुम्हाला या नियमाचे रहस्य अनुभवातून कळून येईल आता तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट बद्दल कळालेच असेल..!
आता आपण जाऊया पुढील विषयावर रिस्क रिवार्ड रेषो म्हणजे काय आणि त्याला कशा प्रकारे उपयोगात आणावे? मित्रांनो जेव्हा आपण टेक्निकल एनलिसिस वापर करून ट्रेडिंग करतो तेव्हा एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे कोणतीही टेक्निकल ऍनालिसिस स्ट्रॅटेजी तुम्हाला 70 टक्के पेक्षा जास्त अचूक रिझल्ट देऊ शकत नाही. आकड्यानुसार बघितले तर प्रत्येकी दहा पैकी तीन टेक्निकल ऍनालिसिस हे फेल होतातच आणि जेव्हा टेक्निकल ऍनालिसिस फेल होतात त्यावेळी रिस्क रिवार्ड रेषो आपले नुकसान होण्यापासून आपल्याला वाचवते. रिस्क रिवार्ड रेषो मध्ये एक अनुपात तीन (१:३) ला सगळ्यात प्रसिद्ध नियम मानला जातो सगळे मोठे मोठे ट्रेडर्स या नियमाचे पालन करतात आता बघूया एक अनुपात तीनचा (१:३) नियम काय आहे ?. हा नियम हे सांगतो जर तुम्ही ट्रेडिंग करत आहात आणि तुम्ही एक रुपयाचा स्टॉप लॉस लावला आहे तर तुम्हाला तुमचे टार्गेट तीन रुपयाचा ठेवलं पाहिजे तीन पेक्षा जास्त असलं तरी चालेल पण तीन पेक्षा कमी नको यालाच एक आदर्श आणि यशस्वी ट्रेडिंग मानले जाते.
उदाहरणादाखल जर तुम्ही एक लाख रुपयांच्या ट्रेडिंग वर एक हजार रुपयाचा स्टॉप लॉस लावला तर तीन हजार रुपयाचा टारगेट लावला पाहिजे म्हणजेच तुमच्या स्टॉपलॉस च्या तुलनेत तुमचा टारगेट हा तीन पट असले पाहिजे जर तुमच्या ट्रेड ह्या नियमा मध्ये बसत नाही तर तुम्हाला हा ट्रेड घेतला नाही पाहिजे कारण यात आपला काहीही नफा होणार नाही.
आता आपण बघूया की हा नियम एवढा महत्वपूर्ण का आहे जसं की आपल्याला माहितीच आहे की कोणताही टेक्निकल ऍनालिसिस आपल्याला ७० टक्के पेक्षा अचूक निकाल देऊ शकत नाही .
समजा आपण एका हप्त्यात १० ट्रेड केले आणि जर तुम्ही रिस्क रिवार्ड रेषो एक अनुपात एक (१:१) असा घेऊन चालत आहे म्हणजे एक रुपयाचा स्टॉपलॉस आणि एक रुपयाचा टार्गेट जसे की खूप लोकं करतात. म्हणजेच दहापैकी तीन ट्रेडचा स्टॉप लॉस हा हिट होणारच आहे. दहा पैकी तीन ट्रेड मध्ये खूप मोठी संभावना आहे की आपल्याला नुकसान सहन करावे लागू शकते(७० टक्के अचूकते मुळे ) आता आपल्या कडे नफ्याचे ७ च ट्रेड उरले आहे या ७ पैकी ३ ट्रेड देखील आपल्या तोट्यातील ट्रेड ची भरपाई म्हणून गृहीत धरले तर आपल्याकडे नफ्याचे फक्त ४ ट्रेड उरतात. यातील ३ ट्रेड हे ब्रोकरेज आणि टॅक्स मध्येच खर्च होऊन जातील. आता आपल्याकडे उरला फक्त एक ट्रेड चा नफा तो देखील इंटरनेट बिल इलेक्ट्रिसिटी यात खर्च होइल याचाच अर्थ एवढे सगळे करून तुमच्याकडे उरतो शुन्य नफा.
आता बघूया जर तुम्ही रिस्क रिवार्ड रेषो हा १:२ ठेवला तर..!
आता तुमची टेक्निकल अनालयसीस ची अचूकता ही ७० टक्के आहे आणि तुम्ही एका हफत्यात जर १० ट्रेड करत आहात ७० टक्के अचूकता असल्यामुळे तुमचे १० पैकी ३ ट्रेड हे तोट्यात जाणार आहेत म्हणजेच स्टॉप लॉस हिट करणार आहेत आता उरले नफ्यातील ७ ट्रेड..!
आता या १:२ च्या रेषो मध्ये तुमचा टार्गेट दुप्पट आहे यामुळे तुमच्या ३ ट्रेड चा तोटा हा उरलेल्या ७ पैकी २ ट्रेड मध्येच भरून निघेल आता आपल्याकडे नफ्याचे ५ ट्रेड उरले आहेत. या पैकी ३ ट्रेड हे तुमचे ब्रोकरेज आणि टॅक्स तसेच इलेक्ट्रिसिटी आणि इंटरनेट बिल चा खर्च मानले तर अपक्याकडे नफ्यातील फक्त २ च ट्रेड राहतील जो खूपच कमी नफा आहे.
आता बघूया जर आपण आपला रिस्क रिवार्ड रेषो हा १:३ ठेवला तर काय होईल.
जर आपण एका आठवड्यात १० ट्रेड केले आणि आपला रिस्क रिवार्ड रेषो १:३ असेल तर ७० टक्के अचूक टेक्निकल अनालयसीस द्वारे आपले ७ ट्रेड नफ्यात तर ३ तोट्यात असतील या ७ मधील एका ट्रेड मध्ये तुमचे संपूर्ण नुकसान हे भरून निघेल आता उरलेल्या ६ पैकी एक ट्रेड इंटरनेट आणि वीज बिल यांचा खर्च मानला तर तुमच्याकडे फायदेशीर नफा असलेले ५ ट्रेड अजूनही उरलेले आहेत.
रिस्क रिवार्ड रेषो चा १:३ चा नियम हेच सांगतो की जेव्हा तुम्ही एखादा ट्रेड करता तेव्हा तुमचा स्टॉप लॉस पेक्षा टार्गेट हे तीन पटीने जास्त असले पाहिजे. जर ट्रेड करताना १:३ हा रेषो पाळला जात नसेल तर तो ट्रेड करून नये कारण नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. जेव्हा तुम्ही या नियमाद्वारे टार्गेट हिट करता त्यावेळी तुम्ही जास्त नफा कमविण्यासाठी ट्रेलिंग स्टॉप लॉस थियरी चा उपयोग केला पाहिजे.
मित्रांनो शेयर मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी luck फॅक्टर पेक्षा fundamental analysis आणि technical analysis आणि मार्केट सेंटिमेंट याचा अभ्यास करूनच गुंतवणूक करा जेणेकरून तुम्हाला पश्चात्ताप होणार नाही..!
0 टिप्पण्या