स्वस्तात मस्त सीसीटीवी बसवा आणि घराची आणि ऑफिसची चिंता विसरा...!

  सीसीटीवी कॅमेरा खरेदी करताना सर्वप्रथम काही बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.

जसे कि ,

१) पुढीलपैकी आपली गरज काय आहे? ( घराची / दुकानाची /ऑफिसची) सुरक्षितता .

२) आपल्याकडे उपलब्ध जागा आणि त्याची उपयुक्तता.

३) आपला आर्थिक बजेट .

परंतु या लेखात मी आपल्याला अश्या कॅमेराबद्दल माहिती देणार आहे कि ज्याला खरेदी करताना आपल्याला या सगळ्या बाबीबद्दल जराही विचार करण्याची गरज नाही ; आणि होय या कॅमेऱ्यातून लाईव्ह फुटेज आपल्या मोबाईलवर हव्या त्या वेळेस आणि हव्या त्या ठिकाणी पाहता येईल.

टीपी लिंक टेपो २०० (TP-Link Tapo C200) हा एक वायफाय सीसीटीव्ही कॅमेरा आहे जो तुम्ही तुमच्या घरात किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी आरामात लावू शकता कारण हा कॅमेरा पोर्टेबल आहे ; याची खास गोष्ट अशी कि, याचा सेटअप तुम्ही स्वतः अगदी १० ते १५ मिनिटात करू शकता त्यासाठी कोणत्या टेक्निशियन ची तुम्हाला अजिबात गरज भासणार नाही . तुमच्या मोबाइल किंवा कॉम्प्यूटर द्वारे तुम्ही हव्या त्या ठिकाणचे लाईव्ह रेकॉर्डिंग सहज बघू शकता .

महत्वाचे फीचर्स :-

१) टू वे ऑडिओ :-

या फिचर ची सध्या सगळ्यांना गरज आहे ; कोरोना महामारीमुळे संसर्गापासून बचावासाठी एकमेकांना भेटायचे तसेच एकमेकांशी बोलायचे देखील लोक टाळत आहेत, परंतु आपल्या दारावर कोणी अज्ञात व्यक्ती किंवा पेपरवाला , दूधवाला आल्यास त्यांच्याशी कामानिमित्त तरी बोलावे लागते परंतु जर आपण हा कॅमेरा दाराजवळ बसवला तर ह्या कॅमेऱ्यात असलेल्या टू वे ऑडिओ या फीचरद्वारे आपण मोबाईलच्या मदतीने बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीचे बोलणे ऐकू शकतो व त्याला उत्तर देखील देऊ शकतो कारण ह्यात इनबिल्ट माईक आणि स्पीकर आहे.अशाप्रकारे आपण संसर्ग टाळू शकतो. ह्याच पद्धतीने आपण ऑफिस वरून घरी मस्ती करणाऱ्या मुलांना पण रागवू शकतो. .:)))

२) गुगल सपोर्ट :-

जर तुमच्या गुगल असिस्टंट/एलेक्सा ला आज्ञा दिल्या बरोबर जर तुमच्या मोबाईलने लाईव्ह रेकॉर्डिंग दाखवायला सुरुवात केली तर ..? हे या कॅमेरयाद्वारे सहज शक्य आहे . तुम्ही विविध कमांड देऊन एकापेक्षा जास्त केमेऱ्यांचा ऍक्सेस घेऊ शकता ; जसे कि , तुम्ही 'ओपन द फ्रंट डोअर केमेरा' कमांड दिल्याबरोबर मुख्य दरवाजावरील दृश्य तुम्ही लाईव्ह बघू शकता. यामध्ये स्पीकर आहे ज्याद्वारे आपण कमांड दिली तर सायरन सुद्धा वाजेल.

३ )ऍडव्हान्स व्ह्यू :-

हा कॅमेरा १०८० P क्षमतेचा असल्यामुळे यात एचडी रेकॉर्डिंग शक्य आहे ; आणि यात अल्ट्रा वाईड अँगल उपलब्ध हे ज्यामुळे जास्तीत जास्त रेकॉडिंग एरिया कव्हर करू शकतो . हा कॅमेरा ३६० अंशात आडवा आणि ११४ अंशात उभा कुठल्याही ऍंगलला आपण हलवू शकतो जेणेकरून आपल्याला कोणत्याही भागाचा व्ह्यू भेटेल. रात्रीच्या गडद अंधारात सुद्धा आपण ३० फुटावरील रेकॉर्डिंग अत्यंत स्पष्टरित्या बघू शकतो.

४) नोटिफिकेशन, स्टोरेज आणि अलार्म सिस्टिम :-

जर तुम्ही घरी नसाल आणि तुमच्या रिकाम्या घरामध्ये काही हालचाल आढळली तर हे स्मार्ट डिवाइस आपल्याला हालचाल तपासून (मोशन डिटेक्ट करून ) आपल्याला आपल्या मोबाईलवर सूचना देते. तसेच डिवाइस मध्ये स्पीकर असल्याने आपण त्याठिकाणी लागलीच अलार्म वाजवू शकतो जेणेकरून धोका कमी होईल. तुम्ही यात १२८ GB डेटा साठवू शकता जास्ती डेटा स्टोर करण्यासाठी मेमरी कार्ड वापरण्याची सुविधा सुद्धा यात आहे. तसेच तुमच्या रेकॉर्डेड फाइल्स इंटरनेटवर (क्लाउडवर) साठवू शकता.

बलस्थाने :-

१) पोर्टेबल (कुठेही आरामात नेऊ शकता ).

२) सोपे इन्स्टॉलेशन (अगदी १० मिनिटात कुठेही सेटअप करू शकता)

३) एका वेळेला १००० कॅमेरे कनेक्ट करू शकता.

कमकुवत बाजू :-

१) ऑफलाईन रेकॉर्डिंगसाठी वेगळा स्टोरेज बॉक्स नाही कॅमेऱ्यातच मेमरी कार्ड टाकून रेकॉर्डिंग होते ; जर कोणी कॅमेराच पळवून नेला किंवा तोडफोड केली तर आपला स्टोरेज ला धोका निर्माण होईल.

२) स्टोरेज सुविधा कमी आहे साधारणतः २४ तास रेकॉर्डिंग चालू ठेवली ६४GB जागा ८ दिवसात पूर्ण भरते परंतु मेमरी कार्ड कॅमेऱ्यातून काढण्याची गरज नाही आपण मोबाईल द्वारे रेकॉर्डिंग डिलीट करू शकतो.

३) वॉटरप्रूफ नाही

साधारणतः जेव्हा आपण घरी CCTV बसवण्याचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात ते मोठे कॅमेरे आणि त्याचा रेकॉर्डर बॉक्स , खूप साऱ्या वायर्स आणि केबल्स परत त्यांना सेटअप करण्यासाठी तसेच काही बिघाड झाला तर एका टेक्निशियन ची मदत लागतेच वरून सेटअप केल्यावर त्यांना हलवता येणे कठीण असते आणि हे कॅमेरे आपल्याला १ किंवा २ या संख्येत घेता येत नाहीत त्यांचा पूर्ण सेट १० ते १२ हजारच्या आसपास असते . मी देखील आमच्या घराच्या कंपाऊंड साठी CCTV बसवण्याचा विचारात होतो इंटरनेटवर रिसर्च केल्यावर जी माहिती मिळाली ती मराठी वाचकांना उपयोगी ठरेल हा विचार करून हि माहिती दिली .

  • पुढील लिंक वर कॅमेऱ्याची आणखी माहिती व त्याचा सेटअप कसा करावा याची माहिती आहे. (TP-Link Tapo C200)

जर आपण कमी खर्चात एक सर्वोत्तम व घरच्या-घरी सेटअप करता येणार सीसीटीवी कॅमेरा शोधत असाल तर हा कॅमेरा खास तुमच्यासाठी आहे.



एमेझॉनवरून विकत घ्या 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या