good buissness ideas in marathi ( नवीन व्यवसाय माहिती)

      

      नमस्कार मित्रांनो , आपल्या मराठीगंध या वेबसाईटवर आपण आजपासून व्यवसाय संबंधित लेख मालिका सुरू करणार आहोत त्यातील हा पहिला भाग..! आज आपण जाणून घेणार आहोत एका नवीन व्यवसाय संकल्पनेविषयी ज्यासाठी तुम्हाला कमीत कमी फक्त १० हजार रुपये भांडवल लागेल आणि ज्याद्वारे पहिल्याच महिन्यात तुम्ही ५० हजाराच्या वर आरामात कमाई करू शकतात..!

तर आज आपण जाणून घेणार आहोत या व्यवसायाविषयी ज्याचे नाव आहे  Doorstep Car Washing ( घरपोच कार वॉशिंग सेवा)..! मित्रानो लॉक डाऊन काळात भरपूर व्यवसायांवर आर्थिक संकट आले परंतू हा व्यवसाय या काळातही यशस्वी ठरला..! जर आपण आजूबाजूला बघितले तर खूप साऱ्या कंपन्या ग्राहकांना घरपोच सेवा देत आहेत झोमॅटो /स्वीगी फूड डिलीव्हरी देत आहे तर अमेझॉन प्रॉडक्ट डिलीव्हरी देत आहे एवढेच नाही तर बहुतांश कर्मचारी घरूनच काम करत आहेत म्हणून या व्यवसायाची गरज सध्याच्या काळात वाढली आहे. जर ग्राहकाला बाहेर देतात त्याच किमतीत आपण घरबसल्या कार वाशिंग सेवा दिली तर तो नक्कीच खुश होईल कारण त्याचा वेळ वाचेल आणि आपले जागेचे भाडे तसेच विजेचे बिल वाचून आपला दुहेरी फायदा होईल..!



सर्वप्रथम याला लागणारे साहित्य लक्षात घ्या:-

१) प्रेशर वॉशर १८० बार:-




याच्या मदतीने आपण हाय प्रेशर ने गाडी धुवू शकतो . तसेच हा पंप बादलीतून किंवा नळातून सारख्याच प्रेशर ने पाणी खेचते ज्यामुळे सगळी घाण धुळ हात न लावता निघून जाते

२) शाम्पू +ब्रश+  फोम गन  :-



फक्त पाण्याने धुवून गाडी पूर्ण स्वच्छ होत नाही तर शाम्पू च्या पाण्याने फेस करून तिला नीट धुवावे लागते या फोम गन च्या मदतीने हे शक्य होईल

३)वेक्युम क्लीनर :-

 कारच्या आतील भागात तसेच इंजिनच्या भागात  पाण्याने धुता येत नाही त्याठिकाणी या क्लीनर च्या मदतीने घाण आपल्याला काढता येते. 

४) डॅश बोर्ड क्लीनर + स्पंज




कारच्या डेशबोर्ड वर देखील पाण्याने न पुसता डेशबोर्ड क्लीनर व स्पंज वापरावा लागतो त्यामुळे ते स्वच्छ होते. ह्या सम्पूर्ण सामानाची किंमत ही १०००० पर्यंत असेल बाकी ब्रॅण्डनुसार किमतीमध्ये थोडाफार बदल दिसू शकतो.



                या व्यतिरिक्त आणखी सामान आवश्यक तर नाही पण आपल्या गरजेनुसार वापरू शकतो.जसे एखाद्या ठिकाणी विजेचा बोर्ड दूर असेल तर एक्स्टेंशन वायर आणि पाण्याचे कनेक्शन दूर असेल तर फोल्डएबल वाटर बॅग आणि हा संपूर्ण सामान ठेवायला लागणारी मोठी कापडी बॅग इत्यादी

   आता याचे बिझनेस मॉडेल कसे आहे ते समजून घेऊया


       शहरी भागात फक्त कार वॉशिंग चे ३५० रुपये साधारण घेतले जातात तर two wheeler साठी १५० रुपये घेतात. आणि इंटेरिअर क्लीनिंग + इंजिन क्लीनिंग + कोटिंग या सगळ्याचा खर्च  १५०० ते २००० रुपया पेक्षा जास्त आहे बाकी ट्रक ,रिक्षा यासाठी पण वेगळे दर आहेत. मोठ्या अपार्टमेंट आणि सोसायटी मध्ये कार मालक साधारणतः  आठवड्यातून एकदा गाडी धुतातच आणि तुमचा मुख्य ग्राहक वर्ग देखील हाच असणार आहे.

शहरातील मोठ्या अपार्टमेंट च्या पार्किंग मध्ये पाणी आणि विजेची सुविधा सहज उपलब्ध असते आणि तुम्हाला त्याठिकाणी  एका गाडीची जरी ऑर्डर मिळाली तरी तुमचं काम बघून सर्व लोक तुम्हाला काम देण्याची शक्यता जास्त आहे. कारण माझी गाडी धुवायला घरपोच माणूस येतो हा प्रतिष्ठेचा विषय आहे. तुमच्या व्यवसाय यशस्वितेची किल्ली हीच आहे की तुम्हाला एकाच जागेवर जास्तीत जास्त गाड्यांची ऑर्डर मिळाली पाहिजे. कारण फक्त एका गाडीसाठी तुम्हाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे परवडणार नाही.

तसेच तुम्हाला कमीत कमी सामान वापरून चांगले काम करावे लागेल व आर्थिक गणित ठरवावे लागतील जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त नफा काढू शकाल.

इथे लक्षात घेण्यासारखे काही महत्वाचे मुद्दे आहेत. 

१) तुम्हाला हा व्यवसाय करण्यासाठी विशेष प्रशिक्षण आवश्यक नाही एकदा फक्त तुम्हाला मशीन कनेक्शन कळाले की , तुम्ही आरामात तिला वापरू शकता.

२) प्रॅक्टिस साठी घरच्या गाडी वर तुम्ही हे मशीन वापरून बघू शकता . युट्युब वर देखील  यासंबंधी भरपूर व्हिडिओ आहेत त्यातील काही महत्वाच्या व्हिडिओ ची लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे.

३) यातील रिस्क फॅक्टर असा आहे की आपल्याला कमीत कमी कार पार्क करता आली पाहिजे येत नसेल तर मालकाला सांगून पार्क करून घेतली पाहिजे उगाच आपल्या हातून नुकसान होऊ देऊ नये.

४) हे बिझनेस मॉडेल कार वॉशिंग साठीच यशस्वी रित्या काम करते कारण two wheeler गाड्या  वाशिंग मध्ये नफा कमी असतो.

 तुमची ईच्छा असेल तर तुम्ही हा व्यवसाय नक्कीच यशस्वीपणे करून दाखवू शकता..!

पुढच्या लेखात भेटूया एका नवीन व्यवसाय माहिती बरोबर तो पर्यंत धन्यवाद..!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या