घरच्या घरी व्यायाम करा आणि सुदृढ राहा.

व्यायाम का करावा?




सोप्या आणि साध्या भाषेत सांगायला गेले तर माणसाच्या शरीराची रचना ही  MUSCLE FIBERS च्या संघाने तयार झालेली एक अद्भुत रचना आहे. यात एक चक्र आहे, ते असे की आपण जेव्हा जेवण करतो ते पोटामध्ये जाऊन त्यातून शरीराला हवे ते घटक शरीर शोषून घेते नंतर ते घटक तुमच्या रक्ताद्वारे MUSCLE FIBERS मध्ये त्यांचे जतन केले जाते., आता हे जतन केलेले घटक जेव्हा आपण एखादी क्रिया करण्यासाठी मास पेशींचा वापर करतो त्यावेळी हे जतन केलेले घटक वापरले जातात . यांचा योग्यरित्या वापर न केल्यास विविध आजार शरीरात उद्भवतात जसे की लठ्ठपणा,रक्तदाब , हृदय विकार आणि ताण-तनाव इत्यादी. या जतन केलेल्या पदार्थाला कॅलरीज असे म्हटले जाते आणि या पूर्ण प्रक्रियेला कॅलरीज CONSUMPTION म्हणतात ; म्हणून नियमित व्यायाम केलाच पाहिजे त्याचबरोबर त्यासाठी आवश्यक पौष्टिक आहार सुद्धा घेणे गरजेचे आहे.

व्यायाम कोणी करावा?

व्यायाम ही एक माणसाची मूलभूत गरज आहे असे ग्राह्य धरून व्यायाम हा सर्वांनी नियमितपणे केलाच पाहिजे., वयाच्या १४ व्या वर्षापासून ते ६० वर्षांपर्यंतच्या प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी व्यायामाचे विविध प्रकार आहेत जसे की योगा, धावणे, वजन उचलणे किंवा ध्यान लावणे.

ज्यांचे वय वर्ष १४ ते १७ मध्ये असते त्या कालावधीत ध्यान करण्यावर जास्त महत्त्व दिले पाहिजे कारण वयामध्ये बुद्धीच्या योग्य वापराची अतिशय गरज असते कारण वयात बुद्धीचा विविध प्रकारे आणि जास्तीत जास्त वापर केला जातो . ध्यान केल्याने आपल्या इंद्रियांवर काबू केला जाऊ शकतो ज्याची या वयात सगळ्यात जास्त गरज असते आणि ध्यान केल्याने अभ्यासातही मदत होते. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती केव्हाही ध्यान करू शकतो त्याला जास्त बंधने नाहीत. इथे आपण ध्यान आणि ध्यान- धारणा या संकल्पनेतील फरक देखील समजून घ्यावा.

वयाच्या १६ व्या ते ३५ व्या वर्षापर्यंत वजन उचलणे या व्यायामाचा प्रयोग केला पाहिजे कारण या वयात आपल्या शरीरामध्ये हार्मोन्सचा अतिशय जास्त प्रमाणात चढ-उतार होत असतो त्यात व्यायाम केल्याने MUSCLE FIBERS ची वाढ झालेली दिसून येते व लठ्ठपणा तसेच रोडपणा याचे प्रमाण कमी होते वेट लिफ्टिंग केल्याने उत्साह वाढतो व कॉन्फिडन्स लेवल बिल्डअप होतो, तसेच ताण-तणाव इत्यादी गोष्टी पासून मुक्ती मिळते.
वयाचे ४५ वर्ष ओलांडल्यानंतर योग साधने चा वापर केला पाहिजे कारण या ४५ वयानंतर नैसर्गिकरित्या आपले शरीर हे कमकुवत होण्यास सुरुवात झालेली असते टेस्टेस्टेरॉन लेवल( उत्साहवर्धक हार्मोन्स ) कमी झालेली असतात तसेच हाडांचा भरीवपणाही कमी होतो. त्यामुळे या वयामध्ये विविध योगासन करून करून आपण आपल्या हाडांच्या जोड्यांना तंदुरुस्त ठेवू शकतो ; पण या वयामध्ये वेटलिफ्टिंग हा प्रकार जीवावर बेतू शकतो त्यामुळे ते शक्यतो टाळावे . वेगवेगळ्या सर्वे रिपोर्ट मध्ये हि गोष्ट समोर अली आहे की विविध वयानुसार विविध व्यायाम प्रक्रिया केली गेली पाहिजे.
व्यायामाची उत्तम वेळ कोणती?

वेळ हि सर्वांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे आणि प्रत्येक गोष्ट करण्यासाठी एक ठराविक वेळ किंवा कालावधी असतो त्यात ती गोष्ट केली गेली तर त्याचा विशेष लाभ होतो; व्यायाम हा पण एक तसाच घटक आहे यात व्यायाम करण्याचे दोन वेळा येतात पहाटेची वेळ आणि संध्याकाळ ची वेळ पहाटेच्या वेळेस व्यायाम केल्यास ENDURANCE हा व्यायाम जास्त प्रकारे प्रभावी ठरतो कारण यामध्ये आपण व्यायाम करत असताना आपण अगोदर जतन (STORED ) CALORIES चा वापर केला जातो आणि स्टोअर कॅलरीचा वापर झाल्याने लठ्ठपणा कमी होतो.पहाटे व्यायाम केल्याने दिवसभराच्या दिनचर्येमध्ये पूर्ती जाणवते म्हणून पहाटेची वेळ ही व्यायामास अति उत्तम मानली गेली आहे त्यातच ज्या लोकांना लठ्ठपणाचे लक्षण आहेत त्या लोकांनी पहाटे व्यायाम केलाच पाहिजे त्यात त्यांना आपल्या शरीरातल्या एक्स्ट्रा कॅलरी (BURN) ज्वलन करण्यास जास्त सोपे जाते व लवकर फरक दिसून येतो संध्याकाळचा टाईम च्या वेळेस व्यायाम केल्यास मांसपेशी मध्ये वाढ दिसून येते व दिवसभरामध्ये केलेल्या जेवणाची ताकद ही संध्याकाळच्या व्यायामामध्ये पूर्णपणे वापरली जाते यानंतर जेव्हा रात्री झोपतो त्यावेळेस टेस्टोस्टेरॉन लेवल हे वाढीस जाते आणि मांसपेशा मध्ये सुधार होण्यास लवकरात लवकर सुरुवात होते म्हणून अशा विविध प्रकाराचे दोन वेळा निर्धारित केले गेलेले आहेत ज्यांना लठ्ठपणा दूर करायचाय त्यांनी जास्तीत जास्त पहाटेचा वेळ द्यावा आणि ज्यांना मासपेश्या वाढवायचे आहेत त्यांनी संध्याकाळचा वेळी प्रयत्न करावा.
व्यायाम आणि धावणे यातला फरक काय आहे ?

व्यायाम केल्याने मांसपेश्यांची ताकद वाढते व त्यांची वाढ होते .वेट लिफ्टिंग केल्याने FAST TWITCH (जास्त बळाची गरज असलेली कामे मसल मुळे पार पडतात उदाहरणार्थ उड्या मारणे ) मांस पेशींचा वापर होतो फास्ट ट्विच ह्या प्रकारच्या मासपेश्या फक्त कमी कालावधीत जास्त वजनाचा ताण पडल्यामुळे तुटतात आणि नंतर त्यांची रिकव्हरी होते व त्यांची वाढ होते धावण्याच्या व्यायामात हृदयाचा जास्त वापर होतो व याला ENDURANCE EXERCISE असही संबोधित केले जाते; धावल्याने तुमच्या सर्व धमन्या सुरळीतपणे काम करतात व हृदय विकाराचे आजार उद्भवत नाहीत तसेच उच्चरक्त दाबा पासून मुक्ती मिळते. धावल्याने SLOW TWITCH (हे मसल ज्यां कामांना थोड्या बळाची गरज आहे त्या कामांसाठी उपयुक्त असतात उदाहरणार्थ मॅराथॉन रनिंग . )मसल ऍक्टिव्हेट होतात. रोज नियमित प्रत्येकी व्यक्तीने पंधरा मिनिटे धावले पाहिजे ज्यान करून त्याला रक्तदाब नियंत्रण होते व हृदयविकाराचे आजार उद्भवत नाही.
कोरोनासारख्या महामारीच्या काळात सुद्धा आपण नियमित व्यायाम आणि योगासने करून आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो. योगासने आणि प्राणायम हे आपण घरबसल्या मोकळ्या हवेत करू शकता; तसेच वेट लिफ्टिंग तसेच इतर व्यायामासाठी आपण घरगुती जिम चे सामान ऍमेझॉन वरून विकत घेऊ शकता .

सध्याच्या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नियमित व्यायामाबरोबर पौष्टिक आणि सकस आहार तसेच पूर्ण झोप या गोष्टीदेखील खूप आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे व्यसने ताण-तणाव टाळून भरपूर प्रमाणात पाणीदेखील प्या.
घरी राहा सुरक्षित राहा आणि नियमित व्यायाम करून सुदृढ शरीर बनवा ..!




-: कंटेंट क्रेडिट :-





टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या