विचार करा आणि श्रीमंत व्हा....! (think and grow rich marathi)

think and grow rich marathi

विचार करा आणि श्रीमंत व्हा

लेखक :- नेपोलियन हिल

 




पुस्तकाची पार्श्वभूमी :-

think and grow rich book in marathi

think and grow rich marathi pdf download

think and grow rich marathi book download

think and grow rich in marathi pdf download

नेपोलियन हील यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात एक पत्रकार बनुन सुरु केली, जेमतेम वीस वर्षाचे असताना एका वृत्तपत्रात नौकरीवर रुजु झाले होते तेव्हाची गोष्ट! त्यांच्या संपादकांनी त्यांना, पुर्वी प्रचंड गरीबीमध्ये असलेले पण थोड्या कालावधीत प्रचंड श्रीमंत झालेल्या लोकांची यादी बनवायला सांगितली आणि त्या श्रीमंत लोकांचे, संपत्तीवान बनण्याच्या मार्गावरच्या अनुभवांचा अभ्यास करुन, त्यांच्यावर लेख लिहण्याची कामगिरी सोपवली.

ह्या निमीत्ताने त्यांची भेट तेव्हाचे जगातले एक सर्वात श्रीमंत व्यक्तीमत्व आणि पोलाद उद्योगाचे सम्राट एण्ड्रु कार्नेजी यांच्याशी होते. मुळचे स्कॉटलंडचे असलेले एण्ड्रु कार्नेजी यांचा पुर्ण अमेरिकेत दबदबा होता. पण इथपर्यंतचा त्यांचा प्रवास, इतरांसाठी, अत्यंत गुढ, जादुई आणि चमत्कारिक असा होता, कारण कुमारवयात असताना ते एक गोदी कामगार असल्यापासुन कामाची सुरुवात केली होती.

माणसं श्रीमंत कशी होतात? आणि श्रीमंत होण्यासाठी एखाद्याने आपल्यामध्ये कोणकोणते गुण जोपासावेत? ह्या विषयावर नेपोलियन हीलने त्यांची मुलाखत घेतली, तेव्हा तरुण नेपोलियनची जिज्ञासुवृत्ती, चिकाटी आणि ह्या विषयातला रस पाहुन एन्ड्रु कार्नेजी प्रसन्न होतात. मुलाखत पुर्ण झाल्यावर ते युवा, तडफदार नेपोलियनला एक ऑफर देतात, “ यश मिळवण्याचं तत्वज्ञान आणि गुपितं शोधण्यासाठी, तु तुझ्या आयुष्यातली काही वर्ष खर्चण्यासाठी तयार असशील, आणि ते सुत्रबद्ध करुन जगापुढे मांडण्यासाठी तयार असशील तर मी तुला ते सुत्र आणि त्यातील रहस्ये पुर्णपणे शोधण्यासाठी पुर्ण मदत करीन.”


think and grow rich book pdf in marathi

think and grow rich marathi book

एन्ड्रु कार्नेजी मिनीटवॉच हातात घेऊन नेपोलियनच्या उत्तराची वाट पाहतात, एकोणतीस सेकंद विचार करुन नेपोलियन ‘हो’ असे उत्तर देतो. “बरे झाले, तु लवकर होकार दिलास, मी तुझ्या उत्तराची फक्त एक मिनीट वाट पाहणार होतो. त्यानंतर हो असते, तरी त्याचा फायदा नव्हता.

तर अशा थरारक पद्धतीने यशाचे तत्वज्ञान शोधण्याच्या मोहीमेवर नेपोलियन हील निघतात, पुढची तब्बल वीस वर्ष ते एक ध्यास घेतात, हजारो यशस्वी आणि अपयशी लोकांच्या जीवनाचा अभ्यास करतात. ‘द लॉ ऑफ सक्सेस’ आणि ‘थिंक एंड ग्रो रिच’ ही त्यांची पुस्तकं अमेरीकेतचं नाही तर पुर्ण जगात गाजली.

पुस्तकाचा सारांश :-

ह्या पुस्तकात लेखकानं श्रीमंत होणारा हा प्रवास फक्त काही पावलांचा असल्याचं सांगितलं आहे.

  1. पाऊल पहीले – तीव्र इच्छाशक्ती
    लेखकाने हा गुण क्रमांक एक वर ठेवला आहे, आपल्याला आयुष्यात नुसत्या इच्छा खुप असतात, पण त्याला ‘बर्निंग डिझायर’ बनवलं पाहीजे.
  2. पाऊल दुसरे – श्रद्धा
    श्रद्धा एक अशी मानसिक अवस्था आहे, जी सुप्त मनाला ठामपणे सांगुन निर्माण करता येते. प्रत्येक धर्मात श्रद्धेला आणि प्रार्थनेला निर्विवाद महत्व देण्यात आलं आहे.कुठलेही विचार सुप्त मनावर सतत बिंबवले, तर ते त्याप्रमाणे क्रिया करतं, विचारांचं भौतिक जगात रुपांतर होतं.
  3. पाऊल तिसरे – स्वयंसुचना
    स्वयंसुचना म्हणजे स्वतः स्वतःला दिलेली सुचना. आपल्या मनाद्वारे आपल्या ज्ञानेंद्रियांना दिलेलं प्रोत्साहन!
  4. पाऊल चौथे – विशेषज्ञीय ज्ञान
    लेखकाचं म्हणणं आहे, सामान्य ज्ञान कितीही मोठं असलं, कितीही जास्त असलं, तरी संपत्ती मिळवण्याच्या दृष्टीने ते तुटपुंजं ठरतं. प्रत्येक क्षेत्रात विशेष ज्ञान मिळवुन जलदपणे संपत्ती प्राप्त करण्याची संधी असते!
  5. पाऊल पाचवे – कल्पना
    कल्पना म्हणजे एक कार्यशाळा असते, जिथे माणुस आपल्या सगळ्या योजना तयार करत असतो, मनाच्या अफाट कल्पनाशक्तीला वापरुन आपल्या संवेदना, इच्छा यांना मुर्त रुप दिलं जाऊ शकतं.
  6. पाऊल सहावे – योजना
    कल्पना ह्या अस्ताव्यस्त पसरलेल्या असतात. त्यांना व्यावहारिक रुपात रचणं, त्यांना साध्य करण्यासाठी करावयाच्या छोट्या छोट्या कृतींचा आराखडा बनवणं, म्हणजे योजना बनवणे!
  7. पाऊल सातवे – निर्णय
    अनिर्णय आणि टाळाटाळ हे आपले सर्वात मोठे शत्रु आहेत, आपण त्यांच्यावर विजय मिळवायलाच हवा.
  8. पाऊल आठवे – चिकाटी
    उदिष्ट्य साध्य करण्यासाठी चिकाटी आवश्यक असते. यशाची तेरा पावलं चालण्यासाठी सुद्धा चिकाटी हवी.

नेपोलियन हिल हे जगातील सर्वाधिक वाचले जाणाऱ्या लेखकांपैकी एक आहेत. थिंक अँड ग्रो रिच हे त्यांचं अतिशय गाजलेले आणि अत्यन्त वाचनीय असं पुस्तक आहे.

श्रीमंत होण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने एकदा तरी हे पुस्तक वाचलेच पाहिजे.



धन्यवाद ...!

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या