इकिगाई म्हणजे काय? (ikigai meaning in marathi)
इकिगाई( IKIGAI ) या जपानी शब्दाचा मूळ अर्थ ''स्वतःच्या अस्तित्वामागील कारण'' असा आहे जपान मध्ये ओकिनावा म्हणून एक बेट आहे या बेटाबद्दल खास गोष्ट अशी की येथील प्रत्येक नागरिकाचे आयुष्यमान १०० वर्षापेक्षा जास्त आहे आणि तिथे ८० ते ९० वर्षांचे वृद्ध देखील दररोज सकाळी उठून आपापले काम अतिशय आनंदाने करतात .ते एवढे कार्यक्षम असतात की त्यांच्या जीवनाच्या अंतापर्यंत ते काम करत असतात. येथील लोकांचा हॅप्पीनेस इंडेक्स जगात सर्वाधिक आहे आणि त्यांच्या दीर्घायुषी जीवनाबद्दल हे लोक प्रसिद्ध आहेत. या यशस्वी जीवनाचे रहस्य त्यांच्या एका सोप्या फॉर्मुल्यात लपले आहे ज्याचे नाव आहे इकिगाई .
इकिगाई म्हणजेच नेमक्या कोणत्या गोष्टीसाठी आपण जन्माला आलो आहोत हे शोधणे ; प्रत्येक माणूस हा कोणत्या ना कोणत्या ध्येयासाठी झटत असतो जर हे ध्येय त्याला सापडले नाही तर त्याचा मेंदू नेहमी त्या हेतूच्या किंवा ध्येयाच्या शोधात असतो.
marathi motivational books pdf free download
जेव्हा आपण आपले उच्च माध्यमिक किंवा महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करतो त्यानंतर आपण नोकरी च्या शोधात असतो किंवा काही जण व्यवसाय निवडतात . माणूस त्याच्या जीवनाचा अर्धा भाग काम करण्यात घालवतो म्हणून जेव्हा काय काम करावे हे निवडण्याची वेळ येते तेव्हा बहुतेक जण आपल्याला विविध प्रकारे सल्ला देतात जसे कि , १)कोणी सांगतात तुला आवडेल ते काम कर म्हणजे त्यात तुला आनंद भेटेल २) काही लोक सल्ला देतात कि ज्या कामात तू एक्स्पर्ट आहेस ते काम कर ३) कोणाचा सल्ला असेल कि ज्यात पैसे जास्त भेटतील असे काही काम कर ४)कोणी म्हणेल जगाला म्हणजेच सगळ्यांना फायदा होईल असे काहीतरी कर. वास्तविक हे सगळे सल्ले कुठे ना कुठे चुकीचे आहेत. ते कसे चुकीचे आहेत हे समजण्यासाठी आपल्याला इकिगाई कसे कार्य करते ते समजून घ्यावे लागेल आणि त्याद्वारेच आपण आपला इकिगाई ओळखू शकतो.
इकिगाई कसे कार्य करते ?
(ikigai book in marathi pdf free download
ikigai book in marathi pdf free download
ikigai marathi book
ikigai marathi book pdf
ikigai book in marathi pdf download
ikigai in marathi pdf
meaning of ikigai in marathi)
वरील आकृतीकडे बघून आपल्याला इकिगाई काय आहे याची कल्पना येईल. आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपला इकिगाई हा ४ संकल्पनाचा मिळून तयार होतो हे आपल्याला कळलेच असेल.
तुम्ही जर आता पेन आणि पेपर घेऊन बसलात तर तुम्हीदेखील तुमचा इकिगाई शोधू शकता.
त्यानंतर ४ रकाने बनवा :-
१) या पहिल्या रकान्यात तुम्हाला कोणत्या गोष्टी करायला आवडते तसेच कोणते काम आहे जे तुम्ही अत्यंत आवडीने करू शकता उदा. गाणे म्हणणे ,क्रिकेट लिहिणे जेवण बनवणे गाडी चालविणे इ. काहीही जे तुम्हाला आवडते ते काम.
२) या रकान्यात तुम्हाला अश्या गोष्टी लिहायच्या आहेत ज्या तुम्ही सराईतपणे करू शकता . म्हणजे अश्या गोष्टी किंवा काम ज्यात तुम्ही एक्स्पर्ट / मास्टर आहात ; जे तुम्ही आत्मविश्वासाने करू शकता. उदा. कोणी पोहण्यात तरबेज असेल किंवा एखाद्याची वाचनाची गती सामान्य गतीपेक्षा जास्त असेल.
३) अशी कोणती गोष्ट आहे कि त्याद्वारे तुम्ही पैसे , संपत्ती कमवू शकता अश्या गोष्टी या रकान्यात लिहायचे आहेत; जसे कि , एखादा लिहेल कि मी इंजिनियर चा जॉब करून पैसे कमावेल कोणी म्हणेल मी हि अमुक तमुक वस्तू विकेल. मी कमिशन संबद्धित व्यवसाय करेल इत्यादी.
४) आता या रकान्यात आपल्याला लिहायचे आहे कि , मी अशी कोणती गोष्टी करू शकतो की ज्याने जगाला फायदा होईल , लोकांना आनंद होईल ,लोकांचे कल्याण होईल व त्यांच्या अडचणी दूर होतील. यात कोणी लिहू शकतो कि मी समाजसेवा करेल , देशसेवा करेल किंवा लोकांना मदत करेल एखाद्या माध्यमातून त्यांची अडचण सोडवेल .
आता तुमच्याकडे प्रत्येकि ४ रकान्यात विविध गोष्टीची यादी तयार असेल. आता फक्त आपल्याला निरीक्षण करून प्रत्येकी २ रकान्यातील COMMAN (सारख्या) गोष्टी शोधायच्या आहेत.
- एखादी गोष्ट आपल्याला करायला आवडते आणि त्यात आपण एक्स्पर्ट देखील आहोत तर ती गोष्ट म्हणजे आपले पॅशन(आवड) असते , उदा.मला बुद्धिबळ खेळायला आवडते आणि मी त्यात तरबेज देखील आहेत तर बुद्धिबळ हे माझे पॅशन आहे.
- जी गोष्ट आपल्याला करायला आवडते व त्यात आपल्याला आनंद वाटतो आणि लोकांनादेखील आपण त्याद्वारे आनंद देऊ शकतो त्यांचे भले करू शकतो त्या कामाला त्या गोष्टीला मिशन (उद्दिष्ट) असे म्हटले जाते. उदा. अब्दुल कलाम यांचे मिशन २०२० हे भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न होते ; ते भारतीय जनतेच्या हितासाठी , भल्यासाठी झटत होते म्हणून त्यांनी ह्या स्वप्नाला मिशन हे नाव दिले.
- ज्या कामात तुम्ही तरबेज आहेत; जे काम तुम्ही आत्मविश्वासाने आणि चांगल्या प्रकारे पार पाडू शकता त्याचबरोबर त्या कामासाठी पैसे मिळू शकतात म्हणजे ते काम करून तुम्ही पैसे मिळवू शकता. त्या गोष्टीला प्रोफेशन (पेशा / हुद्दा ) म्हटले जाते. उदा . आपण मोठमोठ्या IT कंपन्या बघाल तर तिथले बहुतांश कर्मचारी हे प्रोग्रामिंग आणि संबंधित वेगवेगळ्या तांत्रिक कामामध्ये अग्रेसर असतात.
- व्होकेशन म्हणजे व्यवसाय , कोणत्याही मोठ्या व्यवसायाचा पाया हा जनतेशी निगडित समस्येवर आधारित असतो. मोठेमोठे व्यावसायिक अगोदर लोकांच्या समस्या काय आहेत याचा शोध घेतात व नंतर त्या समस्येवर उपाय शोधून त्या उपायावर वर आधारितव्यवसाय सुरु करतात. उदा. आजच्या ५ वर्षांपूर्वी इंटरनेट डेटा चे दर २००-३०० रुपयाला १ GB प्रतिमाह होता तो आज जिओ मुळे २००-३०० रुपयाला १ GB प्रतिदिवस आला आहे . आजच्या १०- २० वर्षांपूर्वी वस्तू घरपोच येत नव्हती ऍमेझॉन ने आज पूर्ण जगाला घरच्या घरी खरेदी करण्यासाठी बाध्य केले आहे.
best marathi books to read 2020
वरील प्रत्येक संकल्पना खरेतर अपूर्ण आहे ते कसे बघुया
- जर आपण फक्त पॅशन(आवड)फॉलो करत राहिलो तर आपण आनंदी तर राहू शकतो परंतु इतर गोष्टीत स्वतःबद्दल निरुपयोगी झाल्याची भावना निर्माण होऊ शकते. आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या कलाकार माणसाचे निरीक्षण केल्यास आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव होईल.
- फक्त एखादे मिशन (उद्दिष्ट्य ) पूर्ण करण्यावर जर आपले पूर्ण लक्ष असेल तर आपल्या आर्थिक बाबी बिकट होऊ शकतात ; आपल्याला मिशन फॉलो करून पूर्णत्वाची भावना येईल तसेच समाजा प्रती आपण करत असलेल्या कामामुळे अभिमान वाटेल.
- जर कोणी प्रोफेशन (पेशा ) निवडला तर तो आरामदायी परिस्थितीत जगू शकतो, पण त्याच्या मनात एक अपूर्णतेची भावना असेल.
- व्होकेशन(व्यवसाय) निवडणाऱ्या व्यक्तीला नेहमी काहीतरी नाविन्यपूर्ण अनुभव मिळतो ;आत्मसंतुष्टी मिळते पण सोबतच व्यवसायिक स्पर्धेचा तसेच अनिश्चिततेचा आणि आणि इतर बाबींचा सामना करावा लागतो.
थोडक्यात वरीलपैकि कोणताही निर्णय हा परिपूर्ण नाही प्रत्येक निर्णयात काही ना काही समस्या आहेतच त्यातूनच इकिगाई या संकल्पनेचा उदय झाला . इकिगाई ही या चारही संकल्पनेचा मध्य आहे आणि ह्यामुळेच ती परिपूर्ण आहे. आपण ज्या कार्यासाठी बनलो आहोत ते कार्य आणि आपल्या अस्तित्वामागे नेमके कारण काय आहे ते या संकल्पनेने नक्की सापडेल.
आता आपल्याला फक्त आपल्याकडील चारही रकान्यातील एक (सामायिक) कॉमन गोष्ट शोधायची आहे म्हणजे अशी गोष्ट/ काम जी तुमची आवड देखील आहे , त्यात तुम्ही तरबेज देखील आहात तसेच तुम्हाला त्या कामासाठी पैसे देखील मिळू शकतील त्याचप्रमाणे ते काम दुनियेच्या / जगाच्या देखील कामाची असली पाहिजे आणि हाच तो तुमचा इकिगाई ...!
उदा. विराट कोहलीचा इकिगाई हा क्रिकेट आहे कारण त्याला क्रिकेटवर प्रेम आहे त्यांनतर त्याने सराव करून त्यात विशेष प्राविण्य मिळवले आज तो भारतातील सर्वाधिक महागडा खेळाडू आहे आणि त्याच्या हरल्याने लोकांना दुःख आणि जिंकल्याने आनंद होतो. त्याच्या क्रिकेट कौशल्याच्या बळावर तो अनेक प्रकारे समाजाला उपयोगी पडतो मदत करतो.
दुसरे उदाहरण समजा एखाद्या व्यक्तीला बुद्धिबळ खेळायला आवडते त्यात तो प्रवीण देखील आहे त्याचबरोबर जर त्याला असा आत्मविश्वास असेल कि, याद्वारे मी पैसे कमावू शकतो तसेच बुद्धिबळाद्वारे सामाजिक योगदान देखील देऊ शकतो. तर बुद्धिबळ हा त्या व्यक्तीचा इकिगाई आहे.
आणखी एक उदाहरण ज्यावरून तुम्हाला नेमके काय करायचे आहे ते समजेल.
(best marathi books to read before you die)
इकिगाई हे पुस्तक आपल्याला आपले करियर शोधण्यास मदत करते. जर आपल्याला आपण कोणत्या कारणासाठी/ कामासाठी जन्मलो आहोत हे जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी स्वतःला समजणे खूप जरुरीचे आहे. सामान्य लोक अयशस्वी असण्यामागे सर्वात मोठे कारण हेच आहे कि ते स्वतःला तसेच स्वतःच्या व्यक्तिमत्वाला चांगल्या प्रकारे ओळखत नाहीत. सामान्य लोकांची दुसरी सर्वात मोठी चूक हि कि त्यांना हे माहित नसत कि ते आपला जास्तीत जास्त वेळ कुठे घालवतात त्यामुळे ते आपला बहुतांश मूल्यवान वेळ वाया घालवत असतात. जगातल्या सगळ्या महान आणि यशस्वी माणसांचे म्हणणे आहे कि, जो पर्यंत माणूस स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत तो मोठी त्याच्या आयुष्यात मोठी प्रगती करू शकत नाही तसेच पुढे जाऊ शकत नाही.
या पुस्तकासाठी इकिगाई या संकल्पनेची माहिती गोळा करत असताना लेखकांनी शतायुषी लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्याचं खरं रहस्य जाणलं. ते त्यांनी या पुस्तकामधून आपल्यासमोर मांडलं आहे. या पुस्तकामुळे आपल्यालाही आपला इकिगाई सापडायला नक्कीच मदत होईल.त्यामुळे आपल्या जीवनाबद्दल सजग असलेल्या प्रत्येक माणसाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे असे आहे . ..!
आणखी वाचा :-
ती ५ पुस्तके ज्यांनी तुमचं व्यक्तिमत्व उजळून निघेल (क्लीक करा)
सकाळी लवकर उठा आणि यशस्वी व्हा (क्लीक करा)
जीवनाला नवी दिशा देणारी १० प्रेरणादायी पुस्तके (क्लीक करा)
तुमच्या मनात प्रेरणेची ज्योत जागवणारी पुस्तके ...!(क्लीक करा)
8 टिप्पण्या
Congratulations friend for your efforts
उत्तर द्याहटवाआपले खूप आभार..!
हटवाMala pn books read karayala aani te reading share karayala khup aavadate , I like your idea .
उत्तर द्याहटवाधन्यवाद आपल्या ज्ञानाचा फायदा जास्तीत जास्त लोकांना आपण दिला पाहिजे.
उत्तर द्याहटवाDownload Link Milel ka..?
उत्तर द्याहटवाBook download hoth nahi
उत्तर द्याहटवाअप्रतिम ,मनन करून स्वीकारण्यासारखे पुस्तकच नव्हे तर विचार
उत्तर द्याहटवाMst
उत्तर द्याहटवा