swami samarth marathi
shri swami samarth in marathi
राजश्री चितोपंत आप्पा टोळ यांचे चिरंजीव गोविंदराव हे दत्त-उपासक असून, त्यांना ब्रह्मसमंधाची बाधा होती. ती दूर केल्याबद्दल पुढे गोष्ट येईलच, अक्कलकोटास ते सेवा करीत असतांना, समर्थाची स्वारी एके दिवशी त्यांचे बिऱ्हाडी जोशीबुवांचे वाड्यात अकस्मात् आली. सकाळची वेळ असून गोविंद राव पूजा करीत बसले होते. महाराज एवढ्या शुभ समयी आल्याचा आनंद होऊन गोविंदरावांनी महाराजांस बसण्यास पाट मांडला व त्यांनी गाणगापुराहून पादुका करून आणल्या होत्या, त्या महाराजांच्या पायांस लावून, समर्थांचे चरणांवर गंध पुष्पें वाहून पूजन केलें व प्रार्थना केली की, " अक्षयीं आपल्या चरणांचें ध्यान हृदयांत राहावें, विसर पडू नये" प्रार्थना ऐकून महाराजांनी हास्यमुखाने मान डोलविली. पुन्हा गोविंदरावांनी प्रश्न केला की, " महाराज, आपण गाणगापूर संगमावर असताना काय ?" महाराज म्हणाले, " होय, आम्ही तेथेच असतो." असे सांगून महाराज अचानक उठून गेले. त्याच रात्री गोविंदरावास स्वप्नांत असा दृष्टान्त झाला की, श्रीक्षेत्र गाणगापूर येथील गांवांतील मूळ देवालयांत श्री दत्तात्रेय नृसिंह सरस्वती च्या पादुका बाहेर. त्या देव्हाऱ्यांत श्री स्वामी बसले आहेत व चरणीं निजपादुका पातल्या आहेत. पुजारी मंडळी जवळ बसली आहेत. या दृष्टांताने गोविंदरावांना मनोमन स्वामी महाराज दत्तावतारी याची खात्री पटली.
swami samarth information in marathi swami samarth mahima marathi
महाराजांचे व्यक्तिमत्व हे अतिशय भारदस्त होते; महाराजांच्या दर्शनास ते असत त्याठिकाणी पुष्कळ गर्दी जमा होत असे..! महाराज खुशीत असल्यावर सगळ्यांना आनंदाने दर्शन देत असत परंत इच्छा नसल्यास एकदम " हाट् असे म्हणत. त्याबरोबर दर्शन घेणारा घाबरून उलथापालथ मागल्या मागे पडून जाई. याप्रमाणे अनेक वेळां अनेक जनांची धांदल उडे. ज्यांनी ज्यांनी महाराजांचे दर्शन घेतले , त्यांच्या चरणकमळाला स्पर्श केला त्यांना महाराजांचे चरण जणू कापसाप्रमाणे आहेत त्यात हाडच नाही असा अनुभव आला. महाराजांचे मुखाकडेसुद्धा कोणाच्याने एकटक पहावत नसे एवढे त्यांचे तेज होते . महाराजांचे दर्शन म्हणजे मोठे दिव्य होते. विशेषकरून जारिणी स्त्रिया समोर जाण्यास फार भीत असत. केलेल्या पापाची महाराजांपुढे तेव्हांच झाडणी होई. गाली प्रदान होऊन जारिणीचें व जाराचें नांवही महाराज सर्वासमोर प्रकट करीत. एक वेळ एका थोर घराण्यांतील, पुत्र मागून घेणारी बाई, महाराजांजवळ आली. बरोबर दासदासी, सेवकजन पुष्कळ होते. त्यांनी 'पुत्र व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना केली. महाराजांनी उत्तर दिलें, " अगे, मज- जवळ कशाचा मुलगा? तो तुझा यार बसला आहे, तो तुला मुलगा देईल!" सदर गृहस्थाचा व बाईचा फंद असल्याचे मग नंतर कळून आले. राजा व रंक महाराजांस सारखे होते. अक्कलकोटचे मामलेदार, न्यायाधीश, कोतवाल, फार तर काय, राजेसाहेब यांसही श्रीमुखांत खाण्याचे प्रसंग केव्हा केव्हां येत असत. डोकीचें पागोटें काढून फेकून देणें, शिव्या देणे वगैरे खेळ महाराजांचे हमेश चालावयाचे. पण कोणाची बिशाद होती का, ब्रह्मांडनायकापुढे कोणी ब्र काढील किंवा हुकुमाची अवज्ञा करील!swami samarth bakhar marathi swami samarth granth in marathi shree swami samarth information in marathi
अहाहा वाचकहो, हे लिहीत असतां मूळ लेखक म्हणतात , 'महाराजांचे रागाची आठवण होऊन मलाही कापरे भरलें व लेखणी चालत नाहींशी झाली. श्रीसमर्थांचे चरणीं मस्तक ठेवून, माफी मागून, त्यांचे आज्ञेनें गुणानुवाद वर्णन करीत आहे. '. महाराजांस पाहिल्याबरोबर ते देवरूपी आहेत, अशी मनाची खात्री होई. दुसरी गोष्ट अशी की, महाराज वाटतील तशी अचाट कृत्ये करीत; परंतु कोणत्याही वेळी त्यांचे अमृत दृष्टीनें अपधात किंवा विपरीत गोष्ट घडून आल्याचे एकही उदाहरण कोणाचे ऐकण्यात आलेलें नाही
horseshoe crab marathi ; marathi book marathi books online marathi ebooks marathi books pdf marathi sites marathi website pik vima online marathi stories marathi katha marathi kadambari free download mantra sangrah mayboli mayboli शेतकरी आत्महत्या माहिती सात बारा कसा शोधायचा pubg ban in india showik chakrabarty call of duty oppo f17 price india redmi 9a price in india
worldcup fifa
0 टिप्पण्या