मनसुख हिरेन च्या हत्येचे रहस्य ..! ।। अँटिलीया स्फोटक प्रकरण..!

     17 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा असिस्टंट इन्स्पेक्टर, सचिन हिंदुराव वाजे यांना मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आले.इतक्या वर्षांनंतर, 6 जून, 2020 रोजी, हे 49 वर्षीय पूर्व अधिकारी परत अचानकपणे दलात भरती झाले. (परमबीर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समितीच्या शिफारशीमुळे, अजूनही अधिकृतरीत्या निलंबित आहेत.) वाजे यांना फक्त परत आणण्यात आले नाही तर, CIU  म्हणजेच क्राईम इंटेलिजन्स युनिट  या 20 ऑफिसर्स आणि 70 कॉन्स्टेबल्सच्या ताफ्याचा त्यांना प्रमुख बनवण्यात आले. त्यांना अनेक हाय-प्रोफाईल कैसदेखील सोपण्यात आल्या. त्यात आहेत, दिलीप छाब्रिया आणि अर्णब गोस्वामींची अटक तसेच सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण, इत्यादी.



पण एक केस अशी होती, ज्यात अनेक गुपिते उघडकीस आली.ऑटोमोबाईल पार्टसचे डीलर, मनसुख हिरेन यांचे दुकान,  ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या शेजारीच होते जाहीर होते की वाजे यांची पकड त्यांच्यावर असेलच कारण ते नियमित रूपाने आपल्या  "मित्राची" (मनसुखची ) ग्रे-ग्रीन स्कॉर्पिओ "उधार" घेत असत.वाजे यांनी ती कार अनेकवेळा पोलीस कार्यात पण वापरली, (जसे की नोव्हेंबर 2020 मध्ये ते रायगड पोलिसांसोबत अर्णब गोस्वामी यांना अटक करायला गेले होते.) तिकडे एनकौंटर स्पेशलिस्ट, विनायक शिंदे हे तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. कारण त्यांनी एक व्यापारी प्रतिस्पर्धीच्या बोलण्यात येऊन "लखन भैय्या उर्फ रामनारायण गुप्ताची बेकायदेशीर हत्या केली होती. ( नोव्हेंबर 2006मध्ये 13 अन्य पोलीस कर्मचाऱ्यांसोबत निलंबित त्यांना निलंबित करण्यात आले होते) विनायक शिंदे पॅरोलवर बाहेर आल्यावर आपले जुने मित्र वाजे यांना भेटण्यासाठी ते नेहमीच दक्षिण मुंबईच्या कॉफ्रर्ड मार्केट, पोलीस मुख्यालयात, चौथ्या मजल्यावर त्यांच्या कार्यालयात येत असत.संभवत: ह्याच बैठकीदरम्यान एक योजना आखण्यात आली.प्लॅननुसार, 17 फेब्रुवारी, 2021 रोजी, मनसुख हिरेन हे आपल्या ग्रे-ग्रीन स्कॉर्पिओमध्ये ठाण्यातील आपल्या घरातून दुकानाकडे निघाले अचानक त्यांनी कार विक्रोळी-हायवेच्या बाजूला थांबवली. स्कॉर्पिओ तिथेच सोडून त्यांनी टॅक्सी पकडली... आणि तिथून ते निघाले.नंतर ते क्राईम इंटेलिजन्स युनिटच्या एखाद्या व्यक्तीस भेटले... आणि त्याला कारची चावी दिली. पुढील दिवशी, हिरेन विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले माझी गाडी बंद पडली होती,मी परत जेव्हा तिला दुरुस्त करण्यासाठी आलो,तेव्हा ती चोरीला गेली होती.पण खरी गोष्ट ही होती की, क्राईम इंटेलिजन्स युनिटच्या त्या व्यक्तीने ती कार विक्रोळी हायवेवरून उचलली.आणि वाजे यांच्या ठाण्यातल्या घराच्या पार्किंगमध्य लावली.  NIA अनुसार ती कार 17 ते 24 फेब्रुवारीपर्यंत तिथेच होती.25 फेब्रुवारीला मध्यरात्री 02:00 वाजता, वाजे यांचा खाजगी ड्रॉयव्हर  गाडी घेऊन ठाण्यातून निघाला. रस्त्यात CIUची एक इनोव्हा कार स्कॉर्पिओसोबत चालू लागली, जे वाजे स्वतः चालवत होते. दोन्ही कार 42 किलोमीटरचं अंतर कापत, दक्षिण मुंबईच्या टोनी कारमायकल रोड इथे पोहचल्या.विशेष रूपाने, “अँटिलीया" जवळ, भारताच्या सर्वात श्रीमंत व्यक्ती यांच्या 27 मजली घराच्या बाजूला. लक्ष्यच्या घरापासून फक्त 300 मीटर अंतरावर, 02:30 वाजता स्कॉर्पिओ पार्क करण्यात आली. PPE किट घातलेले वाजे, स्कॉर्पिओमधून उतरून इनोव्हामध्ये बसले. लगेच इनोव्हा तिथून निघाली.पहाटे 3 वाजता, इनोव्हा ही मुलुंड टोलनाक्याकडून ठाण्याकडे जाताना दिसली. परत काही वेळानंतर ती परत एक नवीन नंबर प्लेटसोबत!2 तासांनंतर वाजे परत आले,यावेळेस त्यांनी कुर्ता-पायजमा घातला होता आणि चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. स्कॉर्पिओमध्ये त्यांनी एक चिट्टी सोडली.

सकाळ झाली आणि अँटिलीयाचे सुरक्षा अधिकारी स्कॉर्पिओला बघताच सतर्क झाले.. ते  घाबरले कि .ह्या गाडीचा नंबर मॅडमच्या गाडीच्या नंबर सारखाच कसा आहे? घाबरलेल्या सिक्युरिटी ऑफिसरने पोलिसांना फोन केला.सर, काले रात्रीपासून एक गाडी  इथे उभी आहे, आम्हाला शंका आहे की काहीतरी गडबड आहे, लवकर या.ट्राफिक पोलीस सर्वात आधी तिथे पोहचली. खिडकीची काच फोडून त्यांनी गाडी उघडली. आत 20 जिलेटीनच्या कांड्या होत्या, त्यात कोणतेच डिटोनेटर नव्हते, त्याशिवाय विस्फोट होत नाही. चिठ्ठीत लिहले होते डिटोनेटर का नव्हते लावण्यात आले.  आणि लिहिले होते  कि हे फक्त एक ट्रेलर आहे नीता वाहिनी आणि मुकेश भाऊ.पुढील वेळेस सर्व तयारी करण्यात येईल. त्याचसोबत गाडीत अजून 5 नंबर प्लेट्स मिळाल्या, ज्यांचे नंबर है नीता अंबानी यांच्या सुरक्षा ताफ्यातील इतर कार्ससोबत जुळत होते. त्यांना दाखवायचे होते की, त्यांच्याकडे अंबानी कुटुंबाची सर्व माहिती आहे. स्पष्ट होते की कार बॉम्ब इतक्या दूर होता की इमारतीला काहीच झाले नसते.

पण... जर योग्य वेळेस स्फोट घडवण्यात आला तर तिथून जाणाऱ्या वाहनांना नक्कीच उडवता आले असते.  शेवटी मुंबई पोलीस घटनास्थळी आली. आणि आले तरी कोण?सचिन वाजे...ह्या सर्व प्लॅनचे कथित मास्टरमाइंड !देखाव्या साठी ते  आपल्या सोबत बोंबस्क्वाड आणि  श्वानपथक घेऊन आले . CIU ऑफिसर्स नि स्कॉर्पिओ मालकाचा पत्ता लावला आणि मनसुख हिरेन  यांना मुंबईच्या घाटकोपर आणि विक्रोळी पोलिस ठाण्यात विचारपूस करण्यासाठी बोलवले. वाजे  यांनी स्वतः मनसुख  यांची विचारपूस केली  त्यांच्या पत्नी अनुसार 


 वाजे मनसुख ला म्हणाले , तू स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करून टाकतात  काही दिवसातच प्रकरण दाबून टाकेन आणि  तुला बाहेर काढून घेईल नंतर ATS म्हणजे anti-terrorism स्क्वॉड् ने मनसूखला बोलवले आणि चौकशी  केली  मनसूखला असे वाटले की प्रकरण आता हाताबाहेर जात आहे  आणि त्यांनी मदतीसाठी मुख्यमंत्र्याना  विनंती केली कि, पोलीस आणि मीडीयांचा प्रश्न मुळे त्रस्त झालो आहे  मला जाणून बोलून दोषी सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत 


प्रकरणाने एक नवीन वळण घेतले जेव्हा दोन दिवसानंतर टेलीग्राम वर एक संदेश  व्हायरल झाला 

"अंबानी यांना भाजपची साथ देणे महाग  पडेल आम्ही मागितलेली रक्कम दिली नाही तर परिणाम वाईट होतील" पण संदेश एक चाल होती, जेणेकरून हे प्रकरण मुंबई पोलिसांकडून काढून घेऊन NIAला दिले जाईल, कारण सर्व दहशतवादी प्रकरणांमध्ये असेच केले जाते.विरोधी पक्षनेते, देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाजेंवर शंका घेण्यामागे कारण होते.2016 मध्ये जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांना भाजप-शिवसेना युतीतील उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता ठाकरे म्हणाले ".माझी इच्छा आहे की सचिन वाजे यांना पोलीस दलात परत भरती करण्यात यावे".त्यांना समजावण्यासाठी काही लोक गेले आणि महाधिवक्ता यांनी वाजे यांना परत पोलीस दलात घेतल्यास, उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन होईल  असा सल्ला दिल्यानंतर त्यांनी ती मागणी मागे घेतली. 

तोपर्यंत वाजे यांना कळून चुकले होते की NIA येण्याअगोदर त्यांच्या हातात खूप कमी वेळ उरली आहे.त्यांनी परत एक योजना बनवली. 2004मध्ये अशाच एका प्रकरणात ते निलंबित झाले होते,जेव्हा ख्वाजा युनूसचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता.

(51 वर्षीय, सॉफ्टवेयर इंजिनियरला,2002मध्ये मुंबईच्या घाटकोपरमध्ये बेस्ट बसवर बॉम्बहल्ला* केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली). पोलिसांनुसार, ख्वाजा तुरुंगातून पळून गेला.त्याचा पाठलाग करत असतांना, तो एका दरीत पडून मरण पावला.,पण अनौपकचारिक कथा हे सांगते की ख्वाजा कोठडीतच मरण पावला.आणि त्याचे शरीर दरीत फेकून देण्यात आले.मनसुख यांनी पत्र लिहल्यानंतर (2 मार्च) पुढील दिवशीवाजे,

सचिन ,पोलीस इन्स्पेक्टर सुनील माने एन्काऊंटर  स्पेशलिस्ट, विनायक शिंदे यांनी 2 तासांची एक बैठक बतली.

वाजे यांचे मत होते कि,  मनसुख मुळे आपण सगळे फसू शकतो, म्हणून काहीतरी करायला हवं.नंतर 4 मार्च रोजी सायंकाळी, माने यांनी गुजरातचे एक सिमकार्ड वापरत मनसुख यांना फोन केला व सांगितले "मी कांदिवली क्राईम ब्रँचमधून तावडे साहेब बोलत आहे.जर तुम्हाला ह्या प्रकरणातून बाहेर पडायचं असेल तर मला घोडबंदर रोडवर येऊन भेटा"

.घोडबंदर रोड भागात ब्रिटिश काळात अरब देशातून येणारे घोडे उतरत असत.10 वर्षांपूर्वी हा एक निर्जन रास्ता होता. एका बाजूला घनदाट जंगल तर दुसऱ्या बाजूला ठाण्याची खाडी होती,हिरेन यांना काय माहीत होते की गुन्हेगारांना संपवण्यासाठी, पोलिसांची ती मनपसंत जागा होती.देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात आधी मनसुख यांच्या महत्वपूर्ण भूमिकेला समजून घेतले होते म्हणून त्यांनी म्हटले...मनसुख हिरेन यांना सुरक्षा देण्यात यावी, ते एक महत्वपूर्ण साक्षीदार आहेत.

माने यांनी हिरेन यांची मदत करण्याच्या बहाण्याने, त्यांना घोडबंदर रोडवर हॉटेल हिल व्यूवर बोलवले.,आणि सांगितले "तावडे साहेब (त्या गाडीमध्ये तुमची वाट बघत आहे."जसे मनसुख "तावडे" यांना भेटायला गाडीत शिरले.मागून एक क्लोरोफॉर्मवाला रुमाल घेऊन एक हात पुढे आला.त्यांचे हात बांधून टाकण्यात आले...आणि त्यांना खाडीमध्ये फेकून देण्यात आले.त्यांच्या तोंडात रुमाल ठोसण्यात आले, जेणेकरून त्यांच्या शरीरात पाणी जाण्यास वेळ लागेल आणि मृतदेह वर यायला वेळ लागेल.

हत्येच्या वेळेस वाजे (आणि माने) तिथे उपस्थित होते..पोलिसांना चकमा देण्यासाठी..त्यांनी आपला मोबाईल हा क्रॉफोर्ड मार्केटमधील ऑफिसमध्येच सोडून दिला होता, जेणेकरून त्यांचे लोकेशन घटनास्थळापासून खूप दूर दिसेल. (* इन्स्पेक्टर माने यांनी देखील आपला मोबाईल कांदिवली पोलीस ठाण्यात सोडला होता.)पण CCTV मध्ये ते त्यांच्या ऑफिसपासून 3 किमी अंतरावर असलेल्या CSMT स्टेशन जवळ चालतांना दिसले,जिथे त्यांनी रुमाल विकत घेतला आणि सेंट्रल लाईनची लोकल पकडत कळव्याला गेले.

 NIA अनुसार तिथून त्यांना एक ठाणे पोलीस अधिकारी घोडबंदर रोडपर्यंत घेऊन गेले.सर्व झाल्यावर ते लोकलनेच क्रॉफोर्ड मार्केटच्या ऑफिसमध्ये परत आले.त्याच रात्री 11.45 ते 1.30 च्या दरम्यान त्यांनी डोंगरीच्या एका हॉटेलवर छापा मारला.तिथे त्यांनी "शून्य पंचनामा दिला, जो  सहसा कधीच दिला जात नाही. पंचनामा हा अवैध गोष्टी असल्यावरच दिला जातो.रात्रीमध्ये आपले ठिकाण (लोकेशन) चुकवण्यासाठी करण्यात आलेला हा एक प्रयत्न होता.पुढील दिवशी जवळपास रात्री 10.30 वाजता, चिखलाने माखलेला मनसुख यांचा मृतदेह, मीठी नदीच्या दलदलीतून काढण्यात आला.रिपब्लिक टीव्हीने, मनसुख हिरेन आणि त्यांचे भाऊ विनोद यांच्यात झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग प्रकाशित केली.

  मनसुख भावाला सांगत होते ,"सचिन वाजेने मला म्हटले आहे की तो माझी स्कॉर्पिओ वापरत असल्याची गोष्ट कोणालाच सांगू नको".मनसुख हिरेन यांच्या पत्नी, कमला यांनी आपल्या पतीच्या हत्येसाठी तपास अधिकाऱ्यालाच दोषी ठरवले.सचिन वाजेनेच माझ्या पतींची हत्या केली आहे, कारण त्यांनी खोट्या आरोपाखाली अटक  होण्यासाठी नकार दिला होता. लवकरच वाजे यांचा इतिहास समोर आला आणि त्यांना 2004 मध्ये का निलंबित करण्यात आले त्याची कारणेदेखील समोर आली.ते मुंबईच्या तथाकथित "एनकॉटर स्पेशलिस्ट ग्रुपचे सदस्य होते.प्रदीप शर्मा आणि दया नायक सोबतच, त्यांच्या नावावर 63 एनकौंटरची नोंद होती.( नाना पाटेकर यांचा हिंदी चित्रपट 'अब तक 56" हा प्रदीप शर्मावर आधारित आहे.)

.तर हे कसे काय होऊ शकते की एक निलंबित अधिकारी, जो एक वर्ष आधी परत पोलीस दलात भरती होऊन इतका शक्तिशाली कसा झाला? असे म्हणतात कि वाजे यांच्या राजनैतिक संबंधांमुळे ते मुंबईच्या कमिशनरनंतर, मुंबई पोलीसमध्ये दुसरे/ सर्वात प्रभावशाली अधिकारी होते.ते कथितरीत्या क्राईम ब्रँचच्या 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाजूला ठेवत, सरळ पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना रिपोर्ट करायचे.असे म्हटले जाते की रोज ते त्यांच्यासोबत चहा देखील प्यायचे.मुंबई पोलीसांच्या बदनामीनंतर, NIA ने अंबानी प्रकरण हातात घेतले. लवकरच 4 विदेशी"* गाड्या शोधून काढण्यात आल्या, जी वाजे नेहमी वापरायचे.

"टोयोटा लंड कृजर , प्राडा आणि मित्सुबिशी आउटलडर. त्यातील एक मर्सिडीज ML250 जवळच सार्वजनिक पार्किंगमध्ये उभी मिळाली.त्यामध्ये 5 लाख रोख आणि एक नोट मोजायची मशीन सापडली.नंतर माहीत पडले की, वाजे यांनी सुदेश खामकर नावाने, 100 दिवस स्वतःसाठी एक सूट बुक केला होता...(बहुदा एक अशी व्यक्ती ज्याच्यावर त्यांची पकड असेल.हे देखील समोर आले की त्यांनी मुंबई पोलीसांच्या त्रासापासून वाचवण्यासाठी BARC अधिकारी वर्गाकडून, 30 लाख रुपये देखील घेतले.)


 5 दिवसांनंतर NIA ने  वाजे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन अलकनुरे यांची जवळपास 13 तास विचारपूस केली. * अंबानी प्रकरणात क्रमशः पहिले आणि दुसरे तपास अधिकारी वाजे यांनी सुरुवातीला तोंड उघडले नाही.त्यांनी फक्त इतका आरोप केला की त्यांच्या "एनकौंटर स्पेशलिस्ट" मित्र, प्रदीप शर्माने त्या जिलेटीनच्या कांड्या विकत घेतल्या होत्या.

CCTV फुटेजनुसार, डेटा डंप आणि DVR ला नष्ट करण्यासाठी,त्यांच्या जवळचे पॉर्लीस इन्स्पेक्टर रियाज काजी यांना सांगितले ..पण ते अयशस्वी ठरले.मुंबईच्या मीठी नदीतून शव मिळाले.आणि सोबतच मिळाली, औरंगाबादमधून एक महिन्याआधी चोरी गेलेली मारुती इकोव्हॅनची नंबर प्लेट!ज्या व्हॅनमध्ये दोन मृत "दहशतवाद्यांना" टाकून...त्यांच्यावर गोळीबार करून, त्यांना ह्या पूर्ण योजनेसाठी दोषी ठरवण्यात येणार होते.बाजे यांचा काय हेतू आहे हे स्पष्ट नाही. मात्र, असे वाटत आहे की त्यांनी पोलीस दलात आपली जागा सिद्ध करून...अधिकृतरीत्या उच्च पदावर रुजू होण्यासाठी ही योजना आखली होती.  परंतु या प्रकरणाचा शेवट वाजे अटकेने  झाला. तसेच  यांनादेखील अटक झालेली आहे..!

राजकारण्यांनी आपली प्रतिमा स्वच्छ रहावी म्हणून परमबीर सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवून होमगार्डमध्ये पाठवण्यात आले.ह्या दरम्यान त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री, अनिल देशमुख यांच्यावर एक खळबळजनक आरोप केला.त्यांनी मला आणि वाजे सारख्या पोलिसांना, रेस्टॉरंट आणि बार यांच्याकडून दर महिन्याला 100 कोटींची वसुली करायला सांगितली होती.मुंबई पोलीसांच्या कोठडीतून लवकरच अजून गुपित समोर आली.जेव्हा राज्य इंटेलिजन्सच्या रश्मी शुक्ला यांनी,"कैश-फॉर-पोस्टिंगवर" आधारित एक फोन रेकॉर्डिंग सादर केली. सीताराम कुटे, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांच्यानुसार महाविकास आघाडीचे काही मंत्री हे पोलीस अधिकाऱ्यांना चांगली पोस्टिंग (बदली) देण्यासाठी पैसे घेतात असा आरोप लावण्यात आलो.आतापर्यंत महाँविकास आघाडीचे 3 पक्षाचे हे सरकार टिकून आहे.पण राजकारणात काहीही होऊ शकते, सरकार टिकेल, पडेल आणि वेळ आली तर वाजे यांची सुटका देखील होऊ शकते.महाराष्ट्राचे सूज्ञ नागरिक म्हणून तुम्हांला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटते ते आम्हाला कमेटद्वारे नक्की कळवा...!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या