धावपळीच्या या जीवनात आपले आरोग्यावरील लक्ष हे कमी होऊ लागले आहे परिणामी आज मानव समाज विविध आजारांनी त्रस्त असून त्याचे आयुष्यमान सुद्धा कमी झाले आहे या लेखात आपण जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या निरोगी आणि दीर्घायुषी जीवनासाठी आपल्याला सहाय्यकारी ठरतील...!
१. नीट न झोपणारे अल्पायुषी
रोज साडेचार तासांपेक्षा कमी व साडेनऊ तासापेक्षा जास्त झोपणारे अल्पायुषी होतात. शक्यतो सूर्यास्ताला किंवा त्यानंतर लवकरात लवकर घरी यावे. जैन लोक सूर्यास्ताआधीच जेवतात ते सगळ्यात छान! तसे घरी यावे, आंघोळ करावी, सर्वांनी येऊन देवाची प्रार्थना करावी. एकत्र वेळ घालवावा, जेवावे व जेवल्यानंतर दोन तासानंतर झोपावे. रात्री उत्तेजक (High Brightness) टी. व्ही. पाहिल्यास झोप लागत नाही. म्हणून रात्री सूर्यास्तानंतर टी. व्ही. बघणे टाळणे हे सर्वात चांगले. घरामध्ये खूप प्रखर आवाज व उजेड असताना झोप येत नाही. म्हणून घरामध्ये मंद व कमीत कमी उजेड असावा.
अभ्यासासाठी ,वाचनासाठी टेबल लॅम्प वापरावा. जेवताना आवश्यक तेवढाच उजेड ते ठेवावा. चहा कॉफी हे उत्तेजक द्रव्य आहे. ते दुपारनंतर घेतल्यास झोपमोड होते. दुपारनंतर चहा कॉफी घेणे शक्यतो टाळावे. रात्री मच्छरदाणी जरूर वापरावी.डास चावल्याने आपली झोपमोड होते. सुताच्या मच्छरदाणीपेक्षा नायलॉनची मच्छरदाणी चांगली, त्याचा दोरा बारीक व त्याची भोके मोठी असतात. नाकावरून पांघरूण घेऊन झोपू नये. मंद दिवा लावल्यास तरी झोप खराब होते तेव्हा रात्री दिवा ठेवू नये. ज्यांना रात्री उठावे लागते त्यांनी सोबत वीजेरी (बॅटरी) ठेवावी, जन्माआधी मुल नऊ महिने आईच्या पोटात अंधारातच असतात. पालक मुलांना भीती वाटू नये म्हणून उजेड ठेवतात, याची गरज नाही. चांगली झोप झाल्यावर सकाळी आपोआप माणूस उठला पाहिजे, तो ब्राह्ममुहूर्तावर म्हणजे सकाळी चार वाजता उठायला पाहिजे. त्याला पक्षांच्या आवाजाने जाग आली पाहिजे. ज्याला गजर लावून उठावे लागते तो माणूस चांगला झोपत नाही. रात्री लवकर झोपले पाहिजे, ताजेतवाने उठले पाहिजे. ज्याला उठल्यावर चहा कॉफी लागते तो चांगला झोपत नाही..
शाळेतल्या मुलांना जेवल्यावर इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, गणिताचा अभ्यास करायला सांगाया, ते लगेच झोपतील. मुलांना रोज झोपताना हितोपदेश, पंचतंत्र, गोष्ट वाचून सांगणारे, बाचणारे व ऐकणारे व्यवहारकुशल व सुखी होतील,
आपण मुलांना चहा कॉफी पाजतो त्याने मुलं बारीक व अल्पायुषी होतात, त्यांची चहा कॉफी पिण्याची सवय टाळली पाहिजे, शास्त्रीय संशोधन असे दाखवते की, दिवसभरात एकदाही पातळ अन्न दिले तर मुले खुरटतात, बारीक व बुटकी होतात. मुलांना चहा, कॉफी, दूध इत्यादी पातळ वस्तू देऊ नयेत. त्यांना तहान लागली की ते पाणी पितील. आपण काळजी करू नये. स्वानुभवावर लेख आधारीत आहे. जशी चहा कॉफीची सवय लावता येते तशी ती सोडताही येते. त्याला मात्र जिद्द हवी, निश्चय हवा. आपण काही करून दाखवू शकता का ? आपला चहा सोडून दाखवा बरं. आपण किती जिद्दी आहात ते आपल्याला समजेल.
२. चांगले खा
ज्यांची पूर्ण वाढ झाली आहे त्यांच्यासाठी आयुर्वेद म्हणतो हितमूक मितभूक कोरुख, म्हणजे जो हितकर आहे तो खातो, जो गरजेच्या निम्मे खातो तोच सुखी होतो. जेव्हा आपली खात्री होते की, पुन्हा आपल्याला कधीही जेवायला मिळणार नाही तेव्हाच पोटभर जेवायला पाहिजे, अन्यथा अर्धपोटीच जेवावे. जेवल्यानंतर अर्ध्यातासानंतर पाणी प्यावे..
हितकर अन्न म्हणजे आपल्या घरचे अन्न घराबाहेरचं अन्न खाऊ नये, स्वयंपाक म्हणजे स्वतः अन्न शिजवून खाणे. आपण आपले अन्न स्वतः शिजवून खायला पाहिजे किमान आपल्या घरचेच अन्न खाल्ले पाहिजे. जेव्हा गरज पडेल तेव्हा अडीअडचणीत दुसऱ्याच्या घरचे खाल्ले तरी चालेल. हॉटेलमध्ये पाच पंचवीस लोक अन्नाला हात लावतात. मुंबई, पुणे, ठाणे, अकोला, कलकत्ता येथील संशोधन असे दाखवते की, पाचवेळा घराबाहेर अन्न खाल्ले तर चारवेळा पोट बिघडते. तेव्हा घराबाहेरचे अन्न खाऊ नये.
३. साधे अन्न खा
फळे, कोशिबिरी, बरण, भात, भाजी, पोळी, भाकरी साधे आहार खाणारे दीर्घायुषी होतात. जे फार तळलेले, तुपकट व बारंबार शिजवलेले डबाबंद अन्न खातात ते अल्पायुषी होतात. चीनने चीन काराकोरम रस्ता बांधला. त्या भागातले लोक ११० वर्षे जगायचे. पण मॅकडोनाल्डसारखे दुकान आल्याबरोबर त्यांच्याकडे ब्लडप्रेशर, हार्टअटँक, डायबेटीसमुळे अल्पायुषीपण आलं. जेथे जेथे प्रगती पोहोचते तेथे आयुष्य कमी होत चालले.
पोटसुटे अल्पायुषी
आपण गरजेपेक्षा जास्त खाल्ले तर जादा अन्नाची चरबी बनते. ती जमा होऊन पोट पुढे येते व ते अल्पायुषी होतात, आपले पोट दिसत असेल तर भूक लागल्याशिवाय खाऊ नका. भूक लागली की पातळ अन्न घ्या व जेवण टाळा किंवा जेवण कमी करा व आपला व्यायाम बाढवा व्यायामाने चरबी जळून आपले पोट कमी होईल,
गाल बसे अल्पायुषी
गाल आत बसलेले असतील तर आपण बारीक आहोत, आपल्याला पुरेसे अन्न मिळत नाही. साध्या अन्नापेक्षा तेला तुपामध्ये दुप्पट ऊर्जा असते. ज्याचे गाल आतमध्ये आहेत त्यांनी तेल तुपाचा आहार वाढवायला हवा. जे खाईल त्याच्यामध्ये वरून तेलतूप घाला. त्याने वजन लवकर वाढते व खिशामध्ये चणे शेंगदाणे ठेवा. ते नकळत दिवसभर खाल्ले तर तब्येत सुधारेल आयुष्यही वाढेल,
३. सफल जगा
फलाहार करा. उपवासाच्या दिवशी फराळ करतात. फलाहारापासूनच फराळ हा शब्द तयार झाला आहे. फराळ करा म्हणजे फलाहार करा असा हा अर्थ आहे. आयुर्वेदामध्ये असे सांगितले आहे व अमेरिकेतील संशोधन असे दाखवते की जे शंभर टक्के फलाहारावर जगतात ते शंभर वर्षे जगतात. आपल्याकडे होणारी सर्व ताजी फळे पपई, बोर, जांभळे, द्राक्ष, पेरू, चिकू, डाळिंब, अननस, कलिंगड आदी मिळतात. आपल्याकडची मुबलक फळे खाल्ल्यास आपण दीर्घायुषी होऊ, याने स्वयंपाकघरातील कामे कमी होतील, फलाहारात स्त्रीमुक्ती आहे. घराबाहेर गेल्यावर हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा फळ घेऊन खाल्ल्यास आयुष्य वाढते आणि पैसे वाचतात, बेळ पण वाचतो. आपण जे अन्न खातो व ते पचवताना प्राणवायूचे मुक्त कण (फ्री रैडिकल्स) तयार होतात, हे शरीराला इजा करतात व आपण म्हातारे होतो. फळे या मुक्त कणांना नष्ट करतात, आपल्याला जीवनसत्त्वे देतात, साखर देतात, अन्न देतात आणि स्वादही देतात. ताज्या रसरशीत फळाचा स्वाद कुठल्याही शिजवलेल्या अन्नाला येऊ शकत नाही. ही माहिती मुलांसाठीपण वापरा,
४. रोज व्यायाम करा
रोज व्यायाम न करणारे भारतीय अल्पायुषी आहेत. आम्ही लोळा गोळा झालो आहोत. म्हणजे आम्ही रात्री बिछान्यावर लोळतो व इतर वेळा गोळ्यासारखे बसतो. सकाळी टी.व्ही. ला नाश्त्याला मग गाडीवर पुन्हा ऑफिसमध्ये बसतो. नंतर घरी जेवायला बसतो व रात्री झोपतो. हालचाल व अंगमेहनत कमी झाली. शरीर कमजोर झाल्यामुळे आपण अल्पायुषी होतो. रोज तासभर व्यायाम / अंगमेहनतीचे काम करा, घाम गाळा धावा, पळा. ऑफिसला जलद चालत जा. जर तुमची कामाची जागा घरापासून तीन किलोमीटर अंतरावर असेल तर तुम्ही दररोज जलद गतीने ऑफिसला जा. पाच किलोमीटरपर्यंत असेल तर तुम्ही ट सायकल बापरा व त्यापेक्षा जास्त असेल तरच गाडी वापरा. मुलांनाही पायी वा सायकलने शाळेत पाठवा. नाच हा सर्वोत्तम व्यायाम आहे. तो मन व शरीराला चिरतरुण ठेवतो, बिरजू महाराज अंदाजे ८० वर्षांचे आहे. तरीही तरुणांपेक्षा तरुण आहेत.
५. योग शिका, ध्यान करायला शिका :
योगासने हे अष्टांग योगातील एक अंग आहे. सर्व योगपद्धतींचे मूळ योगात आहे. रोज योगासन करा. त्याने शरीर छान राहील व मनावर ताबा मिळवण्यासाठी अष्टांगयोग करा. अष्टांगयोगातील आठ अंगे म्हणजे भाग आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी, ती शिका. योगासने केल्यामुळे आपण चिरतरुण राहतो व शरीराचे वार्धक्यामुळे येणारे आजार पाठदुखी, डायबेटीस, हृदयविकार हे आजार होत नाहीत.
मनावर ताबा मिळवा व नाही म्हणायला शिका. हिरवं गवत दिसलं की गाढव चारा खायला लागतो व पालापाचोळा पाण्यात पडला की पाणी पळेल तिकडे जातो. आपण तसे नसावे.. आपल्याला चांगले व वाईट ठरवता आले पाहिजे. चांगले निवडता आले पाहिजे व वाईटाला नाही म्हणता आलं पाहिजे. इतरांनी बिडी पी म्हटलं म्हणून तरुण बिडी पितात. त्यांना नाही म्हणता आले पाहिजे, हे मुलांना लहानपणी शिकवा व आपणही शिका. यासाठी मनावर ताबा पाहिजे. श्वास घेण्यावर जर ताबा मिळवता आला. तर मनावर ताबा मिळवता येतो. म्हणून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायला शिका, जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा शांत ठिकाणी सरळ ताठ बसा व आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. नजर नाकाच्या शेंड्यावर हवी. हळूहळू लांब श्वास घ्या व लांब श्वास सोडा. हा श्वास आपल्या नाकाच्या टोकाला घासून बाहेर पडत आहे व आत जात आहे याची जाणीव करून घ्या. याच्यावर लक्ष केंद्रीत करा. आपल्या मनातील सर्व विचार काढून टाका. दिवसभरातील वाईट गोष्टींचा पहिला विचार करा, मग चांगल्या गोष्टींचा विचार करावा. नंतर मनातील सर्व विचार काढून टाकण्याचा प्रयत्न करा. शांत लोकच सुखी, यशस्वी, दीर्घायुषी होतात.
६. आजार टाळा:
आजारी पडू नका, आजार टाळा. आजारी माणसं मरतात. आजारी मेल्यासारखी जगतात. आजाराने शरीर खराब झाल्याने आपली कार्यक्षमता कमी होते व आयुष्यही कमी होते. आजारी माणसाच्या हातचे खाल्ले तर आजार लागतात, म्हणून कोणाच्या हाताचे खाऊ नका. आजारी माणसाच्या जवळ गेले तर आजार लागतात. प्रत्येकाला काहीना काही आजार असतात म्हणून सर्वांपासून दोन हात दूर रहा.
दातकिडे अल्पायुषी असतात. सर्वांचे दात किडलेले आहेत. एकाचे दात किडले तर परिवारातील सर्वांचे दात किडतात. म्हणून परिवारातील सर्वांनी दाताच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. दात किडवणाऱ्या जंतूंना स्ट्रेप्टोकॉकस असे म्हणतात. हे मिठाने मरतात. म्हणून सर्वांनी जेवल्यावर मिठाने दोन वेळा दात घासायला पाहिजे. त्याने तोंडाचा वाससुद्धा जातो. सर्व लसी देणे हा आजार टाळण्याचा सर्वात स्वस्त मार्ग आहे. सर्व लसी मुलांना द्या.
७. शांततेत जगा
रोजच्या जगण्यामध्ये अडचणी असतातच. अडचणीचेच नाव जीवन आहे. जीवन म्हणजे अडचण. रोज काही ना काही चांगलं होणार, काही खराब होणार कधी चोर येणार कधी नोकरी जाणार, कधी मृत्यू होणार, अपघात होणार तरी दिवसाच्या शेवटी सर्व घरची मंडळी एकत्र येऊन शांतपणे देवाला नमस्कार करून थोडी हसू खेळू शकली पाहिजेत. खेळली पाहिजेत, नाचली पाहिजेत, एखादा छंद पाहिजे, बाजवता आलं पाहिजे, गाणं म्हणता आलं पाहिजे. अशा प्रकारे विरंगुळा शोधला पाहिजे आणि हे रोज करता आलं पाहिजे. हे जो करू शकेल तो सुखी व दीर्घायुषी होईल,
८. व्यसनी अल्पायुषी निर्व्यसनी दीर्घायुषी
सर्व व्यसनांनी आयुष्य कमी होते. विडी तंबाखू सोडा. टी. व्ही चा एखादा कार्यक्रम बघायचा राहिला व चुकल्यासारखे वाटत असेल तर याचा अर्थ आपल्याला त्या कार्यक्रमाची सवय लागली आहे, ती सोडा.
९.लग्न करा आणि सुखी व्हा
जगातील लोकांचा अभ्यास असे दाखवतो की, लग्न केलेले लोक दीर्घायुषी आहेत, जास्त जगतात. एकटेपणा हाच आजार आहे. एकटे लोक व्यसन करतात, दारू पितात. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्याला प्रेम करणाऱ्याची गरज असते व परिवारामध्ये प्रेम मिळते, मित्र मिळतात. लग्न केलेली व्यक्ती आजारी पडल्यास दुसरी व्यक्ती त्याची काळजी घ्यायला असते. एकट्याची काळजी घ्यायला कोणीच नसते. म्हणून लग्न केलेले लोक दीर्घायुषी होतात.
१०. हे सर्वांना सांगा व सुखी व्हा
आपला भारत स्वतंत्र झाला तेव्हा साधा माणूस सरासरी पस्तीस वर्षे जगायचा, आज तो सरासरी सत्तर वर्षे जगतो. या स्वतंत्र देशाने प्रत्येकाचे आयुष्य दुप्पट केले आहे. आपले अर्धे आयुष्य, अर्धा श्वास, अर्धा रुपया अर्था पैसा या देशाने आपल्याला दिलेला आहे. या देशाचे आपल्यावर हे ऋण आहेत. हा आपण देशासाठी वापरला म्हणजे बरोबरी झाली. हे आपण करावे, ही माहिती सर्वांना यावी,
१२५ कोटी लोक बिना आजाराचे बिना औषधाचे जगतील. असे होण्यासाठी सर्वांना मदत करावी. सरासरी प्रत्येक घरातील २० टक्के पैसे औषधामध्ये जातात. दर महिना पाचशे रुपये औषधामध्ये जातात. हे जर पैसे वाचले तर ते पैसे परिवाराच्या व व्यक्तीच्या व देशाच्या उद्धारासाठी वापरले जातील, हे व्हावे ही जनता जनार्दनाला प्रार्थना |
0 टिप्पण्या