सर्व मानसिक आणि शारीरिक आजारापासून वाचवतील हे ३ प्राणायाम....!

pranayam che fayde in marathi


     प्राणायामाचा अर्थ : प्राणायामाचा शाब्दिक अन्य प्राणाचा आयाम म्हणजे श्वास लांबवणे' असा होतो. महर्षी पतंजली यांनी जी योगसूत्रे तयार केली आहेत त्यां मध्ये 'साधनपाद' या प्रकरणातील ४९ व्या सूत्रात प्राणायामाची व्याख्या देताना म्हणतात


तस्मिन् सति श्वासप्रश्वासयोर्गतिविच्छेद: प्राणायाम:

योगासन प्राणायाम करा आणि निरोगी राहा

म्हणजे आपण आपल्या श्वासप्रश्वासाच्या गतीमध्ये (वेगामध्ये) जो फरक करतो आणि श्वास (प्राण) रोखून धरतो त्याला प्राणायाम' असे म्हणतात. अनेकांच्या मते 'प्राण' शब्दाचा अर्थ फक्त 'वायू' (श्वास) असाच आहे. परंतु हे बरोबर नाही. कारण 'प्राण' शब्दाची व्याप्ती मोठी आहे. त्याचा अर्थ व्यापक आहे. वास्तविक 'प्राण' म्हणजे 'प्राणशक्ती' किंवा 'जीवनशक्ती' (Vital Power) आहे. ती या स्थूल पृथ्वीवर प्रत्येक वस्तूचे संचालन करते आणि विश्वामध्ये ती विचारस्वरूपामध्ये वास्तव्य करते. 'प्राणांचा दुसऱ्या दृष्टिकोणातून विचार केला तर प्राणाचा संबंध मनाशी असतो, मनाचा संबंध बुद्धीशी असतो, बुद्धीचा संबंध आत्म्याशी असतो व आत्याचा संबंध परमात्म्याशी असतो. या दृष्टीने विचार केला तर प्राणायामाचा उद्देश शरीरात व्यापून असणाऱ्या प्राणशक्तीला उत्प्रेरित करणे, संचारित करणे, नियमित करणे आणि संतुलित करणे हा आहे म्हणूनच प्राणायामाला योगशास्त्रातील एक अमोघ साधन समजण्यात येते.



प्राणायामाचे महत्त्व : योगशास्त्रात प्राणायाम' क्रियेला अतिशय महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. व्यासभाष्यात प्राणायामाची माहिती सांगताना असे सांगितले आहे की

 तपो न परं प्राणायामात् । ततो विशुद्धिर्मलानां दीप्तिश्च ज्ञानस्य ।


म्हणजे महर्षी व्यासांच्या मते प्राणायामापेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही साधना नाही. प्राणायामाने सर्व दोषांचे निर्मूलन होते आणि ज्ञानदीप प्रज्ज्वलित होतो. मनुनेदेखील प्राणायामाबाबत म्हटले आहे की :


दयन्ते ध्मायमानानां धातूनां हि यथा मलाः । तथेन्द्रियाणां दयन्ते दोषाः प्राणस्य निग्रहात् ।।


म्हणजे ज्याप्रमाणे अग्नीत तावून सुलाखून निघालेल्या धातूंमधील सर्व दोष दूर होतात तद्वत प्राणायाम केल्याने शरीरातील इन्द्रियांचे सर्व दोष दूर होतात. महर्षी पातंजलींनी सांगितलेल्या अष्टांगयोगामध्ये प्राणायामास चौथे अति महत्त्वाचे अंग असे म्हटले आहे. जर कोणताही योग प्राणायामास वगळण्याचा प्रयत्न करेल, तर त्याला 'योग' म्हणताच येणार नाही. 'योग' हा 'योग' राहणाच नाही. म्हणूनच प्राणायामास 'योगाचा आत्मा' असे म्हटले आहे. ज्या प्रकारे बाह्यशुद्धीसाठी शरीराला स्नानाची आवश्यकता आहे; त्याप्रमाणे मनाच्या शुद्धीसाठी प्राणायामाची अत्यंत जरूर आहे.

प्राणायामाचे फायदे : 

(१) प्राणायाम केल्याने शरीर सुदृढ व निरोगी राहते व मेद (FAT) कमी होते. 

(२) प्राणायाम केल्याने दीर्घ आयुष्य प्राप्त होते, स्मरणशक्ती वाढते व मनोविकृती दूर होतात.

 (३) नियमितपणे प्राणायाम केल्याने पोट, यकृत, मूत्राशय, लहान व मोठे आतडे तसेच पचनतंत्र हे सर्व अवयव कार्यक्षम बनतात.

 (४) प्राणायामामुळे शरीरातील नाड्या शुद्ध होतात व शरीरातील

(५) प्राणायामाच्या नियमित सरावाने जठराग्नी प्रदीप्त होतो, शरीर सुदृढ बनते आणि आतील आवाज (inner voice) ऐकावयास येतो. 

(६) प्राणायामामुळे ज्ञानतंत्र अत्यंत कार्यक्षम बनते. मन शांत व स्थिर बनते. तसेच मनाची एकाग्रता वाढते.

(७) प्राणायामाचा नियमित सराव निग्रहपूर्वक केल्याने अध्यात्मिक शक्ती वाढते. त्यामुळे आत्मिक आनंद प्राप्त होतो. मनःशांती मिळते आणि आत्मसाक्षात्कार होतो.

(८) निरंतर प्राणायाम करणारा साधक ब्रह्मचर्य पाळण्यास तत्पर असतो. तो खऱ्या अर्थाने ब्रह्मचारी बनू शकतो.


 प्राणायाम ही गोष्ट साधी असली तरी त्याचा अभ्यास काळजीपूर्वक करणे जरूरी आहे कारण योग्य प्रकारे प्राणायामाचा सराव केला नाही तर त्याचे परिणाम वाईट देखील होऊ शकतात. तेव्हा साधकाने खाली दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.


(१) प्राणायामासाठी जागा हवेशीर व अत्यंत शांततेची असावी. 

(२) प्राणायाम नेहमी प्रातःकाळी करावा. प्राणायामासाठी सकाळची वेळ उत्तम आहे. परंतु काही नैमित्तिक कारणामुळे ते अशक्य असेल, तर संध्याकाळी प्राणायाम केला तरी चालेल.

(३) साधारणतः प्राणायाम करण्यासाठी पद्मासनाची किंवा सिद्धासनाची बैठक घ्यावी. परंतु या आसनस्थितीत बराच वेळ बसणे कठीण वाटत असेल तर तुम्ही ज्या स्थितीत बराच वेळपर्यंत स्थिर बसू शकाल अशी कोणतीही आसनस्थिती घ्यावी. 

(४) प्राणायाम चांगल्या प्रकारे होण्यासाठी नाडीशुद्धी होणे आवश्यक आहे.म्हणूनच असे सांगण्यात आले आहे की, "नाडीशुद्धि व तत्पश्चात् प्राणायामं च साधयेत् । म्हणजे नाडीशुद्धीनंतरच प्राणायामाची साधना करावी.

 (५) प्राणायाम रोज निश्चित समयी, नियमितपणे व उपाशीपोटीच करावा. सरावानंतर दहा मिनिटांनी एक कप दूध घ्यावे.

(६) थकवा येईपर्यंत प्राणायाम करू नये. प्राणायाम केल्यानंतर मन प्रसन्न झाले पाहिजे आणि शरीर स्फूर्तिशील बनले पाहिजे.

 (७) प्राणायाम केल्यानंतर लगेच स्नान करू नये. अर्ध्या तासानंतर स्नान करावे. 

(८) प्राणायाम करताना श्वासोच्छ्वास अत्यंत सावकाश करावा असे पतंजलीने सांगितले आहे. असे केल्याने मन स्थिर व शांत होते.

(९) नव्या साधकांनी सुरुवातीस काही दिवस केवळ पूरक आणि रेचक करण्याचा सरावा करावा. पूरक आणि रेचकामध्ये अनुक्रमे एक आणि दोन मात्रांचा हिशोब ठेवावा. म्हणजे पूरक जितका वेळ कराल त्याच्या दुप्पट वेळा रेचक झाला पाहिजे. (पूरक, रेचक आणि कुंभक प्राणायामाच्या या तीन मुख्य अंगांचा अर्थ खालीलप्रमाणे आहे.पूरक म्हणजे  श्वास आत घेणे. रेचक:  म्हणजे श्वास बाहेर काढणे. आणि कुंभक :  म्हणजे श्वास रोखून ठेवणे.


श्वास घेऊन रोखून ठेवण्याच्या क्रियेला 'आंतरिक कुंभक' असे म्हणतात: आणि श्वास बाहेर काढून रोखण्याच्या क्रियेला 'बाह्य कुंभक' असे म्हणतात. चाचप्रकारे रेचकाने व पूरकाने युक्त असणाऱ्या प्राणायामास 'सहित कुंभक' महणतात; तर रेचक व पूरकरहित असणाऱ्या प्राणायामास केवळ कुंभक' असे म्हणतात. जोपर्यंत केवळ कुंभक सिद्ध होत नाही, तोपर्यंत सहित कुंभकाचा सराव करावा, 'केवळ कुभकास' सर्वोत्तम प्राणायाम असे म्हणतात.)

(१०) कुंभकाचा वेळ हळूहळू वाढवा. सुरुवातीस पहिल्या आठवड्यात चार सेकंद, दुसऱ्या आठवड्यात आठ सेकंद आणि तिसऱ्या सप्ताहात बारा सेकंदांपर्यंत श्वास रोखून ठेवण्याचा सराव करा. अशा प्रकारे वेळ वाढवीत वाढवीत तुम्हांला शक्य होईल तितका वेळ श्वास रोखण्याचा सराव करा.

(११) पूरक, कुंभक आणि रेचकाचा सराव करताना कोणत्याही अवस्थेमध्ये तुमचा जीव गुदमरणार नाही अगर थकवा वाटणार नाही याची काळजी घ्या.

(१२) पूरक. कुंभक आणि रेचकासाठी १:४:२ असे प्रमाण ठेवा. एक ॐकार म्हणेपर्यंत श्वास घ्या. चार ॐकार म्हणेपर्यंत श्वास रोखून ठेवा आणि दोन वेळा ॐकार म्हणत श्वास बाहेर सोडा. दुसऱ्या आठवड्यात २:८:४, तिसऱ्या आठवड्यात ३:१२:६ असे वाढवता वाढवता १६० ६४ : ३२ पर्यंत वाढवा. ॐकार मोजण्यासाठी डाव्या हाताच्या बोटांचा उपयोग करा. पुष्कळ सरावानंतर बोटांनी ॐकार मोजायची जरूर पडत नाही. हे प्रमाण आपोआपच सवयीने अंगवळणी पडते.

(१३) सुरुवातीस थोड्या चुका होतील; पण त्याची काळजी करू नका. याबाबत विनाकारण भीती बाळगून सराव करायचे सोडून देऊ नका. हळूहळू पूरक, कुंभक आणि रेचकाचे प्रमाण कसे राखावे ते तुम्हांला आपोआपच कळू लागेल; आणि तुमची बुद्धी, आंतर्ज्ञान आणि आंतरिक आवाज तुम्हांला सिद्धीचा मार्ग दाखवेल..

 (१४) 'सूर्यभेदन' आणि 'उज्जायी प्राणायाम थंडीमध्येच करावा. 'सीत्कारी' आणि 'शीतली' प्राणायाम उन्हाळ्यातच करावा. 'भस्त्रिका' प्राणायाम सर्व ऋतूत करावा.प्राणायामाची महत्त्वाची अंगे: प्राणायाम करणाचा साधकाने प्राणायामाच्या बाबतीत महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत.





प्राणायामाचा विधी प्राणायाम करण्यासाठी प्रथम डावी व उजवी नाकपुडी बंद करावयाची असते. साधारणतः उजव्या हाताने हे काम करावयाचे असते. म्हणजे उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी व त्याच हाताच्या अनामिकेने व करंगळीने डावी नाकपुडी बंद करावयाची असते. जेव्हा नाकपुड्या बंद करण्याची जरूर नसते तेव्हा दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. प्राणायाम करण्यासाठी शक्यतोवर पद्मासन, सिद्धासन, स्वस्तिकासन किंवा सुखासनाच्या स्थितीत बसावे. 


इड, पिंगळा आणि सुषुम्ना : या तीन प्राणवाहक नाड्या आहेत. अनुक्रमे चंद्र, सूर्य व अग्नी यांच्या या देवता आहेत. इडा डाव्या नाकपुडी वारे वाहते. पिंगळा उजव्या नाकपुडी द्वारे वाहते आणि सुषुम्ना दोन्ही नाकपुड्याद्वारे वाहते. म्हणूनच सुषुम्नेल मध्यनाडी' असे म्हणतात. तासातासाला डावी (इडा) आणि उजवी असतात.


(पिंगळा) नाडी स्वर बदलत इडा नाडीला 'चंद्र नाडी' सुद्धा म्हणतात. शीतल व तमोप्रधान असणारी ही नाडी मानवाच्या विचारांचे नियंत्रण करते.पिंगळा नाडीला 'सूर्य नाडी' असे म्हणतात. ती उष्ण व रजोप्रधान आहे. ही नाही मनुष्याच्या प्राणशक्तीचे नियंत्रण करते.


सुषुम्ना नाडीला 'ब्रह्म नाडी' असे म्हणतात. सर्व नाड्यांमध्ये 'सुषुम्ना' अतिशय महत्वाची नाडी आहे. कित्येक ग्रंथांत या नाडीला 'सरस्वती' आणि 'शांती' नाही देखील म्हटले आहे. ही नाडी उष्णही नाही किंवा शीतलही नाही; परंतु दोन्हींचे संतुलन राखणारी आहे. या नाडीमुळे साधकाला आत्मप्रकाश व आत्मज्ञान प्राप्त होते. हो नाडी साधकाला आध्यात्मिक उन्नतीमध्ये मदतरूप होते.


शारीरिक दृष्ट्या या तीन नाड्यांमध्ये असणारे संतुलन साधकाला स्वास्थ्य, ताकद, शान्ती आणि दीर्घायुष्य प्रदान करते.नाडीशुद्धी रक्ताभिसरणात रक्तवाहिन्या व नलिकेसारख्या अवयवांना 'नाही' म्हणतात. नाडीच्या आतल्या थराला 'शिरा' मधल्या घराला 'धमनी'


पूर्ण अवयवाला 'नाडी' म्हणतात. 'शोधन' म्हणजे शुद्धीकरण, म्हणजेच 'नाडीशुद्धी'.

नाडीशुद्धी झाल्यानंतरच प्राणायाम चांगल्या प्रकारे करता येतो. म्हणूनच म्हटले आहे की “नाडीशुद्धिं च तत्पश्चात् प्राणायामं च सापयेत ।" म्हणजे नाडीशुद्धी झाल्यानंतरच प्राणायाम करावा. नाडीशुद्धीसाठी जो प्राणायाम करण्यात येतो. त्याला 'अनुलोम विलोम प्राणायाम म्हणतात. सर्व सामान्य साधकांनी अनुलोम-विलोम प्राणायामापासूनच प्राणायामाची सुरुवात केली पाहिजे. अनुलोम-विलोम प्राणायाम अत्यंत सोपा असल्याने सर्वसामान्य लोकदेखील हा प्राणायाम सहजतेने करू शकतात.


१. अनुलोम- विलोम प्राणायाम 



कृती : पद्मासनात किंवा सिद्धासनात आसनस्थ का. उजवी नाकपुडी उजव्या आंगठ्याने बंद करा आणि डाव्या नाकपुडीने जोपर्यंत श्वास घेता येईल तोपर्यंत श्वास खेचा श्वास खेचून झाला की दोन्ही नाकपुड्या बंद करा. आता थोडा वेळ आंतरिक कुंभक करा. नंतर डाबी नाकपुडी बंद ठेवा आणि उजव्या नाकपुडीमधून हळूहळू श्वास बाहेर सोडा. त्यानंतर डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास खेचा आणि नंतर दोन्ही नाकपुड्या बंद करून श्वास रोखून ठेवा. आता डाच्या नाकपुडीमधून हळूहळू श्वास बाहेर सोडा. नाडीशुद्धी प्राणायामाचे हे एक आवर्तन पूर्ण झाले. याप्रकारे सुरुवातीस दररोज तीन किंवा चार आने की व सराव आणखी वाढवावा. जेव्हा याचा अभ्यास अत्यंत चांगला होईल१:२:२ असे प्रमाण ठेवा. म्हणजेच चार सेकंद पूरक, आठ सेकंद कुंभक आणि आठ सेकंद रेचक करा. हळूहळू हे प्रमाण वाढवीत १:४२ असे वाढवा. जर पूरक पाच संकद कराल तर कुंभक वीस सेकंद आणि रेचक दहा सेकंद करा.. फायदे : 

(१) 'नाडीशुद्धी' हा प्राणायामाचा एक श्रेष्ठ प्रकार आहे. यामुळे फुफ्फुसाचे रोग दूर होतात. 

(२) नाडीशुद्धीमुळे रक्ताला प्राणवायू जास्त प्रमाणात मिळतो आणि रक्ताचे शुद्धीकरण देखील चांगल्या प्रकारे होते.


विशेष नोंद : रक्तदाब कमी किंवा अधिक असेल तर कुंभक करू नये. फक्त पूरक आणि रेचकच करावे. रक्तदाबातील दोष दूर झाल्यायावरच हळूहळू कुंभकाचा सराव करावा.


२.  कपालभाती प्राणायाम 

'कपाल' म्हणचे 'ललाट' किंवा 'भालप्रदेश' व 'भाती' म्हणजे प्रकाशमान करणे. म्हणजे कपालभाती व्यायाम प्रकाराने ललाटाचे तेज वाढते. ललाटाचे तेज वाढविणारा हा व्यायाम प्रकार आहे. हटयोगामध्ये सांगितलेल्या षट्कमपैकी हे एक कर्म आहे. कपालभाती क्रिया भस्त्रिका प्राणायामासाठी साधकाची पूर्व तयारी करते.

कृती : पद्मासनात किंवा सिद्धासनात आसनस्थ व्हा. हात गुडघ्यावर ठेवा आणि डोळे बंद करा. त्यानंतर लोहाराच्या भात्याप्रमाणे वेगाने पूरक आणि रेचक करा. ही क्रिया परिश्रमपूर्वक व सावधानतेने करा. या कृतीने घाम खूप येतो. या क्रियेत कुंभक केला जात नाही. येथे रेचकच महत्त्वाचे कार्य करते. हा व्यायाम प्रकार करण्यासाठी पुष्कळ ताकदीची जरूर असते. कपालभातीचा नियमित सराव केल्याने सर्व पेशी, ज्ञानतंतू आणि स्नायू जोराने कंप पावतात. सुरुवातीस एक सेकंदास एकच उच्छ्वास बाहेर सोडावा. नंतर संथपणे वेग वाढवीत एका सेकंदात दोन उच्छवास बाहेर सोडावेत. सुरुवातीस काही दिवस दहा उच्छवासांचे एक आवर्तन करा. नंतर हळूहळू आवर्तनांची संख्या वाढवीत जा. 

फायदे : (१) कपालभातीमुळे कपाळ, श्वसनतंत्र आणि श्वासमार्ग स्वच्छ व मोकळा होतो. 

             (२) कपालभातीमुळे श्वासनळीमध्ये साचत असणाऱ्या कफाचा नाश होतो. त्यामुळे दम्यासारखा रोग दूर पळतो. मात्र खूप सर्दी असल्यास किंवा नाकपुड्या चोंदलेल्या असल्यास ही क्रिया करू नये. त्यामुळे क्षयासारख्या रोगांच्या जंतूंचा तीव्रतेने प्रतिकार केला जातो. स्वाभाविकच या क्रियेमुळे फुफ्फुसाच्या वायुकोशांना पुष्कळ प्रमाणात प्राणवायू मिळतो. व्यासारखा रोग साधकाच्या वान्यालाही उभा राहत नाही.

३. उज्जायी 




'उद्' 'जय' यापासून 'उज्जायी' शब्द बनला आहे. उद् म्हणजे जोराने व 'जय' म्हणजे यशवाचक शब्द, यावरून 'उज्जायी' म्हणजे 'मोठ्याने जयजयकार 'उज्जायी' करताना कंठातून शिट्टीसारखा आवाज निघतो. तोच 'जयजयकार' समजून या प्राणायामास 'उज्जायी' असे नाव दिले आहे. या प्राणायामाच्या सरावाने शरीरात उष्णता निर्माण होते म्हणून हा प्राणायाम हिवाळ्यात करावा.


कृती : पद्मासनात किंवा सिद्धासनात आसनस्थ व्हा, तोंड बंद करा. हनुवटी गळपट्टीच्या हाडामध्ये व उरोस्थीवरील खोबणीत टेकू क्या. नंतर डोळे मिटून दृष्टी आत वळवा आणि दोन्ही नाकपुड्यांतून सावकाश दीर्घ श्वास घ्या. फुफ्फुसे पूर्ण भरेपर्यंत श्वास घ्या. यावेळी स्स्' असा आवाज होणे जरूर आहे. या श्वास घेण्याला पूरक म्हणतात. आता जीभ उलटी करून जिभेचा शेंडा टाळ्यास आतल्या बाजूस लावून (जिव्हाबंध करून) श्वास शक्य होईल तितक्या वेळ रोखून धरा. यालाच 'कुंभक' म्हणतात. नंतर मस्तक वर करा. जिव्हाबंध सोडा व संथपणे श्वास बाहेर सोडा. यावेळी उजव्या हाताने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीद्वारा छाती फुगवत श्वास बाहेर सोडा (रेचक करा). श्वास बाहेर जाताना घर्षणयुक्त आवाज होतो. हा आवाज एकसारखा व संघ असला पाहिजे. फायदे : (१) या प्राणायामामुळे डोक्यातील उष्णता कमी होते. तसेच दमा,क्षय व फुफ्फुसाचे रोग बरे होतात. (२) या प्राणायामाच्या नियमित सरावाने जठराग्नी प्रदीप्त होतो आणि पचनतंत्र, श्वसनतंत्र आणि ज्ञानतंत्र कार्यक्षम बनतात. मन व शरीर ताजेतवाने होते.


       भारताच्या प्राचीन आयुर्वेदाचे अर्वाचीन वैदयकीय शास्त्राशी चांगलं जमते. यामुळेच केवळ भारतातच नव्हे, तर काही पाश्चात्त्य देशातही अनेक लोक प्राणायामाकडे वळले आहेत. नियमित प्राणायाम करणाऱ्यांना आरोग्याचा लाभ होतो ही समजूत पुष्कळ अंशी खरी आहे. हा महत्त्वाचा मुद्दा काही आकड्यांच्या मदतीने पडताळून पाहूया. विश्रांतीच्या अवस्थेत असणारा माणूस प्रत्येक श्वासागणिक जी हवा आत ओढून घेतो, तिच्या एकूण जथ्याला Tidal volume असे म्हणतात. ही सगळी हवा फुप्फुसात जात नाही. कारण तिचा काही अंश श्वासनळीसारख्या Dead space म्हणून ओळखला जाणा-या पोकळीत अडकून राहतो. किंचितही परिश्रम न करणाऱ्या व्यक्तीने श्वासात घेतलेल्या हवेचा एकूण पुरवठा जवळजवळ ५०० घन सेंटिमीटर इतका असतो. तर डेड स्पेसचे घनफळ अंदाजे १५० घन सेंटिमीटर इतके असते. म्हणजेच फुप्फुसांना मिळणारी ताजी हवा ३५० घन सेंटिमीटर (७०%) पेक्षा अधिक नसते. प्राणायाम करताना दीर्घश्वास घेतला जातो तेव्हा हवेचे Tidal volume खूपच वाढते. ते जवळजवळ ३००० घन सेंटिमीटर इतके असते. म्हणून फुप्फुसात मावणारा ताज्या हवेचा जथा ७० % एवजी ९५ % इतका असतो. अशा स्थितीत Dead space ला विशेष महत्त्व राहत नाही. फुप्फुसांना अधिक प्राणवायू मिळतो.


    प्राणायामाचा दुसरा पैलू आहे उच्छ्वास म्हणून त्या दृष्टिकोनातूनही शरीरावर प्राणायामाचा  परिणाम होतो, हे जाणून घेण्यासारखे आहे. विश्रांतीच्या क्षणी माणूस उच्छ्वास सोडतो. तेव्हा फुप्फुसातील सगळी हवा बाहेर निघून जात नाही. माणूस दुसऱ्यांदा श्वास घ्यायला सुरवात करतो, त्यावेळी आधीची जवळजवळ १६५० घन सेंटिमीटर हवा फुप्फुसात अजून उरलेली असते. याचा अर्थ असा की, ताज्या हवेचा जया ३५० घन सटिमीटर असतो. हे लक्षात घेतले तर फुप्फुसातील हवेच्या फेरबदलाचे प्रमाण सरासरी २१% पेक्षा अधिक नसते. थोडक्यात म्हणजे प्राणायाम करून प्रयत्नपूर्वक शक्य तेवढ्या हवेचा पुरवठा उच्छ्वासाद्वारे बाहेर काढून टाकण्यात आला तर उत्तमय कारण त्यामुळे प्राणवायू ग्रहण करणाऱ्या alveoli (वायुकोषा) साठी अधिक प्रमाणात ताजी हवा उपलब्ध होते. उच्छ्वासानंतर घेतलेला पुढचा श्वास खूप दीर्घ असेल तर फुप्फुसातील प्राणवायूचा आंशिक दा (Partial pressvre) ही वाढतो आंशिक दाब जितका जास्त तितकाच अधिकप्राणवायू फुप्फुसातील छोट्या पिशवीसारख्या वायुकोषांत ओल्या श्लेष्म त्वचेत महणजेच पर्यायाने रक्तात मिसळतो. सॉफ्ट ड्रिक्स मध्ये दाब देऊन भरलेल्या कार्बन डायॉक्साइडचे उदाहरण लक्षात ठेवा.

शरीराला अधिक प्राणवायू मिळतो हा उघड उघड दिसणारा (प्राणायामाचा) फायदा समजण्यासारखा आहे, परंतु शरीरात अखेरीस जैव रासायनिक (Bio Chemical) प्रक्रिया कशी होते? प्रथमतः अत्यंत व्यापक अशा भ्रामक समजुतीचा निकाल येथे लावायला हवा. रक्तात अधिक प्राणवायू 02, मिसळला की रक्तपुरवठा करणारे शारीरिक कोष अधिक प्राणवायू वापरतात ही समजूत खरी नाही. काही असले तरी सस्तन (Mammal) प्राण्यांना नैसर्गिक हवेच्या ऐवजी शुद्ध प्राणवायू दिला, तरी शरीरातील चयापचयाची यंत्रणा स्वतःच्या गरजेइतकाच प्राणवायू वापरते. प्राणायामाच्या व्यायामाचा मूलभूत फायदा अगदी वेगळा आहे. प्राणवायूचा प्रत्येक अणू 02 च्या (हो, O2, रेणू नव्हे तर O2 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फक्त अणूच्या) बाह्य भ्रमणकक्षेत ६ विदयुतपरमाणू (इलेक्ट्रॉन्स) असतात. पण त्या कक्षेत ८ इलेक्ट्रॉन्सची जागा आहे; योन जागा रिकाम्या असतात. यामुळेच हायड्रोजनचे एकक इलेक्ट्रॉन असलेले दोन अणू प्राणवायूच्या संपर्कात येतात, तेव्हा लगेच पाणी तयार होते. पण प्राणवायू बाह्यकक्षेतील ६ इलेक्ट्रॉन्स त्याग करायलाही तयार असतो.

याचा परिणाम म्हणजे शरीरातील चयापचयाच्या क्रियेच्या वेळी उत्पन्न झालेले Free radicals नावाचे जे दुष्ट रेणू सामान्यतः शरीरातील चांगल्या (निरोगों) कोषाच्या इलेक्ट्रॉन्सना वाल्याकोळ्याप्रमाणे लुटतात. त्याच्याबरोबर प्राणवायूचा अणू मिसळल्यावर बाल्याचा वाल्मीकी होतो. संतृप्त झालेले Free radicals त्यानंतर कोषांचे नुकसान करत नाहीत. कोषांची आयु-मर्यादा टिकवून धरली जाते प्राणायामाचा मोठा फायदा आहे. अर्थात प्राणायामावर प्रेम करणाऱ्या पुकळशा व्यक्तींना ही गोष्ट माहीत नसण्याचीही शक्यता आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या