भारतभूमी तिच्या विविधतेच्या वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे.जाती,धर्म,भाषा यासोबतच आहारात सुद्धा भरपूर अशी विविधता आपल्याला आढळून येते. या लेखात आपण जाणून घेणार आहोत एका अश्या आहाराबद्दल ज्याचे नाव आहे राजमा..!
सर्व डाळींमध्ये राजमा हा डाळींचा सर्वात पौष्टिक आणि प्रथिनांनी भरपूर असलेला प्रकार आहे याला इंग्लिश मध्ये किडनी बीन्स (Kidney Beans) असेही म्हणतात. याच्या नावाप्रमाणेच या डाळी चा आकार हा किडनी प्रमाणे असतो त्यामुळेच त्याला किडनी बीन्स (Kidney Beans) असे म्हटले जाते राजमा यामध्ये अनेक प्रकार असले तरी आपल्या महाराष्ट्रात विशेष करून लाल राजमा आणि पांढरा किंवा चित्रा राजमा सहज मिळतो.
भारतात बऱ्याच ठिकाणी प्रसिद्ध व्यंजना मध्ये राजमा याला विशेष महत्त्व आहे. राजमा हे चविष्ट तर बनतातच परंतु त्याचबरोबर त्यात भरपूर पोषक तत्वे ही आहेत यात भरपूर कॅल्शियम लोह फायबर विटामिन कोपर इत्यादी आहे. मधुमेहावर नियंत्रण राजमा द्वारे मिळवता येते वजन सुद्धा नियंत्रित होते. राजमा हे शक्यतोवर दुपारच्या जेवणात घेतले तर अति उत्तम कारण ते पचायला जड असल्याकारणाने रात्री शक्यतोवर टाळावे.
रात्री याचे सेवन केल्यामुळे झोप न येणे,आळस, गॅस इत्यादी त्रास निर्माण होऊ शकतो गर्भवती महिलांनी ही राजमा सेवनाने बरेच पोषक तत्त्वे मिळतात. ज्या गर्भवती महिला शुद्ध शाकाहारी आहेत त्यांना राजमा सेवनाने प्रोटीनची कमी भरून काढता येते ऐनिमिया किंवा रक्त कमी असणाऱ्यांना सुद्धा सेवनाने खूप फायदा होऊ शकतो उच्च रक्तदाब असणाऱ्यांना देखील याचा खूप फायदा दिसून येतो हृदयरोगाच्या व्यक्तींना सुद्धा यामुळे हृदयरोगाचा धोका टाळता येतो.राजमा प्रतिकारशक्ती वाढवतो यांच्यातील पोषक तत्वा मुळे बऱ्याच आजारावर नियंत्रण मिळवता येते याचे अतिरिक्त सेवनाने मात्र किडनी स्टोन व अपचन होऊ शकते.
याचा वापर करताना सर्वप्रथम ते चांगले धुऊन घ्या व पाच-सहा तास अगोदर भिजवून ठेवा पूर्ण मऊ शिजवूनच त्याचे सेवन शक्यतोवर करावे. राजमाला शिळे खाणे टाळावे. आपल्या डाइट चार्ट मध्ये कोणतेही व्यंजन जोडण्या पूर्वी एखाद्या व तज्ञ डॉक्टर चा सल्ला जरूर घ्या कारण प्रत्येकाची प्रकृती ही वेगवेगळी असते प्रत्येक व्यक्तीसाठी राजमा उपयोगी आहे हृदयाची धडधड नॉर्मल ठेवण्यासाठी मदत करतो.मायग्रेन वर सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे राजमाची राजमा चावल ही डिश खूप चविष्ट आणि पौष्टिक आहे आणि प्रसिद्ध आहे . राजमा भात खाऊन अनेक वेळा पोट भरेल पण मन भरत नाही विशेषतः पंजाबी लोकांचे हे प्रमुख जेवण आहे. राजमा रस्सा, राजमा उसळ राजमा चावल हे विशेष जेवण आहे.
राजमाचा स्वाद आणि पौष्टिकतेमुळे त्यापासून बनणाऱ्या व्यंजनांना पंजाबी रेस्टॉरंट सोबत सर्व शाकाहारी हॉटेल्समध्ये सुद्धा मेनू कार्ड मध्ये विशेष स्थान आहेत . विटामिन सी हे एक प्रकारचे विटामिन त्यामुळे मिळते त्यामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य देखील उत्तम राहण्यास मदत होते. शरीरातील हाडे मजबूत ठेवण्याचे कार्य राजमा करतो हा कॅन्सर सारख्या गंभीर आजारी व्यक्तीला सुद्धा खूप उपयोगी आहार आहे.शरीरातील कोलेस्ट्रोल वाढल्यामुळे रक्तपुरवठा सुरळीत होऊ शकत नाही राजमाच्या सेवनाने यातही भरपूर फायदा होऊ शकतो रक्तदाब वाढल्यामुळे सर्वप्रथम हृदयला नुकसान होऊ शकते आणि उच्च रक्तदाबावर नियंत्रणासाठी कमी फॅटचे सेवन करणे आवश्यक असते त्यासाठी राजमा सेवन अतिशय उपयुक्त ठरते कारण यामध्ये फायबर मात्रा जास्त असते हे फॅट कमी करण्यास मदत करते याच्यातील लोहामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते हिमोग्लोबिनची मात्रा जास्त असल्यामुळे व्यक्तीच्या शरीरातील ऊर्जेचा प्रवाह उत्तम होतो . राजमा सेवन आणि योग्य व्यायाम या दरम्यान डॉक्टरांचा सल्ला देखील घ्या.शेवटी एकच योग्य व योग्य प्रमाणात सेवन करा आणि तंदुरुस्त राहा.
0 टिप्पण्या