डोज कॉईन म्हणजे काय ? काय खरच डॉजकोइन आपल्याला लखपती बनवू शकते?


     आजच्या १ महिन्यापूर्वी म्हणजे १० एप्रिल २०२१ ला   एका डॉज कॉईन  ची किंमत फक्त ४ रुपये होती आणि आज म्हणजेच ५ मे २०२१ ला याची किंमत ५७ रुपये चालू आहे. म्हणजेच फक्त  एकाच महिन्यात याने १४ पटीने परतावा दिला आहे तज्ञांचा अंदाज आहे कि ८ मे पर्यंत या एका कॉईन ची   किंमत ७० ते ८० च्या घरात असेल त्याला  कारण म्हणजे  एलोन मस्क  ने  सध्या एक ट्विट केले आहे .

   अमेरिकेत saturday night live (SNL) हा शो असतो त्यात शनिवारी ८ मे रोजी  एलोन मस्क  पाहुणा  म्हणून असणार आहे याची चर्चा आहे. या शो मध्ये तो डॉज कॉईन बद्दल काही  महत्वाची घोषणा करेल असा लोक अंदाज बांधत आहेत आणि म्हणूनच यात लोक जास्तीत जास्त गुंतवणूक करत आहेत.

तर सर्वप्रथम आपण पाहूया डॉज कॉईन नेमकं आहे तरी काय ? तर डॉजकॉइन  म्हणजे बिटकॉइन सारखेच एक आभासी चलन (cryptocurrency) आहे. 

2013 साली जॅक्सन पालमर आणि बिली मार्कस यांनी मिळून डोजकोईन ही क्रिप्टो करन्सी तयार केली. त्यांनी गंमत म्हणूनच हे चलन तयार केले होते म्हणून त्याच चिन्ह त्यांनी मिम मध्ये प्रसिद्ध असलेला शिबा अनु नावाच्या कुत्र्याचा चेहरा ठेवलं.





ज्याप्रमाणे बिटकोईन हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आहे तसेच डोजकोईन देखील ब्लॉकचेन वर आधारित आहे . मजाक म्हणून बनवलेलं हे चलन लोकाद्वारे ट्विटर आणि रेडिट या वेबसाईटवर चांगल्या लिखाणाला टीप म्हणून देण्यासाठी वापरण्यात आले तसेच लोकांनी याचा उपयोग निधी गोळा करण्यासाठी तसेच दान देण्यासाठी केला त्यामुळे याची किंमत वाढत गेली.
प्रत्येक क्रिप्टो सारखी डोजकोईन ची पण एक community( समूह जो डोजकोईन ची खरेदी विक्री करतो) आहे त्यांनी २०१४ साली जमेका च्या खेळाडूंना ऑलिम्पिक मध्ये जाण्यासाठी पैसे उभे केले होते. तसेच केनिया देशात विहिरी खणण्यासाठी सुद्धा डोजकोईन द्वारे पैसे गोळा केले होते. काही लोकांनी खोटे बोलून निधी गोळा करून याचा गैरवापर सुद्धा केला त्यामुळे हे कोईन नेहमी चर्चेत राहिले .
तसेच माईनर्स ना सुद्धा हे कोईन माईन करायला कमी मेहनत लागत असल्यामुळे त्यांनी याकडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली आणि २०१७ मध्ये १ रुपये किंमत असलेले हे कोईन आणखी वाढायला सुरुवात झाली . २०१९ साली एलोन मस्क ने या खेळात विशेष रस घेऊन मैदानात उडी घेतली व डोजकोईन बद्दल तो सातत्याने ट्विट करत राहिला त्याने म्हटले की डोजकोईन हा माझा आवडता आहे तेव्हापासून एक विशिष्ट आणि समान वाढ त्याला प्राप्त झाली .


बाजारात आल्यावर फक्त २० मिलियन डॉलर ची बाजारपेठ असलेल्या या चलनाची आजची बाजारपेठ ६९ बिलियन डॉलर ची आहे तुम्हाला वाढलेल्या गुंतवणूकीचा अंदाज येईल. तसेच त्याची मार्केट रँक ही ५ आहे म्हणजेच बिटकोईन, एथिरीम ,बिनन्स कोईन ,थिटा नंतर डोजकोईन चा नंबर लागतो म्हणजे गुंतवणूक दारांचा या चलनावर भरपूर विश्वास बसलाय हे आपल्या लक्षात येते.

सध्या याची किंमत ५० ते ६० दरम्यान आहे पण ८ मे किंवा त्या अगोदरच त्याची किंमत ७० ते ८० पर्यंत जाणार हे नक्की...! कारण डोजकोईन कम्युनिटी ने हे ठरवले आहे की काहीही करून डोजकोईन ला १ $ पर्यंत न्यायचेच ..!
परंतु १$ झाल्यावर त्याची किंमत लगेच खाली उतरले किंवा ती सातत्याने वाढत जाणार याबद्दल शंका आहे म्हणून यात एक उद्दिष्ट ठेवून जर आपण यात गुंतवणूक केली तर नक्कीच आपल्यासाठी ते फायदेशीर असेल.

आपल्याला जर हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत याला जास्तीत जास्त शेयर करा जेणेकरून त्यांचेही या क्षेत्रातील ज्ञान वाढेल...!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या